भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics | Bhajanat Bhaktachya Kshanbhar Thamb Re
नमस्कार या पोस्टमध्ये आपण भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics बघणार आहोत.
भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics
भजनात भक्तांच्या क्षणभर थांबरे
पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे... || धृ ||
एक वार पाहू दे रूप तुझे डोळा
उभा कर कटेवरी तुळशीहार गळा
राधिकेने पाहिलेला रंग सावळा रे
पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे...|| १ ||
धूप दीप गंध पुष्प तुला नाही आणिले
एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले
भक्त वेडा भगवंत राहशी का दूर रे ?
पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे...|| २ ||
तुकोबाच्या भजनात तु रे दंगलासी
वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडलासी
भक्तांच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे
पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आण रे...|| ३ ||
* * * **
हे भक्ती गीत पण नक्की वाचा 👇👇👇👇
- वारकरी रूपामध्ये पांडुरंग अभंग Lyrics
- विठ्ठला नामा सांगे विनवूनी अभंग Lyrics
- तुकोबाची कांता सांगे लोकापाशी Lyrics
- या पंढरीचे सुख अभंग Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
Post a Comment