Header Ads

Ambabai Gondhalala Ye Lyrics | अंबाबाई गोंधळला ये | महाराष्ट्र शाहीर


नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपण Ambabai Gondhalala Ye Lyrics बघणार आहोत. हे अंबाबाईच खूप सुंदर गाणं महाराष्ट्र शाहीर या मराठी मुव्ही मधलं आहे. गुरु ठाकूर यांनी गाण्याचे बोल लिहिलेआहेत तर अजय गोगावले यांनी गाण्याला आपला आवाज दिला आहे. चला तर मग बघूया अंबाबाई गोंधळला ये या गाण्याचे बोल -


सॉन्ग - अंबाबाई गोंधळला ये
मुव्ही - महाराष्ट्र शाहीर (2023)
सिंगर - अजय गोगावले
लिरिक्स -गुरु ठाकूर
म्युझिक - अजय- अतुल
म्युझिक लेबल - एवरेस्ट मराठी



Ambabai Gondhalala Ye Lyrics | Marathi

अगं धाव आई ठाई ठाई दैत्य मातला
अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला...
अगं धाव आई ठाई ठाई दैत्य मातला
अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला...

आता त्रिशूळ तू हातात आई घे
बळ तेच आज संबळाला दे
अन अंबाबाई गोंधळाला ये .....
अन अंबाबाई गोंधळाला ये .....
तुळजाभवानी गोंधळाला ये.....
अगं काळुबाई गोंधळाला ये.....

उदो उदो उदो उदो
उदो उदो उदो उदो

हे सप्तश्रुंग वासिनी तुझा गोंधळ... आईचा गोंधळ
हे आई तुळजाभवानीचा गोंधळ..... आईचा गोंधळ
अगं माहूरगडवासीनी तुझा गोंधळ.... आईचा गोंधळ
आई करवीरवासीनी तुझा गोंधळ.... आईचा गोंधळ
हे वाघावर बैसूनी अंबा आली ग.... गोंधळाला
हे साद ऐकून माझी अंबा आली ग... गोंधळाला

भक्तीचा आवाज
चढविला गं साज
आज संबळ वाजं
माझ्या आईचा गोंधळाला
आता सरुदे अवस करितो नवस गोंधळाला ये
तुझा करितो गजर राहू दे नजर गोंधळाला ये

चोळी बांगडी वाहीन गोडवा गाईन गोंधळाला ये
आई सुखाचा सागर मायेचा पाझर गोंधळाला ये

प्रलयातुनी जगा....
प्रलयातुनी जगा आई तूच तारिले
बळ तेच आज संबळाला दे

अंबाबाई गोंधळाला ये

अग अंबाबाई गोंधळाला ये
तुळजाभवानी गोंधळाला ये
अगं काळुबाई गोंधळाला ये

उदो उदो उदो उदो उदो
उदो उदो उदो उदो उदो

हे रात सरली काळी गं
उजळलं आभाळी गं
उभी पाठीशी जगदंबा
माझी माय लेकुरवाळी ग
आई संकटातून तार
तुझे उघडुनी ये दार

आई गोंधळाला येना
तुझा मांडला दरबार

तुझ्या दिवटी चा गं जाळ
झाला दुर्जनांचा काळ
आता तुच गं सांभाळ
आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये
आई गोंधळाला गोंधळाला गोंधळाला ये

अंगार जो तुझ्या
नजरेत पेटला
अन तिच आग संबळाला दे
अग अंबाबाई गोंधळाला ये

ए अंबाबाई गोंधळाला ये
तुळजाभवानी गोंधळाला ये
अगं काळुबाई गोंधळाला ये

उदो उदो उदो उदो उदो
उदो उदो उदो उदो उदो

दुःख निवारक तू जननी
आई तू जननी
शरण तुला मी तव चरणी

धाडी दिशांतरी संकट हे
आई संकट हे
सोडवी क्लेशातूनी दुर्गे

त्रिभुवन जाणूनी तव महिमा
आई तव महिमा
आदिशक्ती तू तूच क्षमा

विजयाचा वर दे अंबे
वर दे अंबे
माय भवानी जगदंबे 
माय भवानी जगदंबे 
माय भवानी जगदंबे 




हे पण वाचा :


तर मित्रानो आपण Ambabai Gondhalala Ye Lyrics बघितले. मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .


धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.