Header Ads

नाथांच्या घरची उलटी खूण Lyrics | Nathanchya Ghari Ulati Khun



नमस्कार या पोस्टमध्ये आपण नाथांच्या घरची उलटी खूण Lyrics बघणार आहोत.

नाथांच्या घरची उलटी खूण Lyrics

नाथांच्या घरची उलटी खूण
पाण्याला मोठी लागली तहान || धृ ||

आत घागर बाहेर पाणी
पाण्याला पाणी आले मिळोनी
नाथांच्या घरची उलटी खूण.. || १ ||

आज मी एक नवल देखीले
वळचणीचे पाणी आढ्याला लागिले
नाथांच्या घरची उलटी खूण..|| २ ||

शेतकऱ्यांने शेत पेरले
राखणदाराला त्यान गिळले
नाथांच्या घरची उलटी खूण.. || ३ ||

अंडी खादली भात टाकीला
बकऱ्यांपुढे देव कापीला
नाथांच्या घरची उलटी खूण.. || ४ ||

एका जनार्दनी मार्ग उलटा
जो जाने तो गुरुचा बेटा
नाथांच्या घरची उलटी खूण.. || ५ ||

* * * * *




या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇👇



आज या पोस्टमध्ये नाथांच्या घरची उलटी खूण Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.