Header Ads

Heart Touching Marathi Kavita On Life | जीवनावर हृदय स्पर्शी मराठी कविता


मित्रांनो, आपल्या आयुष्य खूपच अनमोल आहे असे म्हणतात. अनेकदा आपल्या आयुष्यात कठिण प्रसंग, संकटे ही येत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यातले आव्हानही वेगळी असतात. पण आपण प्रत्येक परिस्थितीला कसे सामोरे जातो हे महत्त्वाचे असते. आज या पोस्टमध्ये आपण Heart Touching Marathi Kavita On Life बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता वळूया कवितांकडे -


    Heart Touching Marathi Kavita On Life


    1. कोणाच्या जाण्याने

    कोणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही
    कोणाच्या नकाराने आयुष्य संपत नाही
    एकट्याच्या संघर्ष एकट्यानेच लढावा
    कोण देईल साथ हा भासही सोडावा

    आशेवर जगणे आता तरी सोडा रे
    खूप उजले दगड आता विचाराने लढा रे ... !!!
    खूप बदलले झेंडे आता तरी एक या रे
    जात-पाच धर्म विसरून आता तरी एक या रे

    हिंदू की मुस्लिम या जाळ्यात फसू नका रे
    आता तरी हाती माझा तिरंगा घ्या रे .... !!!!

    - रवी नानाराव जाधव


    2. होय मी भिकारीच

    प्राथमिक शाळा गणवेश नव्हता
    म्हणून आमच्या सारखाच जिर्ण झालेला सदरा
    दूखावर रफू मारून भोक बुजवलेली
    चड्डी घालून शाळेत जायचो शाळेत
    मला पाहून ते हसायचे टर उडवायचे
    मी शांत राहायचो ...

    माझी मायेची भाकर, ठेचा, कांदा, गुळाचा खडा
    रोज डब्यात बांधून द्यायची
    मीही आनंदाने खायचो
    ते परत हसायचे टर उडवायचे
    मी शांत राहायचो ....

    वहया पुस्तकाला पैसे नव्हते म्हणून
    सोडवायचो जगण्याचे गणित
    दगडी पाठीवर दगडावर कणखर होऊन
    माझे नाव हाता पायावर लिहायचो
    कष्टाचे चीज होउन
    आयुष्याचा अंधार नष्ट व्हावा म्हणून
    ते परत हसायचे, टर उडवायचे ....
    मी शांत राहायचो ...

    दप्तर नव्हते झोरा न्यायचो
    पुस्तक नव्हते भेटेल ते वाचायचो
    डोक्यात एकेक शब्द साठवायचो
    प्रत्येकाशी एकरूप व्हायचो
    बाची फरपट घरादाराची चिंता बघायचो
    मग पुन्हा अभ्यासाला लागायचो
    ते पुन्हा हसायचे टिंगल उडवायचे
    मी शांत राहायचो .....

    एक दिवस त्यांनी न राहून विचारलंच
    कारे अजूनही भिकारीच का ?
    फार आनंद झाला मनाला
    मी स्मित केलं हसलो मन तोडत 
    आत्मविश्वासाने त्यांच्याकडे बघून म्हणालो
    होय भिकारीच ....
    कारण माझा बाप इमानदार आहे.

    - वैभव भिवरकर


    3. आयुष्य

    पुढे आपलं काय होईल, 
    काहीच सांगता येत नाही
    वेळे आधी दैवाकडे 
    काहीच मागता येत नाही

    नशिबाने त्याचा काम करावं 
    आपण विश्वास ठेवावा
    जबाबदारीचे ओझोन नेहमी 
    वाहत राहावं पाठीवर मूठी वर

    जन्माला येणारा प्रत्येक माणूस 
    जगात कायमचा राहत नाही
    तरी माणूस माणसाकडे 
    माणसासारखे पाहत नाही

    म्हणून कमाईचा एवढाच भाग
    आपण आयुष्यात कमवत राहू
    शेवटी आपल्या मागे रडणारे
    लोक फक्त जमवत राहू


    4. गरीबाचा जग

    गरीबाच जग असाही असेल असं वाटलंच नव्हतं कधी
    कारण जवळून पाहिल्यावर लक्षात आलं
    निराश झालेल्या त्याच्या मनाला बघितल्यावर
    एखाद्या उघड्या जखमेवर माशा झोंबाव्या
    अशीच अवस्था दिसून येते माझ्या नागड्या डोळ्यांनी

    राब राब राबून शेतातून संध्याकाळी घरी आल्यावर
    उद्याच्या कामाचं शेड्युल
    लावण्यात बिझी झालेला बाप
    ज्वारीच्या पिठाला पिंपातून खोरून खोरून काढणारी माय
    ही रोजचीच नियमावली

    जणू काही फोकस कॅमेराने ४ बाय ५
    सेंटीमीटर चा पासपोर्ट साईज फोटो काढावा
    अगदी तसंच छोटेसे ब्लॅक अँड व्हाईट जग

    संध्याकाळी मन जेव्हा उदास होते
    तेव्हा स्वतःच्या सुखाची याचना करणाऱ्या
    एका सुफी संताने पवित्र स्थळाच्या पायऱ्या चढाव्या,
    अगदी तसाच चढत जातो

    घराच्या कौलारू छतावर
    बंगल्याच्या ग्लास रूफ छपरातून
    दिसणारा चंद्र शोधण्यासाठी
    पण चंद्र शोधण्याचा मानस उरात जरी असला
    तरी २-४ कौलांचा भुगा झाल्याशिवाय राहत नाही
    आणि बिन छपराच्या घराला म्हणे देव सुद्धा पाहत नाही

    आणि म्हणूनच विहाराच्या गोलघुमटाकार छताला
    एलईडी लावल्यागत दिसू लागतात
    शेकडो लुकलुकते तारे
    आणि श्रीमंताच्या घरामधल्या एलजीच्या
    एसी मधून आर्टिफिशल हवा निघावी
    तसेच वाहतात थंडगार वारे

    मग अचानक चंद्र दिसतो तोही आईने
    हातावर दिलेल्या चतकोर भाकरी सारखा
    आमच्या दुःखात मात्र चंद्राने कधी साथ दिलीच नाही ...
    दिली ती फक्त .....
    मातीच्या कुडाणे

    कारण सासुरला जाणाऱ्या पाठमोऱ्या मुलीला
    जड अंतकरणाने निरोप देताना
    माय बापाने रडाव तसं सगळं घर न्हाउन गेलं
    या अवकाळी पावसाने ....

    कदाचित बंगल्याच्या वॉलची भोक
    जेके वॉल पुट्टी ने बुजवता ही येतील
    पण कुडाच्या भोकांना शेणाशिवाय पर्याय नाही
    आणि म्हणूनच असं वाटतं मित्रा
    सगळी सुख श्रीमंतांकडे तारण आहे
    आणि काबाडकष्ट करून सुद्धा
    शेवटी गरीबाचं मरण आहे.

    - पुष्कर राऊत



    5. विझलो आज जरी मी

    विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही.. !!!
    पेटीएम उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही

    छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी
    अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही

    माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे
    जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही

    रोखण्यास वाट माझी, वादळे होते आतूर
    डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही

    येथील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो
    अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही

    विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही.. !!!
    पेटीएम उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही

    - सुरेश भट


    6. एवढेच कळले होते

    एवढेच कळले होते,
    आयुष्याला बाय-बाय करून,
    मी एकटे चालले होते
    सगळे खूप स्तुती करू लागले,
    बहुतेक मी कशी हे त्यांना कळलं असावं,
    मी गेल्यावर .....

    बरं झालं मरण्याने तरी आपलंसं केलं
    या जगण्याने तर खूपच छळलं होतं
    आयुष्य फाटके कपडे घालण्यातच गेलं
    आज माझ्यासाठी नवे पांढरे कपडे आणले होते

    कधी कोणी बोलायला पण रिकाम नव्हतं
    आज ते सगळे फक्त माझ्यासाठी जमले होते
    आधी कुणी मदत सुद्धा करत नव्हतं
    सारे जीवन मदत मागण्यातच गेलं
    आणि न सांगता आज अचानक माझं ओझं
    चार जणांनी त्यांच्या खांद्यावर उचलून नेलं


    मी लाकडावर शांतपणे झोपलेले
    सगळे माझ्याकडेच बघत होते
    एकमेकांना समजावून ते सगळेच रडत होते
    नेहमी मला लाथा मारून जाणारे सुद्धा
    आज माझ्या पाया पडत होते

    अनेकदा उपाशीच झोपायला लागलं होतं
    आणि आज मी जेवणार नसूनही
    माझ्यासाठी वाढले गेले होते एक ताट
    सगळे या अंधारात ....
    मला एकटीला सोडून जाणार होते

    कावळा आला सगळेच गेले .....
    मी एकटीच रात्रभर जळत होते
    बरं झालं मरण आलं, आता फक्त
    एवढेच कळलं होतं की,
    आयुष्याला बाय-बाय करून
    मी एकटीच चालले होते.

    - अंजली महाजन


    7. मी पिल्लांच्या चोची मधले दाणे होईल म्हणतो

    मी पिलांच्या चोची मधले दाणे होईल म्हणतो
    आणि मुलांच्या ओठावरले गाणे होईल म्हणतो

    पैसे बिशे मला नको, नोटा बिटा काही
    खाऊ साठी मोठी मधले नाणे होईल म्हणतो

    मी गेल्यावर पुतळे नको, फोटो बिटो माझे
    आठवणींच्या पुस्तकाचे पाने होईल म्हणतात

    लोखंडाचा तुकडा मी रे, तू पारीस माझ्या मुलांनो
    तुमच्यासाठी दातृत्वाचे सोने होईल म्हणतो

    मी पिलांच्या चोची मधले दाणे होईल म्हणतो
    आणि मुलांच्या ओठावरले गाणे होईल म्हणतो

    - जयंत चावरे


    8. फाशी

    कधी अवकाळी पावसाने सडलेलं
    कधी कोरड्या दुष्काळाने वाळलेलं
    बिलगु बिलगु रडायचं वावरातलं पीक पोटाशी
    पण बापाने माझ्या कधीच घेतली नाही फाशी

    कधी पिकांचा मातीमोल बाजारभाव
    कधी सावकारांचा जुलमी अरे राव
    सारे मिळून खेळायचे रोजच त्याच्या जीवाशी
    पण बापाने माझ्या कधीच घेतली नाही फाशी

    कधी मोठ्या मोठ्यांना हंबरणारी ढोर
    तर कधी रडत रडत झोपणारी पोरं
    भले तो खचायचा त्यांना बघून उपाशी
    पण बापाने माझ्या कधीच घेतली नाही फाशी

    कधी पोरांची शाळा, कधी पोरीचं लग्न
    तर कधी आजाराचं येणारं विघ्न
    असे कायम धडकायचे असंख्य प्रश्न हृदयाशी
    पण बापाने माझ्या कधीच घेतली नाही फाशी

    जरी आली कितीही संकटे, तरी शेवटपर्यंत लढायचं
    अन हसत हसत जगायचं फक्त पोरा बाळांसाठी
    हेच घेतली होती त्याने, प्रतिज्ञा त्याच्या मनाशी
    म्हणून बापाने माझ्या, कधीच घेतली नाही फाशी



    हे पण नक्की वाचा 👇👇👇



    तर मित्रांनो आज या पोस्टमध्ये आपण Heart Touching Marathi Kavita On Life बघितल्या. जीवनावर आधारित असलेल्या कविता तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट मध्ये सांगू शकता आणि अन्य मराठी पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.