Header Ads

माहूरच्या राणीने केला शृंगार Lyrics | Mahurchya Ranine Kela Shrungar



नमस्कार या पोस्टमध्ये आपण माहूरच्या राणीने केला शृंगार Lyrics बघणार आहोत.

______________________________

माहूरच्या राणीने केला शृंगार Lyrics

हिरवा हिरवा पातळ चोळी हिरवीगार
माहूरच्या राणीने केला शृंगार.. || धृ ||

माते तुझ्या पदरावर राघू आणि मैना
रूप तुझे पाहण्या गं स्वामीचा आईना
हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार
माहूरच्या राणीने केला शृंगार... || १ ||

माते तुझा मुकुट गं सोनेरी पिवळा
सोन्याच्या साखळीने गुंफीयल्या माळा
मुकुटाला घडविणारा भक्त सोनार
माहूरच्या राणीने केला शृंगार... || २ ||

कानामध्ये झुमके ओठांना गं लाली
मुखामध्ये तांबूल काजळ नयनी
भांगी तुझ्या शोभते ग बोर नक्षीदार
माहूरच्या राणीने केला शृंगार... || ३ ||

* * * * * * 

______________________________




हे भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇

______________________________


आज या पोस्टमध्ये आपण माहूरच्या राणीने केला शृंगार Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏

______________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.