Header Ads

विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला Lyrics | Vithhal Vithhal Vithhala Lyrics



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला Lyrics बघणार आहोत.

विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला Lyrics

विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला || धृ ||

रुक्मिणी कांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला
राधा श्याम विठ्ठला सिताराम विठ्ठला
द्वारकेचा राजा तू पंढरीच्या पाटला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला || १ ||

रुक्मिणी साठी आला तू पांडुरंग विठ्ठला
गोपाळ पुरी गोपाळ सवे रमलासी बा विठ्ठला
गाईचा राया नाही बा दमला तू विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला || २ ||

दिंडी वर्णी महा तीर्थ लोहदंड विठ्ठला
पाण्याचा हा झरा तिथे वाहतोया विठ्ठला
रम्य स्थळ पाहोनिया अमोलीक विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला || ३ ||

मायबापा घेऊन आला पुंडलिक विठ्ठला
माझ्या पित्याच्या सेवेमध्ये पुंडलिक दंगला
पांडुरंग भेटायाला आला पुंडलीकाला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला || ४ ||

सेवा करतो आई बापाची सोहळा हा पाहिला
बीट फेकली त्या विटेवर विठ्ठल उभा राहिला
पंढरी नगरी जमली तेव्हा पहावया श्रीहरीला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला || ५ ||

भक्तजन होती गोळा पंढरीच्या वारीला
भक्तांच्या रक्षणाला धावला तू विठ्ठला
संत नामदेवा संग जेवला तू विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला || ६ ||

गोपाळपुरी जनाईसाठी गेलासि बा विठ्ठला
जनाई सवे दळण तू, दळीले बा विठ्ठला
ओव्या ऐकून जनाईच्या दंगलासी विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला || ७ ||

अलंकार विसरून या गेलासी बा विठ्ठला
चोरीचा तो आळजणीवर आणिला बा विठ्ठला
सुळावरी देता धावुनिया गेलासी बा विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला || ८ ||

आषाढीच्या एकादशीला दिंडी चालली पंढरीला
सुनबाई बोले सासुबाई ला जाऊ चला पंढरीला
सासुबाईला राग आला बांधून ठेवले खांबाला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला || ९ ||

सासुबाई ची भक्ती पाहुनी संकट पडले विठोबाला
रुप घेऊनी सखुबाईचे श्रीहरी तेथे आला
पांडुरंगाने बांधून घेतले, मोकळे केले सखुबाईला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला || १० ||

सावत्याची भाजी खुडू लागलासी विठ्ठला
पोट फाडाया सावत्याला लाविलेसे विठ्ठला
सावत्याच्या पोटामध्ये बैसलासी विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला || ११ ||

गोरा कुंभार माती तुडवी, मुखी नाव विठ्ठला
माती तुडवूनी मडके घडवी, मुखाचा नाम विठ्ठला
गोरोबाची भक्ती पाहुनी पावलासी विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला || १२ ||


|| श्रीहरी गोविंद विठ्ठला, हरी ओम विठ्ठला ||
|| केशव माधव विठ्ठला हरी ओम विठ्ठला ||
|| सिताराम विठ्ठला, हरी ओम विठ्ठला ||

|| विठ्ठल विठ्ठल विठ्ठला,
हरी ओम विठ्ठला
पांडुरंग विठ्ठला
हरी ओम विठ्ठला ||

*  *  *  *  *



हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज आपण या पोस्टमध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.