Mazi Shala Marathi Kavita | इथे वाचा शाळेवर आधारित कविता
1. माझी शाळा
आठवते गजबजलेले पटांगण , आठवते माझी शाळा
कौलारू छताखाली लाकडी टेबल , भिंतीवर फळा
रंगबिरंगी खडूने रंगलेल्या भिंती ,
गणिताची सूत्रे नि विज्ञानाची गती !!
म्हणी वाक्प्रचार , धडे व्याकरणाचे
छान रेखाटलेले नकाशे भूगोलाचे
तेव्हा खूप वाटायचं जगाकडे पाहताना
आपणही लवकर मोठे होऊ ....
इथे बांधल्यासारखं वाटतंय !!
आता कळलंय शाळाच बरी होती
कारण आज जगाच्या बाजारात
हरवल्यासारखं वाटतंय !!!
तेव्हा मी शाळेत जात होतो ,
आता लोक शाळा करायला लागलेत ...
तेव्हा आकडेमोडीने समीकरणे जुळत होती
आता मात्र पैशाने समीकरणे जुळू लागलीत !!
कधी न संपणारा गृहपाठ लिहितो आहे ,
वाढत्या गरजांना कुठे किनारा आहे
स्वच्छ मनमोकळे जगण्याची
तीच खरी सुरवात होती
आजच्या एसी तील शांत एकांतापेक्षा ,
माझी गजबजलेली शाळाच बरी होती !!
- सुशांत चाळके
2. एक होती शाळा
एक होती शाळा , आमच्या वेळची
सुंदर होत सगळं गोष्ट आहे कालची
गुरुजींचा धाक होता ,प्रेमही तेवढ होत
बॅग नव्हती हो आणि पुस्कांच ओझंही नव्हतं
लिहीन वाचन शिकवलं , जगणंही शिकवलं
आमच्या मराठी शाळेनं ,
जीवनाच्या शाळेत पास होणं शिकवलं
परिपाठ व्हायचं , प्रार्थनाही व्हायची
गणवेश साधा होता , डोकीही शांत राहायची
अभ्यासाचा आनंद होता , भीती कधी नव्हती
स्पर्धा हि होती तेव्हा पण मागे राहिलो तरी खंत नव्हती
शाळेचं स्कूल झालं आणि सगळं काही बदललं
इंग्रजीच्या नादात बालपण मात्र हेरावलं
मैदानी खेळ आता मोबाईल मध्ये उतरले
मामाचे पत्र मात्र शाळेतच हरवले
पाठांतर करून मुलं इंग्रजी तर शिकली
एक माणूस बनवायचा शाळा मात्र चुकली
स्पर्धेमुळे आता अभ्यास तर वाढला
अभ्यासातील आनंद मात्र कुठेतरी हरवला
मराठीचे वारसदार आपण , पण तीच तोंडची पळाली
इंग्रजी शाळांनी मराठी थोडीच शिकवली
आपल्याला मराठी शाळेनं खूप मोठं बनवलं
इंग्रजी शाळेची फी भरू , या लायक तरी बनवलं
- योगेश अमृते
3. शाळा माझी सुंदर आहे
पाटी पुस्तक दप्तर आहे , शाळा माझी सुंदर आहे
मानवतेच्या संस्काराचा परिपाठातून जागर आहे
पाटी पुस्तक दप्तर आहे , शाळा माझी सुंदर आहे
मोठ्या बाई प्रेमळ आमच्या ओठी त्यांच्या साखर आहे
कुणी विचारू प्रश्न कितीही साधे सोपे उत्तर आहे
पाटी पुस्तक दप्तर आहे , शाळा माझी सुंदर आहे
वर्गशिक्षिका आईसम त्या , नाही कुठले अंतर आहे
सर आमचे पण शिस्त लाविती , त्यांच्याविषयी आदर आहे
पाटी पुस्तक दप्तर आहे , शाळा माझी सुंदर आहे
कवायतीच्या शिस्त जणू कि कुना वाटते लष्कर आहे
जिवलग येथे किती मिळाले गौतम , अकबर , शंकर आहे
पाटी पुस्तक दप्तर आहे , शाळा माझी सुंदर आहे
संगणकावर शिकतो आता प्रोजेक्टरचा वापर आहे
गणिते करतो कविता म्हणतो सुंदर वळले अक्षर आहे
पाटी पुस्तक दप्तर आहे , शाळा माझी सुंदर आहे
निकाल आमचा अभिमानाचा शंभर पैकी शंभर आहे
पाटी पुस्तक दप्तर आहे , शाळा माझी सुंदर आहे
- प्रशांत कोंदळे
4. अशी बदलत गेली शाळा
कळ्याच्या नंतर हिरवा, हिरव्याच्या नंतर ढवळा
असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा
डोक्याच्या गेल्या टोप्या , सुटाबुटाचे ड्रेस आले
बाईच्या झाल्या मॅडम , गुरुजींचे सर झाले
शाळेच्या फी ची नोटीस गरिबांच्या पोटी गोळा
असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा
अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले
जीवघेण्या स्पर्धेपायी दप्तराचे ओझे नडले
शिक्षणाचा भरला मेळा व्यापारी झाले गोळा
असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा
डोनेशन कि शोषण सक्तीची वसुली झाली
गरिबांच्या शिक्षणाला कुणी राहिला ना वाली
