Famous Marathi Bhajan Lyrics | प्रसिद्ध मराठी भजनांचा संग्रह
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Famous Marathi Bhajan Lyrics मराठी मधून वाचायला मिळतील. प्रसिद्ध अशी १० मराठी भजने तुम्ही या पोस्ट मध्ये वाचू शकता.
🙏🙏Famous Marathi Bhajan Lyrics🙏🙏
1. शोधीसी मानवा
शोधिसी मानवा राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपल्या अंतरी
शोधिसी मानवा राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपल्या अंतरी
मेघ हे दाटती कोठूनी अंबरी
सूर येती कसे वाजते बासरी
रोमरोमी फुले तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी दूर ती पंढरी
शोधिसी मानवा राउळी मंदिरी
गंध हा हासतो पाकळी सारुनी
वाहते निर्झरी प्रेम संजीवनी
भोवताली तुला साद घाली कुणी
खून घे जाणूनी रुप हे दूरवरी
भेटतो देव का पूजनी अर्चनी
पुण्य का लाभते दान धर्मातूनी
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी
शोधिसी मानवा राउळी मंदिरी
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
2. आकाशी झेप घे रे
आकाशी झेप घे रे पाखरा
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुज भवती वैभव माया
फळ रसाळ मिळते खाया
तुज भवती वैभव माया
फळ रसाळ मिळते खाया
सुख लोलुप सारी काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
सोडी सोन्याचा पिंजरा
सोडी सोन्याचा पिंजरा
घर कसले ही तर कारा
विष समान मोती चारा
घर कसलेही तर कारा
विष समान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुझा आडवी तो हा कैसा अंबरा
सोडी सोन्याचा पिंजरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने
दरी डोंगर हिरवी राने
जा ओलांडूनि या सरिता सागरा
सोडी सोन्याचा पिंजरा
सोडी सोन्याचा पिंजरा
कष्टविन फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
कष्टाविन फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
सोडी सोन्याचा पिंजरा
सोडी सोन्याचा पिंजरा
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा
सोडी सोन्याचा पिंजरा
सोडी सोन्याचा पिंजरा
आकाशी झेप घे रे पाखरा
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
सोडी सोन्याचा पिंजरा
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
3. दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
हे नामामृत भवभय हारक
अगसहारक त्रिभुवन तारक
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया
अमोल ठेवा हाती धरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त चरण माहेर सुखाचे
दत्त भजन भोजन मोक्षाचे
कवच लाभता दत्तकृपे चे कळी काळाचे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
हा उत्पत्ती स्थिती लय करता
योग ज्ञान उदगाता त्राता
दत्त चरित मधु गाता गाता
दत्त चरित मधु गाता गाता
भवसागर हा पार करा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा
दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
4. ज्या सुखा कारणी
ज्या सुखा कारणी देव वेडावला
ज्या सुखा कारणी देव वेडावला
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला
देव संत सदनी राहिला ...
देव संत सदनी राहिला ...
धन्य धन्य संत सदन
धन्य धन्य संत सदन
जेथे लक्ष्मीचा इथ शोभे नारायण
जेथे लक्ष्मीचा इथ शोभे नारायण
नारायण नारायण नारायण
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला
देव संत सदनी राहिला ...
सर्व सुखाची राशी
सर्व सुखाची राशी
संत चरणी मुक्ती मुक्ती रासी
संत चरणी मुक्ती मुक्ती रासी
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला
देव संत सदनी राहिला ...
एका जनार्दनी पाहे नाही सुखा
एका जनार्दनी पाहे नाही सुखा
म्हणोनी देव फुलले देखो देखा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला
देव संत सदनी राहिला ...
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
5. देव देव्हाऱ्यात नाही
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी
देव अंतरात नांदे, देवदाही दिशी कोंडे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधुनिया पाहे, देव सर्वा भुता ठाई
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव मूठीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना धावे
देव आपण आता आहे, शिर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही, देव भरुनिया राही
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी.
देव स्वये जगन्नाथ, देवा गाथा अनंत
देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण
काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी
देव चोरून नेईलं अशी कोणाची पुण्याई
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
6. मला हे दत्तगुरु दिसले
ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले
मला हे दत्तगुरु दिसले
मला हे दत्तगुरु दिसले
माय उभी ही गाय होऊनी,
पुढे वासरू पाहे वळूनी
माय उभी ही गाय होऊनी
पुढे वासरू पाहे वळूनी
कृतज्ञतेचे श्वान विचारे पायावर झुकले
मला हे दत्तगुरु दिसले
मला हे दत्तगुरु दिसले
चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे
चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे
मला हे दत्तगुरु दिसले
मला हे दत्तगुरु दिसले
तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती
औदुंबर वसले
मला हे दत्तगुरु दिसले
मला हे दत्तगुरु दिसले
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
7. मंदिरात अंतरात
मंदिरात अंतरात तोच नांदत आहे
नाना देहे नाना रुपी तुझा देव आहे
तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती
तोच शाम तोच राम, दत्तधाम आहे
मंदिरात अंतरात तोच नांदत आहे
नाना देहे नाना रुपी तुझा देव आहे
मंदिरात अंतरात......
संताचिया कीर्तनात साधकांच्या चिंतनात
संताचिया कीर्तनात साधकांच्या चिंतनात
तूच ध्यास तोच असं तोच श्वास आहे
मंदिरात अंतरात तोच नांदत आहे
नाना देहे नाना रुपी तुझा देव आहे
तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही
तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही
तोच एल तोच पैल आदी अंत आहे
मंदिरात अंतरात तोच नांदत आहे
नाना देहे नाना रुपी तुझा देव आहे
तोच उन्हाची काहिरी तोच शितळ साउली
तोच उन्हाची काहिरी तोच शितळ साउली
आनंदात वेदनात अंति तोच आहे
मंदिरात अंतरात तोच नांदत आहे
नाना देहे नाना रुपी तुझा देव आहे
कुठे सुखाचा वर्षाव, कुठे घावा वरती घाव
कुठे सुखाचा वर्षाव, कुठे घावा वरती घाव
तारणारा मारणारा एक तोच आहे
मंदिरात अंतरात तोच नांदत आहे
नाना देहे नाना रुपी तुझा देव आहे
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
8. लागला रंग भजनाचा
लागला रंग भजनाचा
लागला रंग भजनाचा
डोलला देव आमुचा
डोलला देव आमुचा
डोलला देव आमुचा
डोलला देव आमुचा
या बघा बघा रे कुणी
या बघा बघा रे कुणी
नाचतो देवा अंगणी
ना पारची आनंदाचा
ना पारची आनंदाचा
डोलला देव आमुचा
डोलला देव आमुचा
डोलला देव आमुचा
नेसला पितांबर कटी
नेसला पितांबर कटी
भाळास दिसे मळवटी
भाळास दिसे मळवटी
चमकतो हिरा मुकुटाचा
चमकतो हिरा मुकुटाचा
डोलला देव आमुचा
डोलला देव आमुचा
डोलला देव आमुचा
तल्लीन होऊनी भला
तल्लीन होऊनी भला
हा देव पणा विसरला
हा देव पणा विसरला
समजूनी भाव तुकड्याचा
डोलला देव आमुचा
डोलला देव आमुचा
डोलला देव आमुचा
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
9. हरी भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
निवारी जन्मा मरण सोडी
निवारी जन्मा मरण सोडी
भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
भावे करिता हरीचे भजन
भावे करिता हरीचे भजन
भावे करिता हरीचे भजन
मना होय समाधान
मना होय समाधान
भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
हरि भजनाची आवडी
हरि भजनाची आवडी
काळ गेला देशोधडी
काळ गेला देशोधडी
भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
एका जनार्दनी भजन भजन
एका जनार्दनी भजन भजन
भजनी पावे समाधान
भजनी पावे समाधान
भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
हरी भजनी येता गोडी
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
10. तुझे रुप चित्ती राहो
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मी तुझे नाम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म
सदाचारणी देऊनी आगळा न धर्म
देहधारी जो जो त्यासी विहीत नित्य कर्म
सदाचाऱनी देऊनी आगळान धर्म
तुला आठवावे कावे हाच एक नेम
तुला आठवावे कावे हाच एक नेम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासाचे देते स्वये पापराशी
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासाचे देते स्वये पापराशी
दिस लागली तू डोळा
दिस लागली तू डोळा
दिस लागली तू डोळा
आरुपी अराम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
तुझ्या परिवाहीला मी देह भाव सारा
पुढे अंतराळी आभाळ सोडूनी पसारा
तुझ्या परिवाहीला मी देह भाव सारा
पुढे अंतराळी आभाळ सोडूनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा
नाम तुझे घेतो गोरा
म्हणूनी आठवाव
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
⸎⸎⸎⸎⸎⸎⸎
हे पण नक्की वाचा 👇👇👇
या पोस्ट मध्ये आपण Famous Marathi Bhajan Lyrics बघितले. अन्य भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!!!!
Post a Comment