शोधू नको रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी Lyrics | Shodhu Nako Re Ikade Tikade
नमस्कार या पोस्टमध्ये आपण शोधू नको रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी Lyrics बघणार आहोत.
शोधू नको रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी Lyrics
शोधू नको रे इकडे तिकडे
देव तुझ्या अंतरी..
पाहून घे सद्गुरु चरणावरी.. || धृ ||
या देवाची ओळख करण्या
जन्म मिळाला पावन करण्या
नर जन्मी या संधी मिळाली
तुज या धरती वरी..
पाहून घे सद्गुरु चरणावरी.. || १ ||
रंगही नाही रूपही नाही
अशा प्रभूला जाणून घेई
संत हे सारे देती ग्वाही
जाण जरा अंतरी...
पाहून घे सद्गुरु चरणावरी.. || २ ||
पुन्हा पुन्हा हा जन्म नसे रे
बंद जीवाचे तोडून घे रे
फळ मुक्तीचे खाण्यासाठी
ये गुरु चरणा वरी...
पाहून घे सद्गुरु चरणावरी.. || ३ ||
सद्गुरु विना मार्ग मिळेना
जन्म मरण हे कधीच चुकेना
राधेश्याम हा गेला तरुनी
गुरुच्या चरणावरी
पाहून घे सद्गुरु चरणावरी.. || ४ ||
* * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
- गर्वाने वागू नको भल्या माणसा Lyrics
- विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला Lyrics
- वारी चुकवायची नाही Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण शोधू नको रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment