आली बाई वाऱ्याच्या झोक्यात Lyrics | Ali Bai Varyachya Jhokat
नमस्कार या पोस्टमध्ये आपण आली बाई वाऱ्याच्या झोक्यात Lyrics बघणार आहोत.
___________________________________
आली बाई वाऱ्याच्या झोक्यात Lyrics
सरा बाई सरा रस्ता सोडा
आली बाई वाऱ्याच्या झोक्यात
हे आली बाई वाऱ्याच्या झोक्यात
येत खेळती ढोलाच्या ठेक्यात || धृ ||
येतो खेळाया धरलय ताल
कुंकाने कपाळ झालया लाल
आईचा चांगभलं बोला
आरोळी ठोकता वारा आलं
गर्जून गेला डोंगर सारा
गार गार हवेच्या मोक्यात
हे आली बाई वाऱ्याच्या झोक्यात.. || १ ||
वारं खेळता राहीना भान
थाप ढोलाच्या आवाजान
हो त्यात गेला माझा ध्यान
हळदी कुंकाचा दिलाया मान
हिरवा शालू जरतरीचा
गजरा डूलतोय डोक्यात
हे आली बाई वाऱ्याच्या झोक्यात.. || २ ||
अशी मांढरची काळू
आई हाय ग लय मायाळू
आई ग... आई ची आरती ओवाळू
इडा पिडा चरणी जाळू
आकाश कार्तिका चं गाणं
साऱ्या भक्त लोकात
हे आली बाई वाऱ्याच्या झोक्यात... || ३ ||
* * * * * *
__________________________________
हे भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
___________________________________
तर आज या पोस्टमध्ये आपण आली बाई वाऱ्याच्या झोक्यात Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment