वस्तू कविता इयत्ता दहावी | Vastu Kavita Iyatta Dahavi
नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण वस्तू कविता इयत्ता दहावी बघणार आहोत. ही कविता दहावी इयत्ता दहावीच्या कुमारभारती या मराठीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला आहे. द. भा. धामणस्कर हे या कवितेचे कवी आहेत. आपल्याकडे असलेल्या वस्तूंसोबत आपले नाते कसे असावे याचे सुंदर वर्णन कवींनी या कवितेच्या माध्यमातून केले आहे. वस्तू आपल्या उपयोगासाठी असल्या तरी त्यांना योग्य सन्मान दिला पाहिजे आणि स्वच्छता आपण केली पाहिजे असे कवी सांगतात.
वस्तू कविता (इयत्ता दहावी)
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
नसल्यासारखे वागू नये त्यांना
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
वस्तू निखालस सेवक असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या'जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन
त्यात जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही
आयुष्य संपले की वस्तू नाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा
कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा
- द. भा. धामणस्कर
☘ ☘ ☘
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण वस्तू कविता इयत्ता दहावी बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment