Header Ads

वाचा ' शिक्षक ' विषयावरील कविता मराठी मधून | Teachers Day Poems (Marathi)

नमस्कार मित्रांनो, शिक्षकांची आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका असते. आई नंतर आपण कोणाकडून काही शिकत असतो तर ते म्हणजे आपले शिक्षकच असतात. जीवन जगण्याचे एक तंत्रच आपण शाळेमध्ये शिक्षकांमार्फत शिकत असतो. शिक्षक विषयावरील कविता मराठी मधून आपण बघणार आहोत. चला तर मग वळूया कवितांकडे -





    〰〰 शिक्षक कविता मराठी 〰〰

    1. सर

    कळतच नाही सर मला काय लिहावे तुमच्यावर
    कार्य हि तुमचे तेवढेच नि तेवढीच आहे कीर्ती
    तुम्ही नाही केलीत LLB कायद्याच्या जगातली
    पण जीवनाच्या कायद्याची पद्धत
    सर तुमची मात्र होती साधी

    तुम्ही आयुष्यभर केले प्रयत्न
    चांगले विद्यार्थी घडावे म्हणून
    थोडा मी हि प्रयत्न केला सर
    त्यात माझं नाव यावं म्हणून
    सर तुम्ही बोललेले शब्द नि शब्द ,
    कट्यारी सारखे वर करत होते
    पण जीवनाच्या रणांगणात

    लढण्याचेहि सामर्थ्य देत होते
    सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी
    मी माझे आदर्श मानतो

    हरलोच आयुष्याच्या वाटेवर तर
    आठवून लढायला बसतो
    सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होत ,
    माझ्या आयुष्याच्या डायरीत ...
    पण अक्षरच सापडेना सर मला

    तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत ...
    तरी प्रयत्न सोडला नाही मी सर ,
    तुम्ही सांगितलं होत म्हणून ....
    पण तुमच्या या कवितेनं माझं
    आयुष्यच गेलं झिजून

    - हेमराज जांभुळकर

    * * * * *

    2. शिक्षक

    खडूने फळा गिरवणारा नसतो... फक्त शिक्षक
    आदर्श विद्यार्थी घडवणारा तोच असतो.. रक्षक

    ज्ञानदान श्रेष्ठ काम करणारा तोच असतो.. महान
    तोच भागवतो बुद्धीची न हरता तहान

    शुद्ध वाणी, नीट नेटकी रहाणी
    आचरणातून शिकवतो स्वयंशिस्त
    नियमांचे उल्लंघन केल्यास नाहीच कोणाची ठेवत भिस्त

    देशभक्ती बंधुत्वाचे धडे देत विचार मांडतो गाढे
    विषयांची गोडी लावून पाठ करवून घेतो पाढे
    स्पर्धेच्या युगात जिंकण्याचा निर्माण करतो विश्वास
    उज्वल भविष्य घडविण्यासाठी त्याचाच असतो ध्यास

    विद्यार्थ्यांच्या पूर्णत्वाला तोच देतो आकार
    देशाच्या प्रगतीचे स्वप्न करण्यासाठी साकार !!!!

    - प्रांजली बांगले

    * * * * *

    3. शिक्षक म्हणजे ....

    जिथे वाद नाही संवाद आहे ,
    प्रश्न नाही उत्तर आहे ,
    हिंसा नाही क्षमा आहे ,
    हाव नाही समाधान आहे ,

    धमकी नाही धमक आहे ,
    भीती नाही आधार आहे ,
    शंका नाही विश्वास आहे ,
    पैसा नाही पण श्रीमंती आहे ,

    प्रखर नाही पण तेजस्वी आहे ,
    हि जात नाही पण पत आहे ,
    गर्वाने म्हणा , मी शिक्षक आहे

    * * * * *

    4. गुरुजी तुम्ही नसता तर

    गुरुजी तुम्ही नसता तर
    समजला नसता लसावि आणि मसावि

    काळला नसता कोन आणि काटकोन ...
    नसताच समजला पूर्णांक तर

    जीवन झाले असते अपूर्णांक
    गुरुजी नसते वाचले शाहू आणि फुले

    नसते पहिले शिवाजी आणि संभाजी
    नसतेच कळले मला अब्दुल कलाम सुद्धा

    नसते कळले मला चंद्र, सूर्य, तारे आणि
    नसता काळाला भूगोल तर फिरत राहिलो असतो

    गुरुजी नास्ता कळला करता आणि कर्म
    आणि नास्ता कळला स्वल्पविराम आणि पूर्णविराम
    तर कदाचित माझ्या आयुष्याला लागला असता अर्धविराम

    नसत कला गुरुजी not only ... but also
    आणि नसत कळलं कधी this that ....
    माझं आयुष्य कदाचित झालं असत bad ...

    आणि गुरुजी नसतंच शिकवला अर्थ
    तर जीवन गेलं असत का व्यर्थ !!!!

    गुरुजी अजून पण आठवतोय तुमचा मार ...
    पण त्यामुळेच कळू शकला मला विद्येचा सार .....

