Header Ads

आल्या पाच गवळणी Lyrics | Aalya Pach Gavlani Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आल्या पाच गवळणी Lyrics बघणार आहोत.

आल्या पाच गवळणी Lyrics

आल्या पाच गौळणी,
पाच रंगाचा शृंगार करूनी... (2 times)  ||धृ||

पहिली गवळण रंग सफेद |
जशी चंद्राची ती कोर |
गगनी चांदनी लखलखित |
ऐका तिची हो मात |
आल्या पाच गौळणी 
पाच रंगाचा शृंगार करूनी... (2 times) ||१ ||

दुसरी गौळण भारी भोळी |
रंग हळदी हूनही पिवळी
पिवळा पितांबर नेसून आली |
अंगी बूट्टेदार चोळी
एक लहान तनु उमर कवळी |
जशी चाफ्याची कळी
आल्या पाच गौळणी,
पाच रंगाचा शृंगार करूनी... (2 times) ||२||

तिसरी गौळण रंग काळा |
नेसुनी चंद्रकळा
काळे काजळ लेऊनी डोळा |
रंग तिचा सावळा
काळी गरस गोळी गळा |
आली राजस बाळा
आल्या पाच गौळणी,
पाच रंगाचा शृंगार करूनी... (2 times) || ३ ||

चौथी गौळण रंग लाल |
लाल लाल ही लाल
कपाळी कुंकूम चिरी लाल |
जसे डाळिंबाचे फुल
आल्या पाच गौळणी,
पाच रंगाचा शृंगार करूनी... (2 times) ||४||

पाचवी गौळण हिरवा रंग |
जसे आरशात जडले भिंग
फुगडी खेळता कृष्णा संग
एकनाथ अभंग
आल्या पाच गौळणी,
पाच रंगाचा शृंगार करूनी... (2 times) || ५ ||

* * * *



हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज या पोस्टमधून आपण आल्या पाच गवळणी Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स आणि कविता वाचण्यासाठी True Marathi Lyrics  ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.