Header Ads

Majhi Ambika Satvachi Lyrics Marathi | माझी अंबिका सत्वाची



नमस्कार, आज या पोस्टमध्ये आपण Majhi Ambika Satvachi Lyrics Marathi बघणार आहोत.

Majhi Ambika Satvachi Lyrics Marathi

माझी अंबिका सत्वाची
उभी राहून थाटात
वाट बघते भक्ताची
तुळजापूराच्या घाटात || धृ ||

आली पुनवेची रात
पडलं चांदणं डोंगरात
दिवटी पेटवून हातात
सारा आनंद देवळात

गळा कवड्याच्या माळा
घेऊन परडी हातात
वाट बघते भक्ताची
तुळजापूराच्या घाटात    || १ ||

हळदी कुंकवाच लेन
तिला नाही त्याची वाण
साडी चोळीचा मान ग
देते अंबाला नेमान
साडी चोळीचा मान ग
देते अंबाला नेमान

सडा पडलाय कुंकाचा
त्या बाजारपेठेत
वाट बघते भक्ताची
तुळजापूराच्या घाटात  || २ ||

गाय मुखात नाहून
केस मोकळे सोडून
आली अंबिका चालून
भाळी मळवट भरून

ये ये हा केला धावून
नाही भेदभाव पोटात
वाट बघते भक्ताची
तुळजापुराच्या घाटात    || ३ ||

वारा गार गार सुटलाय
काटा अंगावर फुटलाय
उद कापूर पेटलाय
सारा सुगंध उठलाय
उद कापूर पेटलाय
सारा सुगंध उठलाय

मला सूचना काही बाई
या थंडीच्या लाटात
वाट बघते भक्ताची
तुळजापुराच्या घाटात     || ४ ||

माझी गाडी चालली घुंगराची
वाट लागल डोंगराची
ओढ मनात अंबाची
केली तयारी जत्रेची
बंधू छगन येईल ग
त्या जत्रेच्या नेटात

माझी अंबिका सत्वाची
उभे राहून थाटात
वाट बघते भक्ताची
तुळजापुराच्या घाटात    || ५ ||

❖ ❖ ❖ ❖



हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज आपण Majhi Ambika Satvachi Lyrics Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.