Header Ads

Utha Utha Ho Sakalik Lyrics | उठा उठा हो सकळिक


नमस्कार मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण Utha Utha Ho Sakalik Lyrics बघणार आहोत. हे गणपती बाप्पांचे खूप सुंदर भक्तीगीत आहे. हे गीत लता मंगेशकर यांनी गायलेलंआहे. चला बघूया उठा उठा हो सकळिक या भक्तिगीताचे बोल -


भक्तीगीत - उठा उठा हो सकळिक
अल्बम - प्रभात गीते
सिंगर - लता मंगेशकर
लिरिक्स - रामानंद
म्युझिक - पं. हृदयनाथ मंगेशकर



Utha Utha Ho Sakalik Lyrics | Marathi


उठा उठा हो सकळिक, 
 वाचे स्मरावा गजमुख
रिद्धी सिद्धीचा नायक ,
सुखदायक भक्तांसी

उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख

अंगी शेंदुराची उटी ,माथा शोभतसे किरीटी
केसर कस्तुरी लल्लाटी, हार कंठी साजिरा

उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख

कानी कुंडलांनी प्रभा , सूर्य चंद्र जैसे नभा
कानी कुंडलांनी प्रभा , सूर्य चंद्र जैसे नभा

माजी नागबंदी शोभा , स्मरती उभा जावळी तो
उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख

हाती मोदकांची वाटी, रामानंद स्मरता कंठी
हाती मोदकांची वाटी, रामानंद स्मरता कंठी

तो संकटी पावतो
उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख




हे पण वाचा 👇👇👇



तर आज आपण Utha Utha Ho Sakalik Lyrics बघितले. अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.