भोळ्या मनाची अंबाबाई लाडकी गूणाची Lyrics | Bholya Manachi Ambabai Ladaki Gunachi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण भोळ्या मनाची अंबाबाई लाडकी गूणाची Lyrics बघणार आहोत. अंबाबाईचे खूप सुंदर असे हे भक्ती गीत आहे.
सॉंग - भोळ्या मनाची अंबा लाडकी गूणाची
लिरिक्स / म्युझिक - शाहीर विजय भोळे
सिंगर - रवि वाघमारे
_____________________________
भोळ्या मनाची अंबाबाई लाडकी गूणाची Lyrics
तूळजापुरची माऊली गं
माझी भोळ्या मनाची..
भोळ्या मनाची अंबाबाई
लाडकी गूणाची.. || धृ ||
नऊ रातीच्या नऊ माळी
काय सांगू मी तिचा डौल
इच्छा मनाची पूर्ण करून
देते तूळजाई उजवा कौल
कूणी लाविती या बूडी आईला
चोळीच्या खनाची...
भोळ्या मनाची अंबाबाई .. || १ ||
जाणकोजीच्या पालखीमधी आई
बसून आनंदान दसऱ्याच्या रातीला ग
अंबा लुटते सोनं नाणं
रांग लागते दर्शना लेकी बाळी सुनांची
भोळ्या मनाची अंबाबाई .... || २ ||
गावगावीचे भक्त येऊन तिचा करतीया जागर
भवानीच्या पुण्याईनं जातं फुलून तुळजापूर
आई मायेची भूकेली साऱ्या भक्त जनाची
भोळ्या मनाची अंबाबाई ..|| ३ ||
माझ्या विजय भाऊ च ग बाई ऐकून गोड गाणं
भल्या भल्याची झुकते मान
त्याला खंडेरायाचं देणं
थाप देऊन डफावर सुरुवात
करतोय गाण्याची..
भोळ्या मनाची अंबाबाई ...|| ४ ||
तूळजापुरची माऊली गं
माझी भोळ्या मनाची..
भोळ्या मनाची अंबाबाई
लाडकी गूणाची.. ||
* * * * * * * *
_____________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- अंबा आली ग घाटात या तुळजापुरात Lyrics
- धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics
- पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात Lyrics
- माहूरच्या राणीने केला शृंगार Lyrics
_____________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण भोळ्या मनाची अंबाबाई लाडकी गूणाची Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!!
_____________________________
Post a Comment