बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं Lyrics | Belachya Panat Mala Bai Spadal Son
नमस्कार या पोस्टमध्ये आपण बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं Lyrics बघणार आहोत.
बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं Lyrics
बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं |
सापडलं सोनं महादेव पार्वती दोन || धृ ||
पहिल्या सोमवारी महादेव बसले आंघोळी |
बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी ||१||
दुसऱ्या सोमवारी दया दुधाच्या घागरी |
दह्या दुधाच्या घागरी अभिषेक होतो शंभू वरी || २ ||
तिसऱ्या सोमवारी तीळा तांदुळाच्या राशी
तांदुळाच्या राशी पार्वती बसली शंभू पाशी || ३ ||
चौथ्या सोमवारी महादेव बसले तपाला
बसले तपाला पार्वती बसली जपाला ||४ ||
पाचव्या सोमवारी बेल वाहते शंकराला
बेल वाहते शंकराला साखर शेंगदाणे नैवेद्याला || ५ ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment