शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान Lyrics | Shankarala Majhya Avadate Belache Pan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान Lyrics बघणार आहोत.
शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान Lyrics
शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान |
महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान || धृ ||
गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा |
पायात खडावा छान, आवडते बेलाचे पान || १ ||
जटेतून वाहे झुळझुळ गंगा |
डोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान || २ ||
महादेवाच्या हातात डमरू त्रिशूल |
भाळाला भस्म शोभे छान, आवडते बेलाचे पान || ३ ||
बेल पुष्पांवरी शंकराची प्रीती |
शोभून दिसतोया छान, आवडते बेलाचे पान || ४ ||
जगाच्या कल्याणा हलाहल प्राशन |
नीलकंठ शोभतो छान, आवडते बेलाचे पान || ५ ||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- प्रसिद्ध मराठी भजनांचा संग्रह
- डम डम डम डम डमरू वाला पार्वती पती कैलास वाला Lyrics Marathi
- मागे उभा मंगेश Song Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान Lyrics बघितले.
Post a Comment