Tu Zalas Muk Samachar Nayak Kavita | तू झालास मूक समाजाचा नायक कविता
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Tu Zalas Muk Samachar Nayak Kavita बघणार आहोत.
Tu Zalas Muk Samachar Nayak Kavita
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं
सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती
माळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत
तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांचा पायातल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे
तुझे शब्द जसे की
महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काट्यांच्या संगिनी व्हाव्यात
तुझ्या डरकाळी ने हादरलं आकाश ;
डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लावली
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगुल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचे पाणी तेही आता थंड झालय
- ज. वि. पवार (1944)
☣ ☣ ☣ ☣
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- खोद आणखी थोडेसे कविता इयत्ता दहावी
- जय जय हे भारत देशा कविता इयत्ता दहावी
- अस्तित्व कविता मराठी
- छोट्या मराठी कविता
आज या पोस्टमध्ये आपण Tu Zalas Muk Samachar Nayak Kavita बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment