Header Ads

बालकवींच्या निसर्ग कविता मराठी | Balkavinchya Nisarg Kavita



नमस्कार, आज या पोस्टमध्ये आपण बालकवींच्या निसर्ग कविता मराठी मधून बघणार आहोत.

बालकवींच्या निसर्ग कविता मराठी

⛺⛺⛺⛺

औदुंबर

ऐलतलावर पैलतरावर हिरवळी घेऊन
निळा सावळा धरा वाहतो बेटाबेटांतून

चार घरांचे गाव चिमुकले
पैलं टेकडीकडे, शेतमाळ्यांची दाट लागली
हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांढरी तयातूनी
आडवी-तिडवी पडे हिरव्या कुरणांमधुनी
चालली काळया डोहाकडे...

झाकाळून जळ गोड
काळी मापसरी लाटांवर 
पाय टाकुनी जळांत बसला
असला औदुंबर....

- बालकवी

❖  ❖  ❖ ❖

निर्झरास

गिरीशिखरे वनमालाही
दरी दरी घुमवता येई
कड्यावरूनी घेऊन उड्या
खेळ लता वलई फुगड्या

घे लोळण खडकावरती
फिर गरगर अंगाभोवती
जा हळूहळू खाली वळसा घेत
लपत शपथ हिरवळीत

पाचूची हिरवी राणे
झुलवा गोड, झुळझुळ गाणे
वसंत मंडप - वनराई
आंब्याची पुढती येई

श्रमलासी खेळुनी खेळ
निज सुखे क्षणभर बाळ
ही पुढची पिवळी शेते
सळसळती गाती गीते

झोप कोठूने तुला तरी ?
हास लाडक्या नाचकरी
बाल जरा तू बालगुनी
बाल्याची रे भरी सी भुवणी

- बालकवी

❖  ❖  ❖ ❖

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न निरस एकांत गीत गातो

सूर्य मध्यान्ही नभी उभा आहे
घार मंडळ त्या भवती घालीत आहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखर झोपेत पेंगतात

तुला नाही परि हौस उडायची
गोड हिरव्या झुंबक्यात दडायची
उष्ण झाल्या बाहे तापतात
गीत निद्रा तव आंत अखंडित

चीत किंवा कोवळ्या विखारे
दुखते खूपते का सांग वा रे !
तुला काही जगतात नको मान !
गोड गावे मन भाग हे कुठून ?

झोप सोरत्या नंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायची
दुःख निद्रे निद्रिस्त बुद्ध राज
करून गीते घुमविता जगी आज

दुःख निद्रा जी आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
तीर माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे !

- बालकवी

❖  ❖  ❖ ❖

आनंदी पक्षी

केव्हा मारून उंच भरारी
नभात जातो हा दूरवरी
आनंदाची सृष्टी सारी
आनंदी भरली...

आनंदाचे फिरती वारे
आनंदाने चित्त अवसरे
आनंदी खेळती कसा रे !
आनंदी पक्षी..

हिरवे हिरवे रान विलसते
वृक्षलतांची दाटी जेथे
प्रीती शांती जिथे खेळते
हा वसतो तेथे

सुंदर पुष्पे जिथे विकसली
सरोवरी मधू कमल फुलली
तरी तेथे सुंदर केली बागडतो छंदे
हसवितो लतिका कुंजांना

प्रेमे काढी सुंदर ताना
आनंदाच्या गाऊन गाना
आनंदे रमतो
जीवित सारे आनंदाचे

प्रेम रसाने भरले त्याचे
म्हणोनिया तो राणी
नाचे प्रेमाच्या छंदे !
बा आनंदी पक्ष देई

प्रसाद आपूला मजला काही
जेणे मन हे गुंगून जाई
प्रेमाच्या डोही
उंच भराऱ्या मारीत जाणे
रूप तुझे ते गोजिरवाणे
गुंगुन जाईल चित्त जयाने
दे दे ते गाणे ..

- बालकवी

❖  ❖  ❖ ❖

आनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे
वरती खालती मोद भरे
वायु संगे मोद फिरे

नभात भरला, दिशात फिरला
जगात उरला, मोद विहरतो चोहिकडे
सूर्यकिरण सोनेरी हे
कौमूदी ही हसते आहे

खूलली संध्या प्रेमाने
आनंदी गाते गाणी
मेघ रंगले, चित्त दंगले
गाणं स्फूरले
इकडे तिकडे चोहीकडे

- बालकवी

❖  ❖  ❖ ❖


हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण या पोस्टमधून बालकवींच्या निसर्ग कविता मराठीतून बघितल्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.