मागे उभा मंगेश Song Lyrics | Mage Ubha Mangesh Pudhe Ubha Mangesh
नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण मागे उभा मंगेश song Lyrics बघणार आहोत. कवियत्री शांता शेळके यांनी हे गीत लिहिलेलं आहे.
मागे उभा मंगेश Song Lyrics
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
जटाजूट माथ्यावरी
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास लिंपुन राहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी ?
शैलसुता संगे, गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
गीत - शान्ता शेळके
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- वारी चुकवायची नाही Lyrics
- पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला गीत
- गर्वाने वागू नको भल्या माणसा Lyrics
- अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो Lyrics
या पोस्टमध्ये आपण मागे उभा मंगेश song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏
Post a Comment