Lallati Bhandar Lyrics In Marathi | लल्लाटी भंडार | जोगवा
नमस्कार मित्रानो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Lallati Bhandar Lyrics In Marathi वाचायला मिळतील .हे " जोगवा " या मराठी चित्रपटमाधल गान आहे. अजय अतुल यांनी या गन्याला संगीत दिलेल आहे . चला मग बघुया " लल्लाटी भंडार " या गान्याचे बोल -
मूव्ही - जोगवा
सॉन्ग - लल्लाटी भंडार
लिरिक्स - संजय कृष्णजी पाटिल
सिंगर - अजय गोगावले
Lallati Bhandar Lyrics | Marathi
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला ग आला ग जिवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी र्हाव तू
देवी माझ्या अंतरी र्हाव तू, काम क्रोध परतुनी लाव तू
काम क्रोध परतुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
महिमा गाईन, तुला घुगर्या वाहीन
घुगर्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
खणा-नारळानं वटी मी भरीन
वटी मी भरीन, तुझी सेवा करीन
सेवा करीन, तुझा देवारा धरीन
देवारा धरीन, माझी वंजळ भरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं
पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर
⚘ ⚘ ⚘ ⚘
हे पण वाचा 👇👇👇
- Malhar Wari Lyrics In Marathi
- Malvat Song Lyrics
- Majhi Mauli 2.0 Song Lyrics
- Ambabai Gondhalala Ye Lyrics
- Aai Tuzya G Charni Lyrics
- Lakh Padla Prakash Lyrics
- Maay Bhavani Lyrics
धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment