गणपती भजन मराठी Lyrics | Ganapati Bhajan Lyrics Marathi
1. ओम गजानना ओम गजानना
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
सिंदूर चर्चित गणरायाचे
सिंदूर चर्चित गणरायाचे
नाम स्मरूया चला चला
नाम स्मरूया चला चला
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
तव नामाने श्री गणेशा
तव नामाने श्री गणेशा
ज्ञानाचे धन आम्हा दिधले
ज्ञानाचे धन आम्हा दिधले
ज्ञानाचे धन आम्हा दिधले
आद्यरूपतू सर्व कलांचा
आद्य रूप तू सर्व कलांचा
रंरंगमंचकी तुला पुजिले
रंरंगमंचकी तुला पुजिले
अंतर मनी या चिंतामणीचा
अंतर मनी या चिंतामणीचा
मंत्र भरुया चला चला
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
शिव गौरीच्या थोर नंदना
शिव गौरीच्या थोर नंदना
सदैव नमितो रूपास तुझीया
सदैव नमितो रूपास तुझीया
सदैव नमितो रूपास तुझीया
धूर्वापत्री त्रीयका संधी
धूर्वापत्री त्रीयका संधी
चरणी देवा तुझ्या वाहू या
चरणी देवा तुझ्या वाहूया
ध्यान लावणी करुनी आरती
ध्यान लावणी करून आरती
सारे गाऊ चला चला
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
सुखकर्ता तू दुखहर्ता रे
सुखकर्ता तू दुखहर्ता रे
तू हृदयीची मंगलमूर्ती
तू हृदयीची मंगलमूर्ती
तू हृदयीची मंगलमूर्ती
भांडू शुभंकर भावा आमचा
भांडू शुभंकर भावा आमचा
ही विनंती तुला गणपती
ही विनंती तुला गणपती
मंजिर माझे ताल निनादे
महिमा वर्णु चला चला
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
सिंदूर चर्चित गणरायाचे
सिंदूर चर्चित गणरायाचे
नाम स्मरूया चला चला
नाम स्मरूया चला चला
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
ओम गजानना ओम गजानना ओम गजानना
2. गणपती राया
गणपती राया पडते मी पाया
काय मागू मागणं रे
काय मागु मागणं रे देवा ...
काय मागू मागणं रे ...
तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा
तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा
आशीर्वाद राहू दे रे
हेच माझं सांगणं रे देवा ....
हेच माझं सांगणं रे
गणपती राया पडते मी पाया रे ....
नाही नवस सायास केले,
कधी यात्रेला नाही गेले
परी मनात मी पुजियेले
परी मनात मी पुजियेले
तुझ्या भक्तीने आता सुखाने
तुझ्या भक्तीने आता सुखाने
भरले घर अंगण रे
हेच माझं सांगणं रे देवा ...
हेच माझं सांगणं रे
गणपती राया पडते मी पाया रे ....
मोह सुखाचा नाही सोस,
तुझ्या नावाचा लागे ध्यास
आता अंतरी उरली आस
माझ्या कपाळी अखंड राहो
माझ्या कपाळी अखंड राहो
सौभाग्य चांदणं रे
हेच माझं सांगणं रे देवा ...
हेच माझं सांगणं रे
गणपती राया पडते मी पाया रे ....
आता मागणं मागू कशाला
माझा संसार सोन्याचा झाला
माझा संसार सोन्याचा झाला
सुख लाभलं माझ्या जीवाला
गुण भरदार माझी लेकरं
गुण भरदार माझी लेकरं
कर त्यांची राखणं रे
हेच माझं मागणं रे देवा ....
हेच माझं मागणं रे
तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा
तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा
आशीर्वाद राहू दे रे
हेच माझं सांगणं रे देवा...
हेच माझं सांगणं रे
हेच माझं सांगणं रे
गणपती राया पडते मी पाया
गणपती राया पडते मी पाया
काय मागू मागणं रे,
काय मागु मागणारे देवा...
काय मागु मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा ...
हेच माझं मागणं रे
गणपती राया पडते मी पाया रे ...
3.दहा दिवसाचा गणपती आला
दहा दिवसाचा गणपती आला,
आला आपुल्या घरी ....
तुझी रे भक्ती माझ्या अंतरी ||धृ ||
शंकर पार्वती माता पिता,
सर्व जगाचा तू गणनाथा
अक्षद कुंकू बेल वाहुनी, दूर्वा डोक्यावरी ||१ ||
दहा दिवसाचा गणपती आला,
आला आपुल्या घरी ....
मोदक लाडू आवडे तुला रे,
दर्शन येती ते भक्तजन सारे
दर्शन घेता दुःख हरले, मस्तक चरणावरी ||२ ||
दहा दिवसाचा गणपती आला,
आला आपुल्या घरी ....
धावून येती तू संकटाला,
साह्य देई तू फक्त जनाला
मंगल आरत्या गीत गाऊनी, आनंद घरोघरी || ३||
दहा दिवसाचा गणपती आला,
आला आपुल्या घरी ....
दास वीणवती तुम्हा गणराया,
हात जोडूनी पडते मी पाया,
भाव भक्तीने पुजिते तुजला, धावून ये लवकरी ||४ ||
दहा दिवसाचा गणपती आला,
आला आपुल्या घरी ....
4. पार्वती कुठून
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली माती
घडविला गणपती ...
पार्वती पार्वती ...
कुठून आणली माती घडविला गणपती
गणपतीला गुलाल मान,
हनुमंताला दिसतो शेंदूर छान
गणपतीला गुलाल मान,
हनुमंताला दिसतो शेंदूर छान
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
गणपतीला दुर्वांचा मान,
हनुमंताला रुई फुल छान
गणपतीला दुर्वांचा मान,
हनुमंताला रुई फुल छान
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
गणपतीला मोदक मान,
हनुमंताला दिसे बेडी छान
गणपतीला मोदक मान,
हनुमंताला दिसे बेडी छान
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
गणपतीला घरोघरी मान,
हनुमंत पारावर छान
गणपतीला घरोघरी मान,
हनुमंत पारावर छान
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
गणपतीला उंदरांचे वाहन,
हनुमंताला स्त्रियांची आन
गणपतीला उंदरांचे वाहन,
हनुमंताला स्त्रियांची आन
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
गणपती म्हणे रिद्धी सिद्धी चारी,
हनुमंत म्हणे बालब्रह्मचारी
गणपती म्हणे रिद्धी सिद्धी चारी,
हनुमंत म्हणे बालब्रह्मचारी
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
अगं पार्वती, पार्वती कुठून आणली
माती घडविला गणपती ...
5. शंकराच्या पिंडीवर
शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर
शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर
बाई माझा गणपती कसा शोभतो
बाई माझा गणपती कसा शोभतो
माणसासारखे देवा आहे तुझे तोंड
माणसासारखे देवा आहे तुझे तोंड
हत्ती सारखे देवा आहे तुझी सोंड
हत्ती सारखी देवा आहे तुझी सोंड
सर्वांआधी मिळून तुला नमन करीतो
बाई माझा गणपती कसा दिसतो
बाई माझा गणपती कसा दिसतो
भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला,
घरोघरी देवा तुझ्या आरतीला
सर्वांआधी मिळून तुला नमन करीतो
बाई माझा गणपती कसा दिसतो
गळ्यामध्ये सोन्याची कंठी माळ
पायामध्ये आहे घुंगरांचे चाळ
शिरेवरी सोनेरी मुकुट शोभतो
बाई माझा गणपती कसा शोभतो
आम्ही बालक आलो तुझ्या दारी
आम्हा संकटातून तूच तारी
सर्वांआधी मिळून तुला नमन करीतो
बाई माझा गणपती कसा दिसतो
शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर
बाई माझा गणपती कसा दिसतो
6. गणपती आले
गणपती आले चतुर्थीच्या सणाला
नाचती भक्त आनंद झाला मनाला ||धृ ||
अंगी शेंदुराची उटी हाती मोदकाची वाटी
अंगी शेंदुराची उटी हाती मोदकाची वाटी
एकवीस मोदक वाटुया ग गनाला ||१||
गणपती आले चतुर्थीच्या सणाला
नाचती भक्त आनंद झाला मनाला
पिवळा पितांबर,
भरजरी मुकुट शोभे माथ्यावरी
पिवळा पितांबर,
भरजरी मुकुट शोभे माथ्यावरी
उंदीर वाहन शोभे या गं गणाला ||२||
गणपती आले चतुर्थीच्या सणाला
नाचती भक्त आनंद झाला मनाला
पार्वतीचा नंदन तोडी दुःखाचे बंधन
पार्वतीचा नंदन तोडी दुःखाचे बंधन
गणपती बाप्पा मोरया गं गणाला ||३||
गणपती आले चतुर्थीच्या सणाला
नाचती भक्त आनंद झाला मनाला
रिद्धी सिद्धी चा नायक याचे रूप अनेक
रिद्धी सिद्धी चा नायक याचे रूप अनेक
मंगलमूर्ती पुजुया ग गणाला ||४||
गणपती आले चतुर्थीच्या सणाला
नाचती भक्त आनंद झाला मनाला
7. गणेशा तुझी रे नोकरी
गणेशा तुझी रे नोकरी, तारूण नेई या भवसागरी
सुरू करता तुझी रे सेवा, माझे दुःख कष्टसरले देवा
तारूण नेई या भवसागरी, गणेशा तुझी रे नोकरी
तारूण नेई या भवसागरी
मी झालो रे दास तुझा, जनलोकी नाव झाले माझे
तुझी कृपा झाली मजवरी,
तारूण नेई या भवसागरी
गणेशा तुझी रे नोकरी ,तारूण नेई या भवसागरी
सांज सकाळी पूजता तुला, अत्यानंद होईल रे मला
संकटी धावशी तू सत्वरी, तारूण नेई या भवसागरी,
गणेशा तुझी रे नोकरी, तारूण नेई या भवसागरी
आम्हा भक्तांचा वाली खरा रक्षण करशी तू लंबोदरा
तूच आमचा रे कैवारी, तारूण नेई या भवसागरी,
गणेशा तुझी रे नोकरी, तारूण नेई या भवसागरी
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- Bal Bhakta Lage Lyrics Marathi
- Hridayachya Talawar Nache Ganeshu Lyrics
- Utha Utha Ho Sakalik Lyrics
- Omkar Swarupa Lyrics In Marathi
हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
Post a Comment