Header Ads

अरे नंदाच्या कान्हा तुझी आठवण रे गवळण Lyrics | Are Nandachya Kanha Tujhi Athvan Re Yei



नमस्कार या पोस्टमध्ये आपण अरे नंदाच्या कान्हा तुझी आठवण रे गवळण Lyrics बघणार आहोत.

अरे नंदाच्या कान्हा तुझी आठवण रे गवळण Lyrics

अरे नंदाच्या कान्हा, तुझी आठवण रे येई |
अरे गवळ्याच्या पोरा, तुझी आठवण येई ||
तुला बोलावं वाटतया,तुला भेटावं वाटतया |
तुझ्या प्रेमा पाई || धृ||

तुला बघून निरखून, मन गेलया हरपून |
माझ्या डोईची घागर, गेली खालीच सरकून ||
अरे नंदाच्या कान्हा.. || १ ||

कृष्णाच्या गवळणी lyrics


मी गवळ्याची गवळण राधा |
दह्या दुधाचा माझा धंदा ||
अडवू नको रे तू गोविंदा |
हा नंदाचा कान्हा, माझ्या हृदयात राही ||
तुला बोलावं वाटतया... || २ ||

एका जनार्दनी राधा लागली हरीच्या नादा |
राधा लागली हरीच्या नादा,सोडूनी कामधंदा ||
हा नंदाचा कान्हा माझ्या हृदयात राही |
तुला बोलावं वाटतया... || ३ ||

अरे नंदाच्या कान्हा, तुझी आठवण रे येई |
अरे गवळ्याच्या पोरा, तुझी आठवण येई ||
तुला बोलावं वाटतया,तुला भेटावं वाटतया |
तुझ्या प्रेमा पाई || धृ||

* * * * *



हे पण नक्की वाचा 👇👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण अरे नंदाच्या कान्हा तुझी आठवण रे गवळण Lyrics बघणार आहोत.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!  🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.