निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव Lyrics | Nirgun Nirakar Dada Mahur Majhe Gav
नमस्कार या पोस्टमध्ये आपण निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव हे भक्ती गीत बघणार आहोत.
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव Lyrics
तया नगरी वस्ती केली मी
तरी आली एक भावे,
ऐसा माझा शकुन दादा
चित्त देऊनी ऐकावे
कैकयी कैकयी दादा
दूर हा माझा देश
शकुन सांगायला आले कलियुगास,
दहा अवतार दादा मग एकदा झाले
अकरा ही रुद्र होऊनी गेले
अठ्ठयांशी सहस्त्र ऋषी
मज देखता झाले
तेहतीस कोटी देव दादा म्या खेळविले
अठ्ठावीस युगे झाले चक्रवर्ती
कौरव पांडव गेले, दाणे नेणे किती
आम्ही तुम्ही जाऊ, मग कोणी नाही राहती
कलियुगात दादा विपरीत होईल
बहिण भाऊ दोघायांचा विवाह लागेल
पाच वर्षांची बाळ, भ्रतार मागेल
सहा वर्षाची नारी ही गभ्रीन होईल
अठरा ही जाती एका ठिकाणी जेवतील
कलियुगाची दादा ऐकावी थोरी
पुत्र होईल पित्याचा वैरी
भ्रतार सोडून घरोघर फिरतील नारी
आणि एक शकुन दादा ऐकावा बोल
पृथ्वीवरती वारा थोर झुंजार सुटेल
थोर थोर पर्वत दादा जाईल उडून
आणि एक शकुन दादा ऐकावा उत्तर
जाईल चंद्र सूर्य मग पडेल अंधकार
आकाश धरती जाईल मग ऐसा दिन कर
आणि एक शकुन माझा ऐकावा चित्ती
तुम्ही मूळ पाठीराहे
नाव माझे आदिशक्ती
आंबेच्या व्यवहारात राहे आदिमुर्ती
एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिमाया शक्ती
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज या पोस्टमध्ये आपण निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव हे भक्ती गीत बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment