Header Ads

आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई Lyrics | Adimaya Ambanai Song



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई Lyrics बघणार आहोत. सुधीर मोघे यांनी या गीताची रचना केलेली आहे.

आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई Lyrics

आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई
तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई

उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई

सार्‍या चराचरीं तीच जिवा संजीवनी देते
तीच संहारप्रहरीं दैत्य-दानव मारीते
उग्रचंडी रूपाआड झरा वात्सल्याचा गाई

क्षेत्र नामवंत एक त्याचे नाव कोल्हापूर
अगणित खांबावरी उभे राहिले मंदिर
नाना देव ते भोवती देवी मधोमध राही

तुळजापूरीची भवानी जणु मूळ आदिशक्ती
घोर आघात प्रहार तिने पचविले पोटी
स्वत: तरली, भक्तांना स्वयें तारुनिया नेई

अमरावतीची देवता शाश्वत, अमर
अंबेजोगाईत तिने एक मांडियले घर
मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई

कुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी
दुर्गा दुर्घट यमाई, अंबा असुरमर्दिनी
किती रूपें, किती नावें परि तेज एक वाहीं

गीत - सुधीर मोघे

* * * * *




हे पण नक्की वाचा 👇👇👇



या पोस्टमध्ये आपण आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.