Nach Ambe Nach Lyrics | नाच अंबे नाच माझ्या अंगणात
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Nach Ambe Nach Lyrics बघणार आहोत. अंबाबाईचे सुंदर असे हे भक्ती गीत आहे.
Nach Ambe Nach Lyrics
नाच अंबे नाच माझ्या अंगणात
सावर सावर घोळ साडीचा येतो पायात || धृ ||
घुंगरू पायात बांधते अंबा
घागर हातात घेते अंबा
येथे तालावर थय थय नाच करी
अंबा रंगली नाचाच्या रिंगणात
नाच अंबे नाच माझ्या अंगणात
सावर सावर घोळ साडीचा येतो पायात || १ ||
फुगडी रंगली- रंगली छान
झिम्मा खेळून रंगले रान
अंबा गिरक्या घेई
घोळ पायात येई
छम छम पैंजन वाजती तालात ..
नाच अंबे नाच माझ्या अंगणात
सावर सावर घोळ साडीचा येतो पायात || २ ||
अशी घागर घुमते अंबा
फुगडी खेळ खेळून घालते पिंगा
फू फू फुंकर घाली,
राळ उद जाळी
ज्योत कापराची जाळते हातात
नाच अंबे नाच माझ्या अंगणात
सावर सावर घोळ साडीचा येतो पायात || ३ ||
माते तुळजाभवानी आई
घालते साष्टांग नमस्कार बाई
मला कुशीत घेई
प्रेमे पान्हा देई
खेळे बाळ तुझी या संगतीत
नाच अंबे नाच माझ्या अंगणात
सावर सावर घोळ साडीचा येतो पायात || ४ ||
☙ ☙ ☙ ☙
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण Nach Ambe Nach Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏
Post a Comment