जय जय हे भारत देशा कविता इयत्ता दहावी | Jay Jay He Bharat Desha Kavita
नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला जय जय हे भारत देशा कविता (इयत्ता दहावी) वाचायला मिळेल. हि कविता कुमारभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकात अभ्यासाला आहे. मंगेश पाडगावकर (१९२९-२०१५) हे या कवितेचे कवी आहेत. आपल्यामध्ये देशप्रेम आणि साहस भरणारी ही कविता आहे.
जय जय हे भारत देशा कविता (इयत्ता दहावी)
तू नव्या जगाची आशा
जय जय हे भारत देशा
तपोवनातून तुझ्या उजळली, उपनिषदांची वाणी
मातीमधूनी तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खाणी
जय यूगधैर्याच्या देशा
जय नव सूर्याच्या देशा
तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा.
बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना,
अन्यायाला भरे कापरे बघूनी शूर अभिमाना,
जय आत्म शक्तीच्या देशा,
जय त्याग भक्तीच्या देशा,
तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा.
श्रमांतुनी पिकलेली शेते पहा डोलती धुंद
घामाच्या थेंबांतून सांडे हृदयातील आनंद,
जय हरित क्रांतीच्या देशा,
जय विश्व शांतीच्या देशा
तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा.
पहा झोपड्या कंगालंच्या थरातल्या भवताली
अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली
जय लोक शक्तीच्या देशा,
जय दलित मुक्तीच्या देशा,
तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा.
- मंगेश पाडगावकर
§ § §
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Mahila Din Kavita In Marathi
- सावित्रीबाई फुले कविता
- समूह गीत मराठी Lyrics
- Small Poem In Marathi On Mother
तर आज या पोस्ट मधून आपण जय जय हे भारत देशा कविता इयत्ता दहावी बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment