Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Wedding Anniversary Wishes Poem Marathi
नमस्कार, लग्न हि आयुष्यातली एक सर्वात महत्वाची गोष्ट असते. हे नातं च खूप स्पेशल असत कारण वरून जरी खूप सोपं आणि छान दिसत असल तरी नवरा आणि बायको दोघांनाही काही गोष्टी ऍडजस्ट या कराव्या लागतात, एकमेकांना समजून घ्यावं लागत म्हणजे हे नातं छान खुलत जात .... लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याला काही सर्प्राइज द्यावे, अशी प्रत्येक बायकोची इच्छा असते. अशा प्रसंगी तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ स्वतः बनवू शकता, घरीच एखादी छोटी सरप्राइज पार्टी अरेंज करू शकता किंवा एखाद स्पेशल हॉलिडे प्लॅन करू शकता. तसेच नवऱ्याला एखादी कविता डेडिकेट करू शकता या पोस्ट मध्ये तुम्हाला Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता वाचायला मिळतील. चला तर मग वळूया कवितांकडे -
Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
💓💓✨✨💓💓✨✨💓💓💓✨✨💓💓💓✨✨💓💓✨✨💓💓
कविता - 1
पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुला,
माझ्या मनाचं पाखरू लागलं होतं उडायला
बाकी कशातच नव्हतं रे मला भान,
काय करू ?
तुझ्या वरून हटतच नव्हतं
माझं ध्यान बोलायला तुझ्याशी
मला शब्दांची गरज वाटत नव्हती
कारण त्यासाठी तुझी एक नजर पुरेशी होती
गंमत वाटत होती मला
चोरून पाहताना तुझ्याकडे
मन चिंब झालं होतं,
जेव्हा तू हसला होता पाहून माझ्याकडे
आपली ही पहिली भेट
माझ्यासाठी खूप खास होती
कारण या भेटीनेच कदाचित
आपली मन जुळली होती
माझ्या मनात फक्त तुला
आणि तुलाच होती जागा
माहित नव्हतं तरीही काय होता
आपल्याला जोडणारा धागा
तुझ्याच विचारात असायची मी नेहमीच दंग
कारण तूच भरला होता ना
माझ्या आयुष्याला रंग
समजायला लागलं होतं आता मलाही थोडं थोडं
काय झालं होतं माझं मन तुझ्यात एवढं वेड
गुंतला होता तुझ्यात जीव,
माझं हृदयही तुझ्यासाठी धडधडत होतं
आता मात्र हे वेडं मन,
तुझ्याच सोबतीची स्वप्न पाहत होतं
आणि तुझ्यासाठी जगत होतं .....
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❣️❣️❣️
कविता - 2
नवरा तो नवराच असतो,
कितीही रागावला तरी मायेने तो जवळ घेतो
कधी रागाने बाहेर गेला तरी
त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात
मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात
कितीही दुःखी असला तरी सारं गिळून घेतो
कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून
एकत्र घेऊन येतो .....
नवरा तो नवराच असतो
काळजी का करतेस मी आहे ना तुला
म्हणून किती धीर देतो सारे अडचणी
आपल्या मनात ठेवून बायकोकडे
हसऱ्या नजरेने पाहतो
जसे घरावर छत असते तसेच
आपल्या डोक्यावर नवऱ्याचे झाकण असते
किती सुरक्षित असतो आपण त्याच्या सावलीत ...
उन्हाची चटके तो खातो पण
सावली आपल्या डोक्यावर देतो
नवरा तो नवराच असतो ....
आपण चार अलंकार घालून म्हणतो
मन माझे मंगळसूत्र तुझ्या नावाचे
कपाळ माझे बिंदी तुझ्या नावाची
तो कधी म्हणतो का .. ? कष्ट माझे पगार तुझे
शरीर माझे आयुष्य तुझे
जन्म आईच्या उदरात पडलो तुझ्या प्रेमात
तू जीवन संगिनी म्हणून गोड मानत असतो
नवरा शेवटी नवराच असतो
संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो
त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो
एक चाक डगमगलं तर एका चाकावर
रथ हाकणे फार अवघड होते ...
बायको शिवाय घरांना घरपण नाही तसंच
नवऱ्याशिवाय बायको पूर्ण नाही
तो कळस आहे घराचा ... छत आहे परिवाराचा
चटके तो खातो .... आपण मात्र सावलीत राहतो
नवरा तो नवराच असतो
आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील
पण नवऱ्याची पोकळी कधीच
भरून निघू शकणार नाही ....
म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या
प्रेमाची साथ द्या जीवन क्षणभंगुर आहे
जाण्याचा आनंद घ्या ....
Happy Anniversary 💞💞💞
⸎⸎⸎⸎⸎
कविता - 3
वचन साता जन्माचे कधी तोडू नका
तुमच्या हृदयातली माझी जागा कधीच कोणाला देऊ नका
तुम्हीच माझा श्वास आहात तुम्हीच माझे जीवन
सगळे काही माझे मी तुम्हाला केले अर्पण
तुमचा मान तुमचे सर्वस्व मी नेहमी ठेवेल जपून
तुमच्या नावाचे मंगळसूत्र हेच आहे माझी खुण
जशी चंद्रास असते नेहमी चांदनीची साथ
आयुष्यभरासाठी मला हवी आहे तुमची साथ
राहील सोबत उभी तुमच्या सुख दुखात नेहमी
कधीच नका भासू देऊ आई बाबांची कमी
कितीही मोठे आले संकट आपल्या वरती
कृष्णा सारखी बनेल मी तुमची सारथी
आयुष्य असेल तोपर्यंत मला तुमची साथ हवी
कारण माझ्या आयुष्याचे तुम्ही आहात गुरुकिल्ली
असो नेहमी साथ तुमची अशी विनंती करते जगदंबेला,
उदंड आयुष्य लाभो माझ्या सौभाग्याला
काही नको मला तेव्हा तुझ्याकडून
अखंड राहू दे माझ्या सौभाग्याची खूण
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❣️❣️❣️
⸎⸎⸎⸎⸎
कविता - 4
माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ती आहेस तू ,
तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याला अर्थ आला
देवाने दिलेली अनमोल भेट आहेस तू
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण
माझ्यासाठी खूप अनमोल आहे
मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करते
मला प्रेम म्हणजे काय माहित नव्हतं पण
जेव्हा झालं तेव्हा ते तुझ्या इतका सुंदर होतं
मला प्रत्येक जन्मी तूच हवा आहे
मला प्रत्येक वेळी तुझ्यावरच
प्रेम करायचं आहे
आणि हे असंच व्हावं
Happy Anniversary Dear Hubby ❤️❤️❤️
⸎⸎⸎⸎⸎
कविता - 5
तुझी वाट बघत मी खिडकीत उभी असावी
तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धा पाठमोरीच राहावी
मोगऱ्याचा गजरा, तू हळूच माझ्या केसात माळतांना
मीही तुझ्या सकट त्या मोगऱ्यासारखीच दरवळावी
तुझे हात माझ्या कमरे भवती आणि तुझ्या
श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी
हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर
मी शहारून मिठी मारत तुझ्यामध्ये गुंतून जावी
अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी....
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💖💖💖
⸎⸎⸎⸎⸎
कविता - 6
सोडून माझं घर आली इथे
सारं काही नवीन जिथे
आपल्या दोघांचाच आहे जरी हा खेळ
साधायचा आहे मला साऱ्यांशी मेळ
समजून घे मला लागला तरी थोडा वेळ
तिथे होत जरी सर्व माझं काही
इथे मात्र तुझ्याशिवाय काहीच नाही
चुकून कधी झालं जरी वर खाली केव्हा
विश्वास ठेवशील ना माझ्यावर तेव्हा,
सोडून माझं माहेर तुझ्यासोबत गाठलं मी सासर
जिथे प्रत्येक वेळी माझी परीक्षा
तू साथ देशील हि एकच अपेक्षा ...
ही एकच अपेक्षा ....
Happy Anniversary Dear Husband 💝💝💖💖
⸎⸎⸎⸎⸎
हे पण जरूर वाचा 👇👇👇👇
हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Post a Comment