Header Ads

दे बाई दे जोगवा दे Lyrics | De Bai De Jogava De Song



नमस्कार या पोस्टमध्ये आपण दे बाई दे जोगवा दे Lyrics बघणार आहोत.
_______________________________

दे बाई दे जोगवा दे Lyrics | Marathi

दे बाई दे जोगवा दे ....
आई अंबेचा जोगवा दे...
ग जोगवा दे.. || धृ ||

आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती
पायरीवरील लावियेल्या कापुराच्या ज्योती
ग जोगवा दे...
दे बाई दे जोगवा दे... || १ ||

आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुबा
आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा उभा
ग जोगवा दे...
दे बाई दे जोगवा दे... || २ ||

आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ
त्यातला गमती आहे लाखात एक
आता जोगवा दे...
दे बाई दे जोगवा दे... || ३ ||

आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये माळ
दर्शनाला आल तुझ्या नवसाचा बाळ
आता जोगवा दे..
दे बाई दे जोगवा दे... || ४ ||

आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे
तुझ्या प्रसादाला आणियले पेढे
आता जोगवा दे...
दे बाई दे जोगवा दे... || ५ ||

दे बाई दे जोगवा दे ....
आई अंबेचा जोगवा दे...
ग जोगवा दे.. ||

* * * * * *

_______________________________


हे भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇

_______________________________


आज या पोस्टमध्ये आपण दे बाई दे जोगवा दे Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏

_______________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.