    - कानिफनाथ बोडखे

    * * * * *

    5. गुरु

    आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैलाचा दगड होतो गुरु
    शाळेच्या इमारतीची कोनशिला होतो गुरु

    गुरूशिवाय ज्ञान नाही , गुरूशिवाय जाण नाही
    जाणिवेच्या पलीकडे समजून सांगतात गुरु

    पुस्तकांच्या बाहेरच ज्ञानभंडार म्हणजे गुरु
    आदराचं श्राद्धस्थान म्हणजे गुरु ...

    क्षमा करुणेचा अथांग सागर म्हणजे गुरु
    ज्ञानधनाने भरलेली घागर म्हणजे गुरु

    ' शाळा म्हणजे मंदिर ' असं सांगतात गुरु
    भाषा , संस्कृतीची रुजवण करतात गुरु

    जीवन कलाकृतीचे शिल्पकार गुरु
    बागेतल्या रोपट्याला वाढवणारा माळी होतो गुरु

    कच्च्या मातीला आकारणारा कुंभार म्हणजे गुरु
    आई शब्दाची ओळख करणारे हि गुरु

    शेतकरी माझा बाप समजवणारे गुरु
    नामनामात वंदनीय युगेयुगे गुरु

    माझ्या कवितेचा शब्द शब्द अर्पिते गुरु

    - सौ. जयश्री देशमुख

    * * * * *

    6. शिक्षक कसा असावा

    शिक्षक कसा असावा, शिक्षक प्रेमळ असावा
    जणू उसामध्ये साखरेचा सुंदर असा गोडवा असावा

    शिक्षक कसा असावा, शिक्षक एखाद्यामित्राप्रमाणेअसावा
    जणू डोळ्यांच्या पापण्याचा तो सहारा अन
    हास्याचा तो वर असावा

    शिक्षक कसा असावा, शिक्षक एखाद्या बापासारखा असावा
    जणू घासातला घास स्वतःच्या चिमुकल्यांना भरवणारा
    तो तो एखाद्या कोकिळेप्रमाणेच सहारा असावा

    शिक्षक कसा असावा, एखादाअविस्मरणीय प्रसंग जरूरअसावा
    जणू प्रेमिकेच्या प्रेमाच्या संवेदनांनी भरलेला
    तो एखादा पोवाडा असावा

    शिक्षक कसा असावा, आमच्या संवेदनांना सावरणारा
    जणू तो एक समुद्र किनाराच असावा

    शिक्षक कसा असावा, एखाद्या उंच
    ध्येयाप्रमाणे आमचा शिक्षक असावा
    जणू उडण्यासाठी लागणाऱ्या पंखांचा

    तो एक भक्कम पायाच असावा
    शिक्षक कसा असावा, जणू हुरहुरणाऱ्या
     बाळाला सावरणारा

    तो नैराग्यमायाची प्रतिमा असावा
    अन आठवणींच्या शिदोरीचा तो सुंदर
     असा गारवा असावा

    - सौरभ बागुल

    * * * * *

    7. छडी

    नजरेपुढे कठोर होते , नजरेआडून पाझरते
    सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते

    पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून
    संस्काराच्या कंपासपेटीत आयुष्याला सामावून
    शिष्य म्हणून, युवक म्हणून माणूस म्हणून घडवते
    सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते

    तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसत तर
    विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर
    अडथळ्यांचा दोनगर एका क्षणामध्ये झुकवते
    सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते

    आठवणींच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार
    शिस्तीच्या या गणिताला ममत्वाचा गुणाकार
    नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते
    सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते

    * * * * *

    8. प्रिय बाई

    मायेचा पदर सोडूनि पाहिलं पाऊल जेव्हा टाकलं
    शाळेमध्ये येताच मी 'बाई ' तुम्हाला पाहिलं पाहिलं

    अनोळखी तो चेहरा हासरा, का जाणो पण आपला वाटला
    हात धरला जेव्हा माझा हुंदका रडणारा आपसूक थांबला

    अक्षरांची ती उजळणी अन सुरु झाल्या बेरीज वजावटी
    बघता बघता रंगून गेली, होती कोरी जी पाटी

    गुरुशिष्याचं नातं आपलं, आपुलकीने तुम्ही जपलं
    काय कमी नि काय अधिक माझ्यामधलं तुम्ही जाणलं

    केवळ पुस्तकेच नव्हे तर शिकवली माणसेही वाचायला
    म्हणूनच पुस्तकांच्या पलीकडे जग आज समजतंय मला

    शिकवण तुमची आज सोबती आयुष्याच्या वळणावरती
    काय कुठे ना उणे राहिले ओंजळ ना राहिली कधी रीती

    - सौ. सविता काळे

    * * * * *





    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    तर मित्रांनो आज आपण शिक्षक विषयावरील कविता मराठी मध्ये बघितल्या. तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते मला सांगा आणि काही सजेशन असतील तर ते पण नक्की सांगा. आणि अन्य मराठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.