Header Ads

कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा विठ्ठला Lyrics | Vithal Bhajn



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा विठ्ठला Lyrics बघणार आहोत.

कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा विठ्ठला Lyrics | Marathi

कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात |
खरं सांगा विठ्ठला जनी संगे काय नातं || धृ ||

विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
आंघोळीला टाक पाणी |
मी नाही टाकत पाणी जनी तुमची पट्टरानी ||
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे... || १ ||

विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
जेवायला वाढ ताट |
मी नाही वाढत ताट,
ज्यांनी तुमच्या हृदयात ||
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे... || २ ||

विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
पानाचा काढ विडा |
मी नाही काढत विडा,
जनी चा नाद सोडा ||
कमानी दरवाजाला रुक्मिणीचे... || ३ ||

विठ्ठल म्हणे रुक्मिणीला,
नको लावू असे पाप |
जनी आहे आपूली लेक,
आपण तिचे मायबाप || ४ ||

* * * * * *



हे पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा विठ्ठला Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.