देवीचे भजन मराठी Lyrics | नवरात्र स्पेशल भजनांचा संग्रह
नमस्कार मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण देवीचे भजन मराठी Lyrics बघणार आहोत. देवीची सर्वच रूपे खूप सुंदर आणि मनमोहक असतात त्यांचे वर्णन करणारी सुंदर भजनांचा संग्रहच आपण इथे बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला अंबाबाईचे, रेणुका मातेचे तसेच नवरात्रीविशेष भजने वाचायला मिळतील. मला आशा आहे कि तुम्हाला हि भजने नक्की आवडतील. चला तर मग वळूया देवीच्या भजनांकडे -
![]() |
देवीचे भजन मराठी Lyrics |
1. पैंजणाचा नाद आला
पैंजणाचा नाद आला गोड कानी ग
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग || धृ ||
पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेउनी |
वैभवाचे सारे साज गाला घालुनी |
कोल्हापूरची महालक्ष्मी घरी आली ग |
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण अली ग || १ ||
हिरवा रंग अति खुलवी रूप सुंदर |
हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर |
जय भवानी तुळजापूरची घरी आली ग |
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण अली ग || २ ||
पाही वळूनी दारातुनी माय माउली |
भक्तरक्षणा अष्टभुजा केली धरणी |
सप्तशृंगीची देवी आली आता बाई ग |
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण अली ग || ३ ||
रूप हिचे ग लावण्याचे रंगे तांबूल |
माहूर गडाची रेणुका हि शालू हि लाल |
लेकीला या बघण्या माझ्या दारी आली ग |
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण अली ग || ४ ||
माय माउली कुलस्वामिनी दारी आली ग |
पाऊल दिसता लोटांगण दासी घाली ग |
कालिका देवी, अंबाबाई दारी आली ग |
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण अली ग || ५ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
2. नवरात्री विशेष - दुर्गा माता मूर्ती तुझी
दुर्गा माता मूर्ती तुझी लावील वेड मला
काय सांगू तुला ,
मला दर्शन दे , दर्शन दे , दर्शन दे || धृ ||
घटस्थापना केली ग या अश्र्विन महिन्यात
शुद्ध प्रतिपदेला तू आली भक्तांच्या घरात
भोळी भाव भक्त तुझी मी मला जवळ घे
मला दर्शन दे , दर्शन दे, दर्शन नऊ दे || १ ||
व्याघ्रसिंह हे आसन आई तुला बसण्यासाठी
तुझा भंडारा घेण्याला भक्त करतात लोटालोटी
निज भक्तांच्या संकट काळी आई तू धावून ये
मला दर्शन दे , दर्शन दे, दर्शन नऊ दे || २ ||
दुष्ट असुर माराया आई तुझा अवतार
दागदागिने अंगावर तुला पूजिती घरोघर
हाती शस्त्र घेऊन ये अभय आम्हा दे
मला दर्शन दे , दर्शन दे, दर्शन नऊ दे || ३ ||
छत्रपती शिवाजीस आई दिलीस तू तलवार
आम्हा महाराष्ट्रीयांना आई तुझाच आधार
अष्टभुजा अंबिका तुझा सोहळा जगी राहू दे
मला दर्शन दे , दर्शन दे, दर्शन नऊ दे || ४ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
3. कुंकू लावू या ग
कुंकू लावू या ग , कुंकू लावू या
आपण साऱ्या सुवासिनी कुंकू लावू या || धृ ||
किती हिऱ्याचा मेखला, कंठी शोभे मुक्तिहारा
अशा महालक्ष्मीला कुंकू लावू या || १ ||
करी धरी तलवारीला भाळी कुंकुमाचा टिळा
अशा भवानीला आपण कुंकू लावू या || २ ||
मयूरचे ते वाहन, नित्य वीणेचे वंदन
अशा सरस्वतीला आपण कुंकू लावू या || ३ ||
मुखी तांबूल शोभला , स्थान तिचे माहूरला
अशा रेणुकेला आपण कुंकू लावू या || ४ ||
कुंकू लावू या ग , कुंकू लावू या
आपण साऱ्या सुवासिनी कुंकू लावू या ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
4. झाल्या तिन्ही सांजा
झाल्या तिन्ही सांजा, करून स्वयंपाक ताजा
उघड ग अंबे दरवाजा, नैवेद्य आला माझा || धृ ||
पहिला नैवेद्य कळंना कोंडाचा
मान तुला देते आई हळदी कुंकवाचा
झाल्या तिन्ही सांजा, करून स्वयंपाक ताजा
उघड ग अंबे दरवाजा, नैवेद्य आला माझा || १ ||
दुसरा नैवेद्य दही भाताचा
मान तुला देते आई हिरव्या चुड्याचा
झाल्या तिन्ही सांजा, करून स्वयंपाक ताजा
उघड ग अंबे दरवाजा, नैवेद्य आला माझा || २ ||
तिसरा नैवेद्य खीर पुरीचा
मान तुला देते आई खान नारळाचा
झाल्या तिन्ही सांजा, करून स्वयंपाक ताजा
उघड ग अंबे दरवाजा, नैवेद्य आला माझा || ३ ||
चवथा नैवेद्य पुरणपोळीचा
मान तुला देते आई हिरव्या साडीचा
झाल्या तिन्ही सांजा, करून स्वयंपाक ताजा
उघड ग अंबे दरवाजा, नैवेद्य आला माझा || ४ ||
पाचवा नैवेद्य मोठ्या भांडाराचा
आशीर्वाद दे ग आई सुखी संसाराचा
झाल्या तिन्ही सांजा, करून स्वयंपाक ताजा
उघड ग अंबे दरवाजा, नैवेद्य आला माझा || ५ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
5. भवानीचे भजन
काय सांगू बाई भवानीच माझ्या नटन
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || धृ ||
अंगात चोळी भिंगाची, त्यावर नक्षी मोराची
मोराची नक्षी कशी दिसते उठून
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || १ ||
गल्ल्यात गरसोळी कवड्याच्या माळा
केसांचा पाडला अंबाडा
अंबाड्यावर मोत्याच्या जाळीच गुंफण
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || २ ||
साडी नेसली हिरवी त्यावर विणकाम कोरली
हळदी कुंकू भंडारा दिसतो शोभून
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || ३ ||
हातात आईच्या परडी
येऊन उभी मंदिरी
गोंधळाला झाली जनतेची बाई दाटन
सोन्याचं डोरलं बोटात जोडवं ठासून || ४ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
6. पाना पानात देवी तुझं नाव ग
पाना पानात देवी तुझं नाव ग
मला वाटत डोंगराला जावं ग ........(2times)
तुझ्या डोंगराला मी ग येते
तुझ्या तळ्यात मी ग न्हाते
पाना पानात देवी तुझं नाव ग
मला वाटत डोंगराला जावं ग || १ ||
तुझ्या डोंगरी उन्हाचा कहर
वनस्पतीला आला ग बहर
पाना पानात देवी तुझं नाव ग
मला वाटत डोंगराला जावं ग || २ ||
लेक दुबळ्यांची आली मी तुझ्या दारी
छाया राहू दे ग माझ्यावरी
पाना पानात देवी तुझं नाव ग
मला वाटत डोंगराला जावं ग || ३ ||
आले चालत मी तुझ्या दारी
भगवं निशाण तुझ्या शिखरावरी
पाना पानात देवी तुझं नाव ग
मला वाटत डोंगराला जावं ग || ४ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
7. ये ग अंबे भजनाला धावून ये
ये ग अंबे भजनाला धावून ये |
सुंदर साडी सावरीत ये ग |
चंदेरी काठ त्याचा आवरत ये ग |
ये ग अंबे भजनाला धावून ये || धृ ||
गाईन मंजुळ गीत तुझे ग |
पैंजण रुणझुण वाजवीत ये ग |
ठेक्यावर ताल माझा ठुमकत ये ग |
ये ग अंबे भजनाला धावून ये || १ ||
नवीन तुजला हार तुरे ग |
गुलाल बुक्का चं चं गाली |
सौन्दर्याचा मोर पिसारा फुलवीत ये |
ये ग अंबे भजनाला धावून ये || २ ||
तूच तुकाई तुळजापूरची |
माय भवानी शोभे वाघावरची |
नयनी काजल ओठी तांबूल रंगुनी ये |
ये ग अंबे भजनाला धावून ये || ३ ||
ये ग अंबे भजनाला धावून ये |
सुंदर साडी सावरीत ये ग |
चंदेरी काठ त्याचा आवरत ये ग |
ये ग अंबे भजनाला धावून ये ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
8. रेणुका देवीचे भजन
कुण्या गावाची आली बाई देवी
रेणुका नावाची आंबा माझी माहूर गडाची ....(2times)
आली वाघावरी हि स्वारी ....(2times)
हाती तलवार त्रिशूल भारी ....(2times)
अष्टभुजा नावाची आंबा माझी माहूर गडाची ..(2times) || १ ||
पिवळे पातळ बुट्टीदार ....(2times)
अंगी चोळी ती हिरवीगार ....(2times)
कुरळ्या केसाची आंबा माझी माहूर गडाची ....(2times) || २ ||
जोडवे मासोळ्या पैंजण चाळ ....(2times)
वरती वाजती घुंगराची माळ ....(2times)
हौस मोठी नाचायची आंबा माझी माहूर गडाची..(2times) || ३ ||
मुखी तांबूल पाचशे पानाचा ....(2times)
मुखी कमळी रंग लालीचा ....(2times)
ओटी खान नारळाची आंबा माझी माहूर गडाची...(2times) || ४ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
9. अंबादेवीचे नवसाला पावणारे भजन
भक्तीचा लळा लावूनी, भक्तीचा लळा लावूनी
अंबा आली घरी पाहुनी, अंबा आली घरी पाहुनी || धृ ||
शुभ्र साडी हि बुट्टेदार, हाती वीणेचा झनकार
सरस्वतीच्या
सरस्वतीच्या रूपातून अंबा आली घरी पाहुनी
भक्तीचा लळा लावूनी, अंबा आली घरी पाहुनी || १ ||
रंग डाळिंब ह्या शालूचा हाथ शोभे अलंकाराचा
लक्ष्मीच्या ह्या
लक्ष्मीच्या ह्या रूपातून अंबा आली घरी पाहुनी
भक्तीचा लळा लावूनी, अंबा आली घरी पाहुनी || २ ||
प्रभू हाचि वर करील माता रेणुका म्हणती तीला
परशुरामाची
परशुरामाची हि जननी अंबा आली घरा पाहुनी
भक्तीचा लळा लावूनी, अंबा आली घरी पाहुनी || ३ ||
हाथ पाठीवरी फिरविला, महाप्रसाद हा दिधला
झाला आनंद
झाला आनंद माझ्या मनी, अंबा आली घरी पाहुनी
भक्तीचा लळा लावूनी, अंबा आली घरी पाहुनी || ४ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
10. चांदण चांदण झाली रात
चांदण चांदण झाली रात
भक्त आले ग अंबे तुझ्या दारात
अंबाबाईचा बघाया न्यारा थाट
भक्त आले ग अंबे तुझ्या दारात || धृ ||
दागिने घेऊन येणार ग
कोल्हापूरचा सोनार ग
अंबाबाईचा बघाया न्यारा थाट
भक्त आले ग अंबे तुझ्या दारात || १ ||
पुण्याचा माळी येणार ग
अंबेला फुलहार आणणार ग
हात जोडुनी कराया भक्ती पाठ
भक्त आले ग अंबे तुझ्या दारात || २ ||
अंबेचा पुजारी येणार ग
पहाटेची आरती करणार ग
महापूजेचे घेऊन हाती ताट
भक्त आले ग अंबे तुझ्या दारात || ३ ||
तुळजापूरचा हलवाई येणार ग
नवरंगी मिठाई आणणार ग
आई अंबेचा प्रसाद मिळणार आज
भक्त आले ग अंबे तुझ्या दारात || ४ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
11. देवीच्या विविध रुपावरील भजन
दंडवत सांगा माझा दंडवत सांगा
दंडवत सांगा माझा दंडवत सांगा || धृ ||
कोल्हापूरच्या अंबाबाईला , तुळजापूरच्या भवानीला
माहूरच्या रेणुकेला दंडवत सांगा || १ ||
सप्तशृंगी जगदंबेला, म्हैसूरच्या चामुंडेला