माजले गावात लोभाचे , विद्येचा सुकला मळा
असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा
शिक्षणाची दुकानदारी , दुकाने झाली शाळा
हे चित्र आज चे आहे पण रंग उद्याचा काळा
जग सुधारते आहे अवघे तू कसा सुधारशील बाळा
असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा
कळ्याच्या नंतर हिरवा , हिरव्याच्या नंतर ढवळा
असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा
- गणेश भुले
5. आमची शाळा
श्री गणेश जिथे गिरविला , बेचा पाढा जिथे शिकविला
जिथे विद्येचा अर्थ समजला , तीच आमची शाळा || १ ||
जिथे ज्ञानाची भूक लागली , अभ्यासाची गोडी लागली
जिथे यशाची चव चाखली , तीच आमची शाळा || २ ||
शिक्षक आम्हा असे लाभले , ज्यांनी आमुचे हिट जाणले
अशक्य जेथे शक्य बनले , तीच आमची शाळा || ३ ||
जिथे स्वप्नांना पंख फुटले , जिथे प्रगतीचे मार्ग सुचले
भविष्य जेथे उज्वल घडले , तीच आमची शाळा || ४ ||
वर्षामागून वर्षे सरतील , दूर दूर विद्यार्थी जातील
तरी मनी ते तिलाच स्मरतील , तीच आमची शाळा || ५ ||
-आशिष नेरुरकर ( कवीश )
6. ' शाळा ' कविता १
शाळा एक न विसरता येणारी अशी आठवण .....
ज्याची प्रत्येकाने आपल्या आयुष्यात
करून ठेवलीय साठवण ....
आजही जेव्हा शाळा आठवते ना
तेव्हा आठवत ते सर बालपण .......
दंगा मस्ती करता करता हळूच जवळ
आलेलं ते मित्र मैत्रिणीचं आपलेपण .....
खूप वेळ असायचो शाळेमध्ये ,
ग्यादरिंग म्हणजे तर नुसती धम्माल असायची ....
निरनिराळ्या त्या पोशाखांमध्ये
नृत्य , नाटक अन फक्त मज्जा असायची .....
ग्यादरिंगच ते जेवण जेवायलाही खूप मजा यायची .....
एकमेकांकडे बघत त्या पंगतीलाही मस्त रंगत यायची ....
खर्च पण शाळेला मनामध्ये एक वेगळंच स्थान आहे
कुठेही आणि कितीही दूर गेलो तरी
शाळा मात्र आमची शान आहे ....
- तृप्ती एस . तील्लू
7. ' शाळा ' कविता २
ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा .....
संसकाराचा गोड झरा म्हणजे शाळा ......
व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा ...
मौज मस्तीचा वेगळाच थाट म्हणजे शाळा ......
कोपऱ्यातील प्रयोगशाळा आणि ग्रंथालय म्हणजे शाळा ....
रोजचा रंगीत फळा म्हणजे शाळा ....
एक ठोका , दोन ठोके तर टणटण
वाजणारी घंटा म्हणजे शाळा .....
मैत्री आणि भांडणाची जोड म्हणजे शाळा .....
सकाळची प्रार्थना आणि दुपारचा भात म्हणजे शाळा
पाठीवर दप्तर आणि अंगात गणवेश म्हणजे शाळा
प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज म्हणजे शाळा
शिक्षकाच्या हातातील छडी म्हणजे शाळा
उत्तुंग जगाकडे बघणारी केविलवाणी नजर म्हणजे शाळा
उरात साठवलेली असंख्य स्वप्ने म्हणजे शाळा
आयुष्याच्या वळणावर गोड स्वप्न म्हणजे शाळा
अशी माझी शाळा , अशी माझी शाळा
- प्राची सावंत
8. ' शाळा ' कविता ३
शाळेत जायचं म्हटलं कि येत होता कंटाळा
पण आता आठवते आम्हाला आमची शाळा
रोजच चालायची आमची दंगा मस्ती
शिक्षकांना त्रास आम्ही द्यायचो किती
जेवणाच्या सुट्टीतील धमालच वेगळी होती
सर्वांचे डब्बे खाण्याची ती मज्जाच न्यारी होती
अभ्यास न केल्यास सर खूप मारायचे
पण हे सर्व ते आमच्या भल्यासाठी करायचे
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- सावित्रीबाई फुले कविता
- Diwali Kavita Marathi
- मजेदार हास्य कविता
- Bap Kavita In Marathi
- देश भक्ति गीत कविता मराठी
तर मित्रांनो आज आपण Mazi Shala Marathi Kavita बघितल्या. यामधल्या आपण शाळेसंबंधित खूप कविता बघितल्या तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते मला सांगा आणि अन्य कविता आणि लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!
Post a Comment