अस्तित्व कविता मराठी | Astitva Kavita Marathi
✨अस्तित्व कविता मराठी✨
*****************************************************
अस्तित्व
आज माझ्या अस्तित्वाची ...
जरी तुला जाण नाही
पण मला विसरू शकशील तू
माझे अस्तित्व एवढे लहान नाही...
जिथे जाशील तू
तिथे दिसतील माझ्या पाऊलखुणा
विसरणे आता तुला ते शक्य नाही
रुजविलेले प्रेम माझे अंतर्मनात तुझ्या
हृदयातून काढणेही तुला आता शक्य नाही
- सुधाकर अंभोरे
⸎ ⸎ ⸎ ⸎
अस्तित्व आपल्याला कळायला लागतात
जेव्हा वेळेची खरी गरज असते
तेव्हा त्या वेळेचा अस्तित्व
आपल्याला कळायला लागतं..
जेव्हा आपल्याला कुणी
समजून घ्यावं असं वाटत असतं
तेव्हा आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीचे
अस्तित्व आपल्याला कळायला लागतं...
जेव्हा हक्काची मैत्री हवीशी वाटते
तेव्हा त्या कायम साथ देणाऱ्या मित्राचं
अस्तित्व आपल्याला कळायला लागतं ..
जेव्हा खऱ्या अर्थाने प्रेमाची जाणीव व्हायला लागते
तेव्हा त्या एका जवळच्या व्यक्तीच
अस्तित्व आपल्याला कळायला लागतं...
⸎ ⸎ ⸎ ⸎
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- प्रेमाला उपमा नाही कविता
- Birthday Marathi Kavita Charolya
- Funny Marathi Kavita
- मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता
तर आज आपण अस्तित्व कविता मराठी मधून बघितल्या.
Post पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment