Header Ads

Devi Bhajan Lyrics | नवरात्रीनिमित्त स्पेशल देवीची भजने



नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपण Devi Bhajan Lyrics बघणार आहोत. इथे तुम्हाला देवीची जी वेगवेगळी रूपे असतात, तशी वेगवेगळ्या देवींची भजने वाचायला मिळतील. चला तर मग बघूया देवीची भजने -

    अंबाबाईचे भजन


    देखणी देखणी अंबामाय
    रूप आईचे वर्णन करू मी काय ? || धृ ||

    शंभर नंबरी नाकात नाथनी मोत्याची
    सर मोत्याचा नाभीत जडला हाय
    आठवण येता भक्ताची गळ्यात माळ ती पुतळ्याची
    गोल पुतळ्यावर कोरीव अक्षर हाय
    देखणी देखणी अंबामाय
    रूप आईचे वर्णन करू मी काय ? || १ ||

    साखळीला आकडा बांधिला कमरेला पत्ता चढविला
    चंद्रहारावर रत्नांची कुंपण हाय
    देखणी देखणी अंबामाय
    रूप आईचे वर्णन करू मी काय ? || २ ||

    कुंकवाचा मळवट शोभतो, हिरवा चुडा शोभतो
    काच बिल्लोरी हातभार बांगड्या हाय
    देखणी देखणी अंबामाय
    रूप आईचे वर्णन करू मी काय ? || ३ ||

    पायात जोडवे भरीव डोक्यावर ओढणी जडीत
    खान नारळांनी ओटी हि भरली हाय
    देखणी देखणी अंबामाय
    रूप आईचे वर्णन करू मी काय ? || ४ ||



    तुळजा भवानी मातेचे भजन



    का ग तुळजा आई तू ध्यानात मनात
    चल जागा देते तुला माझ्या हृदयात || धृ ||

    तुळजामातेला नक्षीदार साडी
    अंगात तिच्या चोळी भरजरी
    पाहुनी तिला समाधान वाटलं
    चल जागा देते तुला माझ्या हृदयात || १ ||
    का ग तुळजा आई तू ध्यानात मनात
    चल जागा देते तुला माझ्या हृदयात

    तुळजाईला शोभती हिरव्या बांगड्या
    पायी छनन वाजती पैंजण तोड्या
    रूप तिचे पाहून मन भारावलं
    चल जागा देते तुला माझ्या हृदयात || २ ||
    का ग तुळजा आई तू ध्यानात मनात
    चल जागा देते तुला माझ्या हृदयात

    तुळजाई खेळते गरब्याचा खेळ
    सावरते आई पैठणीचा घोळ
    दर्शन घेताच धान्य झाले जीवन
    चल जागा देते तुला माझ्या हृदयात || ३ ||
    का ग तुळजा आई तू ध्यानात मनात
    चल जागा देते तुला माझ्या हृदयात


    सप्तशृंगी मातेचे भजन



    सुटला गार वारा डोंगर झाडीत
          शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत .....(2times)    || धृ ||

    सप्तशृंगी आईचा डोंगर हिरवा गार
    डोंगर हिरवा गार वरती हवा थंडगार
    दर्शनाला जायचं घुंगराच्या गाडीत
    शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत || १ ||
    सुटला गार वारा डोंगर झाडीत
    शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत

    घुंगराच्या गाडीला खिल्लारी बैल जोडी
    खिल्लारी बैल जोडीला ओढी घुंगराची गाडी
    पायरी पायरी जाईन मी नारळ फोडत
    शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत || २ ||
    सुटला गार वारा डोंगर झाडीत
    शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत

    सप्तशृंगी बसली माहूर गडावरी
    माहूर गडावरी आहे अंबाबाईची झाडी
    अंबाबाईच्या झाडीत अंबा तुझा झुला झुलत
    शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत || ३ ||
    सुटला गार वारा डोंगर झाडीत
    शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत

    दोन्ही हातामध्ये शोभे बाजूबंद छान
    बाजूबंद छान सार शोभविल लेन
    गाळ्यामधल्या पुतळ्या सोन्याच्या कळीत
    शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत || ४ ||
    सुटला गार वारा डोंगर झाडीत
    शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत



    अनुसया मातेचे भजन


    जगदंबा अनुसया धावत येशील का ? ...(2times)
    टाळ वीणा खंजिरी आले तुझ्या मंदिरी
    दर्शन देशील का ?? ....(2times )         || धृ ||


    पहिल्या पायरीवर जणी आणि सखू        ...(2times)
    आईला आवडे हळद आणि कुंकू          ...(2times)
    जगदंबा अनुसया धावत येशील का ?
    टाळ वीणा खंजिरी आले तुझ्या मंदिरी
    दर्शन देशील का ??              || १ ||

    दुसऱ्या पायरीवर बेलाचे पान          ...(2times)
    आईला आवडे हिरवा खन             ...(2times)
    जगदंबा अनुसया धावत येशील का ?
    टाळ वीणा खंजिरी आले तुझ्या मंदिरी
    दर्शन देशील का ??                || २ ||

    तिसऱ्या पायरीवर नारळ पेढा          ...(2times)
    आईला आवडे हिरवा चुडा             ...(2times)
    जगदंबा अनुसया धावत येशील का ?
    टाळ वीणा खंजिरी आले तुझ्या मंदिरी
    दर्शन देशील का ??             || ३ ||

    चवथ्या पायरीवर तूप आणि साखर           ...(2times)
    आईला आवडे भाजी आणि भाकर          ...(2times)
    जगदंबा अनुसया धावत येशील का ?
    टाळ वीणा खंजिरी आले तुझ्या मंदिरी
    दर्शन देशील का ??                    || ४ ||

    कमलासुत म्हणे अनुसया माता             ...(2times)
    तुझ्या चरणावरी ठेविते माथा                ...(2times)
    जगदंबा अनुसया धावत येशील का ?
    टाळ वीणा खंजिरी आले तुझ्या मंदिरी
    दर्शन देशील का ??                     || ५ ||



    रेणुका मातेचे भजन


    आंब्याच्या झाडाखाली चंदनाच्या पाटावरी
    रेणुका माय माझी झुला झुलते
    भवानी आई माझी झुला झुलते || धृ ||

    आई आंब्याच्या झाडाला झुला बांधिला
    आई झुल्याला चंदनाचा पाट लाविला
    आई रेणुका पाळण्यात छान दिसते
    आंब्याच्या झाडाखाली चंदनाच्या पाटावरी
    रेणुका माय माझी झुला झुलते
    भवानी आई माझी झुला झुलते || १ ||

    हिरव्या रंगाची साडी चोळी अंगावरी
    आई झुल्यात झुलते माय माउली
    अंगावर तिच्या लाल चुनरी उडते
    आंब्याच्या झाडाखाली चंदनाच्या पाटावरी
    रेणुका माय माझी झुला झुलते
    भवानी आई माझी झुला झुलते || २ ||

    आई आंब्याच्या झाडाला झुला बांधला
    आई झुल्याला रेशमाचा दोर बांधला
    रेणुका नाव कस मनी वसते
    आंब्याच्या झाडाखाली चंदनाच्या पाटावरी
    रेणुका माय माझी झुला झुलते
    भवानी आई माझी झुला झुलते || ३ ||



    दुर्गा देवीचे भजन


    चला सारे दुर्गेच्या मंदिरात
    आनंदाने नाचू गाऊ भजनात, तिच्या भजनात || धृ ||

    नवरात्रीचा आला भारी सण
    आपण करूया तिचा सम्मान
    माया दयाळू फार, भक्त देई आधार
    तिचे गुणगान गाऊ सारे दिनरात || १ ||

    टाळ मृदूंगाच्या करुनि आवाज
    तिला भजनात आवळुया आज
    मातेची रे माया देई शीतल छाया
    तिला सदैव ठेऊ ध्यान मनात || २ ||
    चला सारे दुर्गेच्या मंदिरात
    आनंदाने नाचू गाऊ भजनात, तिच्या भजनात

    दुर्गामातेच्या रे दरबारी
    पावन होतो रे नरनारी
    मातेची रे शक्ती आम्हा देई मुक्ती
    धुंद होऊया नामाच्या गजरात || ३ ||
    चला सारे दुर्गेच्या मंदिरात
    आनंदाने नाचू गाऊ भजनात, तिच्या भजनात



    अंबादेवीचे भजन


    आई आंबे जगदंबे, धावत ये तू भजनाला
    रंग भरू दे गाण्याला, दर्शन दे तू आम्हाला || धृ ||

    वाघावरती बैसूनि, हिरवा शालू नेसूनि
    भरजरी चोळी घालुनी, सावर सावर पदराला
    आई आंबे जगदंबे, धावत ये तू भजनाला
    रंग भरू दे गाण्याला, दर्शन दे तू आम्हाला || १ ||

    कुंडल शोभे कानाला, नथनी शोभे नाकाला
    बाजूबंद दंडाला, त्रिशूल शोभे हाताला
    आई आंबे जगदंबे, धावत ये तू भजनाला
    रंग भरू दे गाण्याला, दर्शन दे तू आम्हाला || २ ||

    रूप मनोहर पाहुनी, तल्लीन झाले माते मी
    गाईन गाणे मी तुजला, बुद्धी दे तू आम्हाला
    आई आंबे जगदंबे, धावत ये तू भजनाला
    रंग भरू दे गाण्याला, दर्शन दे तू आम्हाला || ३ ||



    लक्ष्मी मातेचे भजन


    गोडी लागली भजनाची या लक्ष्मी मातेची
    चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची || धृ ||

    पहिल्यांदा मखरात बसले मी आज
    अडीच दिवसांचं महेर माझं
    इच्छा होत नाही जाण्याची, या लक्ष्मी आईची
    चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची || १ ||

    दळण दळिता अंबिला कांडीला
    आवड कथली फुलोऱ्याची
    इच्छा पुरवली जेवणाची या लक्ष्मी आईची
    चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची || २ ||

    ३२ रंगाच्या भाज्या मी केल्या
    फळ आणि पोळ्या केल्या ताज्या
    इच्छा पुरविली पुरणपोळीची, या लक्ष्मी आईची
    चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची || ३ ||

    सागर बनात जाता का कोणी ??
    अमृत ग्लासात प्यायला पाणी
    इच्छा होत नाही जाण्याची, या लक्ष्मी आईची
    चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची || ४ ||

    दास मस्के चरणी आला
    वंदितो बाबा समुद्राला
    पूजा करा ना देवीची या लक्ष्मी आईची
    चला ना जाऊया दर्शन घेऊया रमणूक झोलोबाची || ५ ||



    काळूबाईचे भजन


    गिरणीवाल्या दादा काय हो बघता वळूनी ? .....(2times)
    काळूबाईला जायचं मला द्यावं दळुनी ......(2times) || धृ ||

    संसारात बाई माझं लाग ना ध्यान .....(2times)
    काळूबाई साठी माझं झुरतया मन .....(2times)
    स्वयंपाकाला बसले पदर गेला जळुनी .....(2times)
    काळूबाईला जायचं मला द्यावं दळुनी ......(2times) || १ ||

    धुनी भांडी करताना ग आठवण येते .....(2times)
    भुरळ पाडते मला काळूची ग मूर्ती ....(2times)
    पाया पडता क्षीण माझा जातो पळुनी ...(2times)
    काळूबाईला जायचं मला द्यावं दळुनी ....(2times) || २ ||

    काळूबाईला जाण्याची आशा हि भारी .....(2times)
    नाही कधी चुकली दादा माझी हो फेरी .....(2times)
    अनिता, सुनीता, मणिता, सुचिता बाया मिळुनी .....(2times)
    काळूबाईला जायचं मला द्यावं दळुनी ......(2times) || ३ ||

    गहू गव्हावरती दादा टाका हो नीट .....(2times)
    काळूबाईच्या निवदाला लागते पीठ .....(2times)
    कुरडया पापड्या बिगीबिगीनी घेतल्या तळुनी .....(2times)
    काळूबाईला जायचं मला द्यावं दळुनी ......(2times) || ४ ||





    हे पण वाचा :



    तर मित्रानो आज आपण Devi Bhajan Lyrics बघितले. अन्य भक्तीसंबंधित पोस्ट आणि मराठी लैरिकस साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

    धन्यवाद !!!!!!!!!!!!


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.