महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार Lyrics | Shankar Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर बाहेर पाण्याची धार Lyrics बघणार आहोत.
महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार Lyrics
त्रिशूळ हाती डमरू हाती
कपाळी तिसरा डोळा
मस्तकी ज्याच्या चंद्राचा कोर
असा हा शंकर भोळा...
महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार..||धृ ||
गळ्यात घाले सर्पाच्या माळा
भस्म ते अंगावर
पार्वती संगे सदा बसूनी
येतो हा नंदीवर
महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार..|| १ ||
बेलाच्या झाडाखाली बसतो
सदा तो ध्यान धरुनी
बेलही पत्रे आवडे त्याला
मूर्ती दिसे शोभूनी
महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार..|| २ ||
पश्चिमेस पंढरपूर उत्तरेस काशी
दक्षिणेस रामेश्वर पूर्वी चौरागड
महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार..|| ३ ||
शंकर मोठा डोईवर जटा
गळ्यात रुद्राच्या माळा
शिव हा भोळा
दिसे सावळा रूप दिसे विक्राळा
भक्त ओमकार चरणी
लोळ वाहे पाण्याची धार
महादेवाच्या पिंडीवर वाहे पाण्याची धार..|| ४ ||
* * * * *
हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇
- शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान Lyrics
- बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं Lyrics
- उठा उठा शंभू देवा लिरिक्स
आज या पोस्टमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर बाहेर पाण्याची धार Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment