तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला Lyrics | Tujhya Pari Bhale Bhale
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला Lyrics बघणार आहोत.
तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला Lyrics | Marathi
मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नितीला,
गर्वाने तू फुगवू नको आपल्या त्या छातीला,
तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला..
मातीला मातीला... (*२)
तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला..
सख्या बापाला तुरे होऊ नको बेईमान,
यम फासा पडल्यावर होशील तू हैराण |
दुसऱ्याच्या मुखातून तुझा घास जर ओढशील,
खड्डा दुसऱ्यासाठी पण तूच त्यात पडशील ||
बायको मुलगा सखे सोयरे रडतील,
पापी कृत्य केल्याने नरकामध्ये बुडशील |
दोन्ही भूजा वरती दोन चित्रगुप्त पाहणार,
मानवाचा जन्म वेड्या पुन्हा नाही येणार ||
माय बापाला विसरू नको शरद जा त्या देवाला
भक्तीनेचा उद्धार होऊन मिटविन तुझ्या भ्रांतीला
तुझ्या परी भले भले
मिळाले या मातीला.. || १ ||
बालपण तुझं सारं खेळण्यात घालवलं,
तरुणपणी जीवन हे वासनेत चालवलं |
दारू गांजा बाईनी वर येईना संसार,
अहंकारी तोऱ्याने फिरू नको घर घर ||
बापाची कमाई होती जगण्याला आजवर,
आई बाप मेल्यावर तुरे काय करणार |
शहाणा असूनही सोंग घेऊ नको रे वेड्याचं,
झोपेमध्ये स्वप्न पाहू नको बंगला गाड्याचं ||
निर्जीव होता काया कुळी जळतील सरणाला,
रडतील थोडे दिवस चंदन येणार नाही साथीला
तुझ्या परी भले भले
मिळाले या मातीला.. || २ ||
*****
खालील भक्तिगीते पण जरूर वाचा 👇👇👇
तर आज या पोस्ट मध्ये आपण तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment