Header Ads

Malvat Song Lyrics | मळवट | अजय गोगावले



नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये आपण Malvat Song Lyrics बघणार आहोत. हे अंबाबाईच खूप सुंदर गाणं सोयरीक या मराठी मुव्ही मधलं आहे. वैभव देशमुख यांनी गाण्याचे बोल लिहिलेआहेत तर जय गोगावले यांनी गाण्याला आपला आवाज दिला आहे. चला तर मग बघूया मळवट या गाण्याचे बोल -

सॉन्ग - मळवट
मुव्ही - सोयरीक (2021)
सिंगर - अजय गोगावले
लिरिक्स - वैभव देशमुख
म्युझिक - वैभव नारायण गावंडे
म्युझिक लेबल - अदिती म्युझिक कंपनी



Malvat Song Lyrics | Marathi


येल्लू आईचा उदोउदो…
अंबाबाईचा उदोउदो…

डोई धरिला धरिला
आईचा देव्हारा
भाळी लाविला लाविला
देवीचा भंडारा

पाला लिंबाचा बांधिला
तुझा मळवट भरिला
अग तुझी भरून गं ओटी
तुझा नैवद्य दाविला

आई गोंधळ मांडीला
ये गं तुझ्या घरा
डोई धरिला धरिला
आईचा देव्हारा

हाती परडी कुंकू भाळी
अंतरी तेवली ज्योती गं
भंडारयाची मूठ उधळली
पाप जळली कोटी गं
सेवेसाठी आलो दुरुनी
तुच जीवाचा जीव स्वामिनी
होऊ दे मंगल आई गं

हाती परडी कुंकू भाळी
अंतरी तेवली ज्योती गं
भंडारयाची मूठ उधळली
पाप जळली कोटी गं

आई गोंधळ मांडीला
ये गं तुझ्या घरा
डोई धरिला धरिला
आईचा देव्हारा

देई जोगवा आई कृपेचा
पदर पसरिला पुढती गं
संसाराची नाव तरु दे
हात असू दे पाठी गं
तू रेणुका तू येलम्मा
दाही दिसला गाजं महिमा
नांदव सुख संसारी गं

देवी यल्लम्मा आईचा उदोउदो…
कोल्हापूर च्या अंबाबाईचा उदोउदो…
तुळजा भवानी आई चा उदोउदो…
आई रेणुका देवी चा उदोउदो…
एकविरा देवी चा उदोउदो…
सप्तश्रृंगी देवीचा उदोउदो…

सेवेसाठी आलो दुरुनी
तुच जीवाचा जीव स्वामिनी
होऊ दे मंगल आई गं

हाती परडी कुंकू भाळी
अंतरी तेवली ज्योती गं
भंडारयाची मूठ उधळली
पाप जळली कोटी गं

आई गोंधळ मांडीला
ये गं तुझ्या घरा
डोई धरिला धरिला
आईचा देव्हारा




हे पण वाचा :


तर मित्रानो आपण Malvat Song Lyrics बघितले. मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.