काशीच्या अन्नपूर्णेला दंडवत सांगा || २ ||
शिवनेरीच्या शिवाईला, प्रतापगडाच्या भवानीला
पुण्याच्या पार्वतीला दंडवत सांगा || ३ ||
कांचिपुरच्या कामाक्षीला, मदुराईच्या मीनाक्षीला
देवी कन्याकुमारीला दंडवत सांगा || ४ ||
अष्टभुजा पद्मावतीला, चतुःशृंगीच्या जोगेश्वरीला
देवी अंबे जोगाईला दंडवत सांगा || ५ ||
कलकत्त्याच्या कालिकेला, कारल्याच्या एकवीरेला
गोव्याच्या शांतादुर्गेला दंडवत सांगा || ६ ||
वज्रेश्वरी शारदाईला, सरस्वती शाकंबरी
सर्वशक्ती गायत्रीला दंडवत सांगा || ७ ||
सप्तशृंगी व्याघ्राम्बरीला, संतोषी शितळादेवीला
पतिव्रता सीतादेवीला दंडवत सांगा ||८ ||
आशागडच्या संतोषीला, डहाणूच्या महालक्ष्मीला
विरारच्या जीवदानाला दंडवत सांगा || ९ ||
दंडवत सांगा माझा दंडवत सांगा
दंडवत सांगा माझा दंडवत सांगा
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
12. अखंड राहो माझं सौभाग्याचं लेणं
मागते मी आई तुला फक्त एक दान
अखंड राहो माझं सौभाग्याचं लेणं || धृ ||
कुंकू मंगळसूत्र चुडा ओटीच लेणं,
तुझ्या हाती आहे आई करावे जतन,
तुझी कृपा होता आई, होई जीवनाचं सोन
अखंड राहो माझं सौभाग्याचं लेणं || १ ||
जगदंब रूप पाहता आनंदाला मन,
विसरून गेले आई सर्व देह भान,
तुझे रूप नैनी राहो, राहो तुझे ध्यान,
अखंड राहो माझं सौभाग्याचं लेणं ||२ ||
सुचेना मला काही आहे मी अज्ञान,
अल्प सेवा घ्यावी माझी आई स्वीकारून,
धाव घेत चरणावरी करिते नमन,
अखंड राहो माझं सौभाग्याचं लेणं || ३ ||
अखंड राहो माझं सौभाग्याचं लेणं
अखंड राहो माझं सौभाग्याचं लेणं ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
13. रेणुकादेवीचे भजन (जोगवा )
माहूर गडावरी ग माहूर गडावरी तुझा वास ग |
भक्त येतील दर्शनास || धृ ||
पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार |
अंगी चोळी ती हिरवीगार |
पीतांबराची ग पीतांबराची खोविलीं कास || १ ||
बिंदी बिजवरा ग बिंदी बिजवरा भाळी शोभे |
कानी कपाचे सुंदर झुबे |
तुझ्या नाथिला ग तुझ्या नाथिला हिरवे घोस || २ ||
सरठुशीत ग सरठुशीत मोहनमाळ |
जोडवे मासोळ्या पैंजण चाळ |
पत्ता सोन्याचा ग सोन्याचा शोभेसं कमरेस || ३ ||
जाईजुईची ग जाईजुईची आणली फुले |
तुरे हार माळून गुंफियले |
माळ गळ्यात ग शोभे गाजर हा वेणीत || ४ ||
तुला बसायला ग बसायला चंदनाचा पाट |
तुला जेवायला चांदीचे ताट |
पुरणपोळीचा ग पुरणपोळीचा भरविते घास || ५ ||
मुखी तांबूल ग तांबूल पाच पानाचा |
मुखकमळी रंग लालीचा |
ओटी खानाची ग वरी ठेविते नराळास || ६ ||
माझ्या मनाची ग मनाची मानस पूजा |
प्रेमे अर्पियली अष्टभुजा |
मनी धारावी ग मनी धारावी द्रुढ आस || ७ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–
हे पण वाचा :
- Top 10 Navratri Bhajan Lyrics Marathi
- Pahili Aarti Manachi Lyrics In Marathi
- Mitha Pithacha Jogwa Lyrics
- Chandan Chandan Zali Raat
- नवरात्रीनिमित्त स्पेशल देवीची भजने
तर मित्रानो आज आपण देवीचे भजन मराठी Lyrics बघितले ज्यामध्ये आपण देवीचे १३ भजने बघतली. अशाच भक्तीसंबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!!!!!!
🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा