Aaji Ajoba Kavita In Marathi | आजी आजोबा कविता मराठी मधून
मित्रांनो, आजी आजोबांचे नातवंडासोबत असणारे नाते हे खूप स्पेशल असते. तुम्हालाही आपल्या लहानपणीचे आजी -आजोबांसोबतचे खास क्षण अजूनही लक्षात असतील. आई वडिलांपेक्षा जास्त माया हे आपल्यावर करत असतात. म्हणून अनेक हट्ट हे आजी कडून पुरवले जातात. आज या पोस्ट मध्ये आपण Aaji Ajoba Kavita In Marathi बघणार आहोत. चला तर मग वळूया कवितांकडे -
Aaji Ajoba Kavita In Marathi |
1. आजोबा
आजोबांचे वय आता सत्तरीच्या पार गेले
उभ्या आयुष्यात पिकून फळ गळावया आले
जुना कसदार देह, बळकट अंगकाठी
किती पाहिले, भोगले सांगे भाळावर आठी
रिते घर हिंडताना, भिंती पुढे पुढे येती,
भुते भूतकाळातली फेर धरुन नाचती,
कधी कातर वेळेला मन उदासीन भूके,
धुरकट काचा-आड दाटे आठवणींचे धुके
अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळे वात
जागणाऱ्या वार्धक्याला गाथा पोथीची सोबत
सुखदुःखांचा हिशोब वजाबाकी एक झाली
काही हातात ना आले, शून्ये शून्यात मिळाले
तरी आजोबांच्या मनी, काही नाही खळ-मळ
साऱ्यांसाठी ओठांवर आशीर्वादच केवळ
संसाराच्या सरणाचा देह कधीचा घातला
आता लागलेली आहे ओढ मातीची मला
- शांता शेळके
2. आजोळ
अजूनही बालपण माझ्या खेळे आजोळच्या घरी
आजोबांच्या कडेवर अन आजीच्या मांडीवरी
अजूनही रंगे रांगे मन आजोळच्या अंगणात
माया आजी-आजोबांची प्राजक्ताची बरसात
आठवण दाटतात आज माझ्या डोळा सरी
गोष्टी ऐकत आजीच्या शांत कुशीत निजलो
आजोबा पुरवते हट्ट चिंब कौतुकात भिजलो
कुणी कधी नाही केले प्रेम इतके माझ्यावरी
करती प्रेम लाभेविन नातवंड माझ्यावरती
त्यांचे लाड करताना आजी आजोबा आठवती
दिली प्रेमगंगा मला माथा त्यांच्या चरणावरी
आजी आजोबा माझ्यासाठी देवदूत
आजी आजोबा माझे देवाचे मला वरदान
माझ्यासाठी पाठवले देवदूत त्याने दोन
फिरे थरथरचा हात हळुवार पाठीवरी
मी आधार भक्कम, आशीर्वाद जन्म भरी
निरपेक्ष प्रेम जणू, त्यांच्या रूपे अवतरले
मला सुख देण्या आणि कष्ट अपार सोसले
मी तो काळजीच त्यांचे, सदा माझीच काळजी
स्वार्थी जगाने गांजलो, आठवते आजोबा आजी
जितूके प्रेम त्यांनी केले, नाही कधी केले कुणी
नको मज कुणाचे काही, राहीन मी त्यांचा ऋणी
आजी आजोबा जरी असती आज देवा तुझ्या घरी
स्मृति नंदादीपे रूपे वसती माझ्या हृदय- मंदिरी
- डॉ. योगेंद्रसिंह जोशी
3. मालवणी कविता
माझे आजोबा आजी
जुन्या घराच्ये जुने आठवणी
मी आठयत असते
माझ्या बरोबर आसतत
ती जुनी माणसा
त्यांचा बोलणा, त्यांचा सवरणा
त्यांचा चलणा, त्यांचा रडणा
त्यांचा हसणा
ह्या काय वेगळाच अस्ता
खरा सांगाचा तर माका
जुनी माणसं खूप खूप
आवडतात
पून त्येचा आता काय उपेग आसा
माजी आजी माजा आजो
ह्या जगात खय आसा
फक्त त्येची सोबत
माझ्याबरोबर अस्ता
4. माझे आजोबा
सदैव प्रसन्न अशी मूर्ती
आनंदाचा खळखळणारा झरा
थांब मायेचा सागर
ते माझे आजोबा .... !!!!!
मायेची मिठी, गोड गोड पप्पी
रामायणाचे धडे अन
गावाकडचे किस्से
संस्काराचे धडे यांनी गिरवले
ते माझे आजोबा .... !!!!!
ज्यांनी इवल्याशा बोटाला धरून चालायला शिकवलं
लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलं
आई ओरडायला लागली की कुशीत लपवलं
माणुसकीने नाती जपायला शिकवलं
ते माझे आजोबा .... !!!!!
खूप सुंदर च्या आठवणी
मनाला चटकन जाणवणारे क्षण
तुमच्या सहवासातील सगळे दिवस
आजही माझ्यासोबत आहेत
माझ्या आजोबा
आजही माझा आधार आहेत .... !!!
- सेजल दराडे
5. आजी
होती आजीबाई
तिला स्वयंपाकाची मोठी घाई
चंदू आला नंदू आला
विमल आली कमल आली
झटकन हात पाय धुतले
पटकन पाटावर बसले
आजी आजी लवकर वाढ
ताकातले लोणी चटकन काढ
ताज्या भाकरीवर पटकन वाढ
दुसरे काय केले ताजे ताजे आजी ?
आज टाटा दिसत नाही भजी
कधी केली ताकाची
उसळ केली मटकीची
मटकीला आले होते मोड
आजीचा स्वयंपाक फारच गोड
सरली आमची गोट
बाळाचे भरले पोट
6. माझी आजी
माझी आजी माझी आजी, तिची गव्हाळ ग कुडी
डोळा वात्सल्य पाझरे, शब्दा अमृताची गोडी
तूप साजूक मलई, आंबा पिंपळाची छाया
होते याहूनी सुखद, माझ्या आजीची ग माया
एक नाजूक गजरा, छान शोभतो अंबाडी
कुंकू वर्तुळ कपाळी, हाती काचेची बांगडी
नऊवारी पातळाचा, तिच्या उबदार वास
तिचा जीव कासाविस, प्रेमे भरविण्या घास
कुळधर्म कुळाचार, पारंपारिक श्रद्धा भरे
तिचे फोटो तिचे सोने, नातवंडे रत्न हिरे
राब राबून राबून, होत्या फुगल्या ग नसा
सारा जनम पाहुण्या, केली तिने ग या बसा
माणसांचा अल्प मेळ, देवा हिच तुझी खोड
वस्त्र ऋणानुबंधाचे, तया ताटातून जोड
देवा मागणं मागते, देई आजीला निरोप
हवा हात तिचा शिरी, अन कूस घ्याया झोप
- डॉ. गौरी जोशी
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये Aaji Ajoba Kavita In Marathi बघितल्या. अन्य मराठी पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment