नाशवंत हा देह मानवा जाईल धरती खाली Lyrics | Nashvant Ha deh Manva
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण नाशवंत हा देह मानवा जाईल धरती खाली Lyrics बघणार आहोत.
सॉंग - नाशवंत हा देह
लिरिक्स - सोपान कोकाटे
प्रोडक्शन - श्री विलास कांबळे
कॉपीराइट्स - भक्ती व्हिडीओज एंटरटेनमेंट
नाशवंत हा देह मानवा जाईल धरती खाली Lyrics | Marathi
नको गर्वाची भाषा, आहे गर्वाचे घर खाली |
नाशवंत हा देह मानवा जाईल मातीखाली ||धृ ||
माती म्हणे कुंभाराला,
किती तुडवशी सांग रे मजला |
एक दिवस असाच येईल,
मातीमध्ये गाडील मी तुजला ||
बंगला अन् माडी गाडी, येथेच राहणार आहे रे
मेल्यावर माणसा तू मातीमध्ये जाणार आहे रे
भल्या भल्या त्या बलवानांच्या,
देहाची माती झाली...
नाशवंत हा देह मानवा जाईल मातीखाली ||१ ||
म्हणे लाकूड सुताराला,
किती तू रांगशिल मजला |
एक दिवस असाच येईल,
मीच जाळील अग्नीमध्ये तुजला ||
आला जन्मास तेव्हा पाळणा तो लाकडाचा रे
शाळेत गेला तेव्हा पाटी पळा तो लाकडाचा रे
जळताना त्या सरणावर लाकडे तुझ्यावर घाली
नाशवंत हा देह मानवा जाईल मातीखाली ||२ ||
म्हणे कापड शिंप्याला,
किती तू कापशील मजला |
एक दिवस असाच येईल,
मीच झाकून नेईल रे तुझा ||
जिवंत असताना तू, माझेच शिवशी रे कपडे
शिर्डी वर घालताना, माझ्याविना तुझे प्रेत ते उघडे
तुला मातीत घालण्यापूर्वी, वर माझे पांघरून घाली
नाशवंत हा देह मानवा जाईल मातीखाली ||३ ||
फुल मध्ये माळ्याला,
तू किती खूडशील रे मजला |
एक दिवस असाच येईल,
मीच सजवून नेईल रे तुजला| |
तुझे गणगोत मित्र हळहळतील ते फार
होऊन याच फुलांचा गळ्यामध्ये
तुझ्या घाल तिला हार
गुलाब पाणी अत्तर शिंपडून,वर माझ्या फुलांची लाली...
नाशवंत हा देह मानवा जाईल मातीखाली ||४ ||
मृत्यू अटळ आहे, कुणाचं कळणार नाही |
कधी येईल मृत्यू कूणासही कळणार नाही ||
आला जन्मास तो शेवटी मरणार आहे रे,
मेल्यावर कीर्ती रूपाने अमर तो ठरणार आहे रे |
कालिदासा तुझ्या जीवनाचा, तूच आहे रे वाली ||
नाशवंत हा देह मानवा जाईल मातीखाली ||५ ||
नको गर्वाची भाषा, आहे गर्वाचे घर खाली |
नाशवंत हा देह मानवा जाईल मातीखाली ||धृ ||
* * * * *
खालील भक्तिगीते पण जरूर वाचा 👇👇👇
- असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे Lyrics
- गर्वाने वागू नको भल्या माणसा Lyrics
- कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा Lyrics
- आई नाही बाप नाही आधार दे ना कोणी Lyrics
तर आज या पोस्ट मध्ये आपण नाशवंत हा देह मानवा जाईल धरती खाली Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment