Painjanacha Naad Aala Lyrics In Marathi | पैंजणाचा नाद आला गोड कानी ग
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण देवीचे सुंदर असे भक्ती गीत Painjanacha Naad Aala Lyrics In Marathi करणार आहोत.
Painjanacha Naad Aala Lyrics In Marathi
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग
उंबरठ्यावर पाऊल दिसते, कोण आली ग ? ..(2 times) || धृ ||
पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेउनी
वैभवाचे साज सारे गळा घालूनी
कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ? ..(2 times)
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग
उंबरठ्यावर पाऊल दिसते, कोण आली ग ? || 1 ||
हिरवा रंग खूलवी अति खूलवी सुंदर
हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर
तुळजापूरची आई भवानी दारी आली ग
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ? ..(2 times)
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग
उंबरठ्यावर पाऊल दिसते, कोण आली ग ? || 2 ||
रुपयाचे ग लावण्याचे रंगे तांबूल
माहूरगडची रेणुका ही शालू ही लाल
लेकीला ही बघण्या आली दारी माझ्या ग
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ? ..(2 times)
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग
उंबरठ्यावर पाऊल दिसते, कोण आली ग ? || 3 ||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग Lyrics
- सावर सावर अंबाबाई Lyrics
- नाच अंबे नाच माझ्या अंगणात
तर आज आपण Painjanacha Naad Aala Lyrics In Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment