Header Ads

अंबाबाई तुझा संबळ वाजला Lyrics | Ambabbai Tujha Sambal Vajala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण अंबाबाई तुझा संबळ वाजला Lyrics बघणार आहोत.
_______________________________

🌷अंबाबाई तुझा संबळ वाजला Lyrics🌷

आई राजा उधो उधो
ये गं अंबे गोंधळाला
आवाज घूमू लागला
आई राजा उधो उधो
अंबाबाई ग.. तूझा संबळ वाजला..|| धृ ||

हो मांडिला मंडप दारी केला थाटमाट
ये गं गोंधळाला अंबा सोडून बालेघाट
काळोख अंधाराची‌ अंबाबाई असली जरी रात
दिवटीचा प्रकाश आई झाला लखलखाट
लागली आस आई तूझा लळा लागला
अंबाबाई ग.. तूझा संबळ वाजला..|| १ ||

हो भरल्या पाच परड्या आई भक्ती ग भावानं
रातभर चाले जागर तूझ्या उद्गारान
हो जमल्या आया बाया मान कूंकवाचा लावून
ये गं गोंधळाला थकलो वाट ग पाहून
कवड्या साद घालून आराधी डूलू लागला
अंबाबाई ग.. तूझा संबळ वाजला..|| २ ||

अंबाबाई...
गाजू लागला महिमा आईचा स्वर्गी पाताळाला
मंडळाचा नाद घूमला तिन्ही ताळाला
आई उधं...
उद्गार गर्जला अंबा आली गोंधळाला
द्यावं ग सूख आई तू अथर्व बाळाला
असा पाहूनी गोंधळ आकाशी चंद्र लाजला
अंबाबाई ग.. तूझा संबळ वाजला..|| ३ ||

ये गं अंबे गोंधळाला
आवाज घूमू लागला
आई राजा उधो उधो
अंबाबाई ग.. तूझा संबळ वाजला..||

❧ ❧ ❧ ❧ ❧
_____________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण अंबाबाई तुझा संबळ वाजला Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛 !!!!!

_______________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.