मोबाईलवर आधारित कविता मराठी मधून | Mobile kavita In Marathi
नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला मोबाईलवर आधारित कविता मराठी मधून वाचायला मिळतील. मोबाईल हा आपल्यासाठी शाप आणि वरदान दोन्ही ठरू शकतो. त्याचे दुष्परिणाम कोणते आहेत ? आणि फायदे कोणते आहेत ? हे आपण कवितेच्या माध्यमातून बघू. चला तर मग बघूया मोबाईलवर आधारित कवितांकडे -
![]() |
मोबाईलवर आधारित कविता मराठी मधून |
मोबाईलवर आधारित कविता ( मराठी )
〰〰〰〰〰〰📱 〰〰〰📱〰〰〰📱 〰〰〰〰〰〰मोबाईल
जग किती मोबाईल advance झालय
मोबाईलच्या दुनियेत सारंच कसं फॉरवर्ड झालय
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत
आयुष्य आता copy-paste झालय
Social Networking मध्ये वावरणं झालंय
आभासी दुनियेत जगण झालय
ना घर परिवार ना मित्र समुदाय
आयुष्य आता online झालय
सुख दुःखाचे ही event झालय
Mobile मध्येच आता दिसणं झालंय
Internetच्या आधुनिक युगात
आयुष्य आता Viral झालय
माणसांचंही Robot झालय
Radiation मुळे साऱ्यांचच मरण झालय
Surfing च्या दुनियेत सारच क्षणिक झालय
आयुष्य आता status मय झालय
एकविसाव्या शतकात जग किती बदललय
whatsapp, Facebook विचारवंत झालय
संवादाचही Online करन झालय
आयुष्य आता mute झालय
⸎⸎⸎⸎⸎
आई मला मोबाईल दे ना
आई मला मोबाईल दे ना
त्यामध्ये रोज रोज पाहिल
शाळेचा अभ्यास मी करील
इंग्रजी चे स्पेलिंग पाहील
आई मला मोबाईल देना
नको मला पाटी व पुस्तके
लिखाणाची नको कटकट
पाठांतराची नको नाटके
आई मला मोबाईल देना
पाढे सारे करीन मी पाठ
सोडेल मी गणिताची कोडे
करीन मी सर्वांना चाट
आई मला मोबाईल दे ना
भाषांच्या कविता मी ऐकल
कल्पनाविस्तार कवितांचा
मनापासून साऱ्यांना सांगेल
आई मला मोबाईल दे ना
भूगोलातील त्या खडकांचा
पर्यावरणाचा भूकंपाचा
अभ्यास करील त्या ताऱ्यांचा
आई मला मोबाईल दे ना
भेटेल मी इतिहासातील
विविध किल्ल्यांना व स्थळांना
सारे राजे माहित होतील
आई मला मोबाईल देना
माहित होतील मला साऱ्या
विज्ञानाच्या त्या प्रयोगशाळा
होईल माझा अभ्यास सारा
आई मला मोबाईल दे ना
मला मोबाईल दे ना
- प्रा. सुरेश नारायणे
⸎⸎⸎⸎⸎
मोबाईल म्हणजे मोबाईल असतो
मोबाईल म्हणजे मोबाईल असतो
आपलं विश्व तो होऊन जातो
विजेवर चालणार यंत्र असतो
कंटाळा घालवण्याच साधन बनतो
मोबाईल म्हणजे मोबाईल असतो
सर्वांना मेसेज रूपाने जवळ आणतो
एक सुंदर विरंगुळा असतो
मूर्ती लहान पण कीर्ती महान करतो
मोबाईल म्हणजे मोबाईल असतो
सर्वांना हवाहवासा वाटतो
तो ज्ञानाचे भांडार असतो
सर्व माहिती प्रदान करतो
मोबाईल म्हणजे मोबाईल असतो
आपलस तो करून घेतो
सर्वांना खूप आवश्यक असतो
आपली सवय लावून जातो
मोबाईल म्हणजे मोबाईल असतो
आपल्यामध्ये गुंतून ठेवतो
आपली गरज होऊन जातो
माणुसकी विसरायला लावतो
मोबाईल म्हणजे मोबाईल असतो
लोकप्रियता मिळवून देतो
सर्वांना मोहात पाडतो
योग्य वापर गरजेचा असतो
मोबाईल म्हणजे मोबाईल असतो
अनेक संधी उपलब्ध करतो
चांगली प्रसिद्धी मिळवून देतो
दूर गेलेल्यांना जवळ आणतो
मोबाईल म्हणजे मोबाईल असतो
दुरुपयोग केला तर शाप बनतो
यशाचे उत्तम माध्यम असतो
योग्य वापरला तरच वरदान ठरतो
- विदिशा दामले
⸎⸎⸎⸎⸎
मम्मी सोड ना ग मोबाईल
मम्मी सोड मोबाईल, माझ्यासोबत बोल
थोडा वेळ बागेमध्ये खेळू आपण चल
सोबत तुला नेहमी मोबाईल लागतो केवळ
घरी आल्यावर तरी घे ना मला जवळ
रात्रभर मोबाईल असतो तुझ्या उशाला
तरीसुद्धा दिवसभर ठेवते कशाला
पप्पा आज मोबाईल ऑफिस मध्ये विसरा
माझा चेहरा होईल आनंदाने हसरा
दिवसभर मोबाईल तुम्ही हातात धरता
माझे बोट धरून सांगा कधी फिरता
पुढच्या जन्मी मला मोबाईल व्हायचं आहे
कारण मला दिवसभर मम्मी पप्पा सोबत राहायचं आहे
⸎⸎⸎⸎⸎
सगळे झाले वेडे खुळे
सगळे झाले वेडे खुळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे...
छोटे मोठे स्मार्टफोन हजारो त्यात काम
वेळ जातो सगळा मिळेना छदाम
पण लहान थोर याकडे पळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे,
सगळे झाले वेडे खुळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे ...
सेल्फीने घातलीया अनेकांना साद
ओठांचे चंबू करून पुरा करिती नाद
ओठांमधून जीभ वळवळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे,
सगळे झाले वेडे खुळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे ...
अनेकांच्या ग्रुपमध्ये होते या भरती,
कळत नाही मेसेज कोण रोज लिहिती,
फॉरवर्ड साठी हात चुळबुळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे,
सगळे झाले वेडे खुळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे ...
रोजच्या या मेसेजेस ची तोबा ही गर्दी
डिलीट करण्यामध्ये शक्ती जाते अर्धी
निवडून निवडून करीती मोकळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे,
सगळे झाले वेडे खुळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे ....
एक आपला फोन मात्र अनेक त्यात नाती,
सकाळ दुपार रात्री हे सगळं आठवती,
निष्कारण नेटहि जळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे,
सगळे झाले वेडे खुळे,
मोबाईल तुझ्या जन्मामुळे ...
⸎⸎⸎⸎⸎
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Heart Touching Marathi Kavita On Life
- Birthday Marathi Kavita Charolya
- मजेदार हास्य कविता ( मराठी )
- Small Poem In Marathi
तर आज या पोस्टमध्ये आपण मोबाईलवर आधारित कविता मराठी मधून बघितल्या. तुम्हाला या कविता कशा वाटल्या हे तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. अन्य मराठी लिरिक्स आणि कविता साठी ला पुन्हा भेट नक्की द्या .
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment