बाग फुलाची कळी सुकली का गवळण | Bag Fulachi Kali Lyrics In Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण बाग फुलाची कळी सुकली का गवळण बघणार आहोत. राधा कृष्णाची खूप सुंदर अशी ही गवळण आहे.
बाग फुलाची कळी सुकली का गवळण
बाग फुलांची कळी सुकली का ?
माझी तू राधिका...
प्रीत पाखरा... खरंच माझ्या तू फुलपाखरा..
माझ्या जवळ ये ना तू ग राधिका || धृ ||
तुझ्या प्रीतीचे हे आज वर्णन गाऊ दे
तुझी माझी प्रीत राधे गगन भिडू दे
काही सूचना काही कळेना..
तुझ्याविना राधिका.. || १ ||
प्रीत पाखरा... खरंच माझ्या तू फुलपाखरा..
माझ्या जवळ ये ना तू ग राधिका...
यमुनेच्या नदीकिनारी, वेडा तुझा श्रीहरी
वाट तुझी पाहतो राधे, ये ना लवकरी
नको वाटे माझी कुणी सवंगडी
कुणी जिवाचा सखा...|| २ ||
प्रीत पाखरा... खरंच माझ्या तू फुलपाखरा..
माझ्या जवळ ये ना तू ग राधिका..
प्रीतीचे हे वेड आज, साऱ्यांना दिसू दे
तुझी माझी प्रीत साऱ्यांच्या हृदयी ठसू दे
जराशी रुसवा, मनात फूसवा
उगाच बसली ग...||३ ||
प्रीत पाखरा... खरंच माझ्या तू फुलपाखरा..
माझ्या जवळ ये ना तू ग राधिका..
एका जनार्दनी आनंद हा झाला
सेवा तुझी पाहून राधे धावतो हाकेला..
विसरू नको ग सावळ्या हरीला
बोले ध्यानी बसला का... || ४ ||
प्रीत पाखरा... खरंच माझ्या तू फुलपाखरा..
माझ्या जवळ ये ना तू ग राधिका..
☘ ☘ ☘ ☘
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- कुंती सांगते देवाला अभंग Lyrics
- गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी Lyrics
- कुण्या गावाची आली गवळण Lyrics
- आल्या पाच गवळणी Lyrics
तर आज या पोस्टमध्ये आपण बाग फुलाची कळी सुकली का गवळण बघितली. अधिक भक्ती संबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. !!!!!!!
Post a Comment