पितृ अष्टक मराठी | Pitru Ashtak Lyrics Marathi
नमस्कार, सध्या पितृपक्षाचे दिवस सुरू आहेत. या पोस्टमध्ये आपण पितृ अष्टक मराठी मधून बघणार आहोत. त्यासोबतच पितृपक्ष म्हणजे काय ? पितृपक्ष मध्ये काय करू नये? याबद्दलही जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृ पक्षाचे खूप महत्त्व आहे. चला तर मग याबद्दल विस्तृत माहिती खाली बघू.
पितृपक्ष म्हणजे काय ?
- पितृ पक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात. आपल्या कुटुंबातील नक्की झालेल्या नातेवाईकांचे, पूर्वजांचे स्मरण या काळात केले जाते. त्यांचा श्राद्ध विधी पिंडदान पितृपक्षात करतात.
- या पंधरा दिवसांच्या काळात पूर्वज आपल्या कुटुंबीयांच्या घरी येतात अशी मान्यता आहे. म्हणून या काळात मित्रांच्या स्मरण केले जाते. त्यांच्या नावाने अन्नदान, काही इतर प्रकारचे दान केले जाते. ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला समाधान मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.
- पितृ पक्षामध्ये गाय, कुत्रा, कावळा यांना विविध पदार्थ खाऊ घातले जातात. या पंधरवड्यात केलेलं अन्नदान पितरांपर्यंत पोहोचतं असा समज आहे आणि त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण होऊन आशीर्वाद मिळतो असे मानले जाते.
- भाद्रपद अमावस्या जिला सर्वपित्री अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी आई-वडिल वारले असतील तर त्यांचे श्राद्ध केले जाते. पण त्यासोबतच ज्यांच्या मृत्यूचा दिवस नक्की माहीत नसतो त्या पितरांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येलाच केले जाते.
- पितरांचे ज्योतिष शास्त्रामध्येही महत्व आहे. काही जणांना यशाच्या जवळ जाऊन शिल्लक अशा कारणामुळे अपयश मिळते, किंवा संतती प्राप्तीमध्ये अडथळे येतात, आर्थिक नुकसान होते. अशा वेळी कुंडली मध्ये पितृदोष असल्याचं ज्योतिषी कडून सांगितलं जात. काही वेळ नाही पितृदोषावरील विधी करण्याचीही आवश्यकता भासते.
पितृ अष्टक मराठी
जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला
अशा नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||
इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग तो सदा दाखविला
कृपा हीच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||
मिळो सद् गती मज पितरांना
विनती हीच माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||
जोडून कर हे विनती तयांना
अग्नि वरूण वायु आदी देवतांना
सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||
वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना
सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना
मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||
करूनी सिध्दता भोजनाची तयांना
पक्वान्ने आवडीनें बनवून नाना
सदा तृप्ती होवो जोडी करांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||
मनोभावे पुजूनी तिला, यवाने
विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने
आशिष द्याहो आम्हा सकलांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||
सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा
न्यून काही राहाता माफी कराना
गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ ||
✜ ✜ ✜
हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे म्हणून आपल्या पत्रांच्या कल्याणासाठी काही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत असे शास्त्र सांगते. चला तर मग बघूया पितृपक्षात आपण काय केलं पाहिजे.
पितृपक्षात काय करावे ?
- पितृपक्षात गायी कावळे कुत्रे मुंग्या यांना अन्न देणे खूप लाभदायक मानल गेल आहे.
- पितृ पक्षाच्या काळात रोज आंघोळ झाल्यावर पितरांचे स्मरण करून त्यांना जल अर्पण करावे. या काळात आपण त्यांचे स्मरण केल्याने त्यांना शांती लाभते असे मानले जाते.
- ज्यांच्या कुंडीमध्ये पितृदोष आहे अशा व्यक्तींनी या काळात उज्जैन, त्र्यंबकेश्वर, गया यासारख्या पवित्र ठिकाणी जाऊन पिंडदान केलं पाहिजे.
- पितृपक्षामध्ये ब्रह्मचर्याच पालन आपण केल पाहिजे.
पितृपक्षामध्ये काय करू नये?
- पितृपक्षामध्ये लग्न नवीन घरात गृहप्रवेश असे शुभ कामे करणे टाळले पाहिजे.
- कुत्री पक्षात कांदा, लसूण, मांस असशा तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.
- पितृपक्षात नवीन कपडे किंवा नवीन वस्तूंची खरेदी करणे हे आपण टाळले पाहिजे.
- या काळात सोने-चांदीची खरेदी करणे हे अशुभ मानले जाते.
तर आज या पोस्टमध्ये आपण पितृ अष्टक मराठी मधून बघितले. त्यासोबत पितृपक्षाबद्दल माहिती जाणून घेतली. तुम्ही पण या काळात तुमच्या मित्रांचे स्मरण, अन्नदान करा म्हणजे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
Post a Comment