Header Ads

Jivan Kavita Marathi | वाचा 'जीवन' या विषयावरील कविता


मित्रांनो, जीवन हे आपल्याला मिळालेली मौल्यवान देणगी आहे. हे आपण बऱ्याच वेळा ऐकतो पण ते पाहिजे तेवढं सिरियसली आपण कधीच घेत नाही. सर्वांच्या आयुष्यात येणारी संकटे दुःखे आव्हाने वेगवेगळी असू शकतात. त्यांना खंबीरपणाने सामोरे जाता आपल्यायाला यायला हवं. जीवनातल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत आणि आनंदी, समाधानी राहण्याची कला आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणूनच आपल्यामध्ये उत्साह भरण्यासाठी सकारात्मक अशा कविता आपल्याला मदत करू शकतील. या पोस्ट मध्ये आपण Jivanavar adharit Kavita Marathi मध्ये बघणार आहोत , इथे तुम्हाला जीवन, आयुष्य या विषयावर खूप छान छान अशा कविता वाचायला मिळतील.



    Jivan Kavita Marathi
    Jivan Kavita Marathi


    1. यात काही पाप नाही

    सिगारेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका
    आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता भुरका,
    विश्वास ठेवा यात काही पाप नाही
    आनंदाने जगायचं नाकारणं ,
    याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !!

    जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता
    लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता
    विश्वास ठेवा यात काही पाप नाही
    आनंदाने जगायचं नाकारणं ,

    याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !!
    देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता
    गरम कांदा भजी खाऊन पोटोबाची पूजा करता
    विश्वास ठेवा यात काही पाप नाही
    आनंदाने जगायचं नाकारणं ,
    याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !!

    प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता
    कवितेच्या ओळी एकूण मनापासून दाद देता
    विश्वास ठेवा यात काही पाप नाही
    आनंदाने जगायचं नाकारणं ,
    याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !!

    - मंगेश पाडगावकर

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎

    2. आयुष्य खूप सुंदर आहे

    सोबत कुणी नसल तरी
    एकट्यानेच ते फुलवत रहा
    वादळात सगळं वाहून गेलं
    म्हणून रडत बसू नका

    वेगळं असं काही माझ्यात खास नाही
    असं म्हणून उदास होऊ नका
    मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे

    सागराकडे अथांगता आहे,
    माझ्याकडे काय आहे
    असं म्हणून रडू नका,
    अंधाराला जाळणारा एक सूर्य
    तुमच्यातही लपला आहे,
    आव्हान करा त्या सूर्याला

    मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात
    नवीन क्षितीज घेऊन अंधारमय रात्र संपवून
    सोनेरी किरणांनी सजून
    मग रोजच उगवेल एक नवी सकाळ

    उत्साह ध्येयाने भरून
    आयुष्य खूप सुंदर आहे,
    सोबतीला कुणी नसल तरी
    एकट्याने ते फुलवत रहा

    - कुसुमाग्रज

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    3. आयुष्य कविता - 1

    आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
    फुकट मिळालेला वेळ नव्हे
    आयुष्य एक कोड आहे,
    सोडवाल तितकं थोडं आहे

    म्हणूनच म्हणते,
    आयुष्यात येऊन माणसं मिळवावीत
    एकमेकांची सुख दुःख एकमेकांना कळवावीत

    बघायला गेलं ना ..... तर आयुष्य खूप सोपं असतं
    जगायला गेलं ना तर दुखातही सुख असतं

    चालायला गेलं तर निखारेही फुल होतात
    तोंड देता आलं तर संकटही क्षुल्क असतात

    वाटायला गेलं ना ..... तर अश्रुतही समाधान असतं
    आणि पचवायला गेलं ना तर अपयशही सोपं असतं

    आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,
    चांगली पण मिळणं आपल्या हातात नसतं हो
    पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं
    यावरच आपलं यश अवलंबून असतं

    अश्रू नसते ना या डोळ्यात तर
    डोळे इतके सुंदर दिसलेच नसते

    दुःख नसतं ना हृदयात तर धडकत्या
    हृदयाला काही किंमतच उरली नसती

    जर पूर्ण झाल्या असत्या ना ....
     मनातील सर्व इच्छा
    तर त्या वरच्या भगवंताची 
    सुद्धा किंमत कळली नसती

    आयुष्य पण एक रांगोळीच आहे
    ती किती ठिपक्यांची काढायची
    ते आपल्या हातात नसतं
    ते नियतीच्या हातात असतं पण
    त्यात किती व कसे रांग भरायचे
    हे आपल्याच हातात असतं

    आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा,
    प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा ....

    क्रोध घातक आहे ना .... 
    मग त्याला गाडून टाका कि
    संकट तर क्षणभंगुर आहेत 
    त्याचा सामना करायला शिका

    कधी असंही जगून बघा -
    एखाद्यावर विनोद करण्याआधी त्याचा
    विचार तर करून बघा, तर कधी
    कोणाच्या समाधानासाठी न आवडलेल्या
    विनोदावर सुद्धा हसून बघा !!!

    पंख नाहीत हो मला ....
     पण उडण्याची स्वप्न जरूर बघते
    कमी असलं ना आयुष्य
    तरी भरभरून जगते

    जोडली नाहीत मी जास्त नाती
     पण मनापासून जपते
    आपल्या माणसांवर मात्र मी
    स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते

    आयुष्य थोडाच असावं पण
    आपल्या माणसाला ओढ लावणार असावं
    आयुष्य थोडच जगावं पण
    जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं

    प्रेम असं द्यावं कि घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी
    मैत्री अशी असावी कि स्वार्थच भान नसावं
    आयुष्य असं जगावं कि मृत्यूनेही म्हणावं,
    बाळा तू जग रे अजून मी येईन नंतर ......

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎

    प्रेरणादायी कविता मराठी

     

    4. जगत मी आलो असा

    जगत मी आलो असा कि,
    मी जसा जगलोच नाही .....

    एकदा तुटलो असा कि मग कधी जुळलोच नाही
    जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे
    सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही
    जगत मी आलो असा कि,
    मी जसा जगलोच नाही ......

    कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो
    पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही
    जगत मी आलो असा कि,
    मी जसा जगलोच नाही ......

    सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी
    एकदा हसलो जरासा मग कधी हसलोच नाही
    जगत मी आलो असा कि,
    मी जसा जगलोच नाही ....

    स्मरतही नाही मजला चेहरे माझ्या व्यथांचे
    एवढे स्मरते मला कि मी मला स्मरलेच नाही
    जगत मी आलो असा कि,
    मी जसा जगलोच नाही ......

    वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाईत
    सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही
    जगत मी आलो असा कि,
    मी जसा जगलोच नाही .......

    संपल्यावर खेळ माझ्या आंधळी कोशिंबिरीचा
    लोक मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही
    जगत मी आलो असा कि,
    मी जसा जगलोच नाही
    एकदा तुटलो असा कि,
    मग कधी जुळलोच नाही ....

    - सुरेश भट

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎

    5. सांगा कस जगायचं ??

    सांगा कस जगायचं ??
    कण्हत कण्हत कि गाणं म्हणत
    तुम्हीच ठरवा !!

    डोळे भरून तुमची आठवण
    कोणीतरी काढतच ना ??
    ऊन ऊन दोन घास
    तुमच्यासाठी वाढतच ना ??
    शाप देत बसायचं कि दुआ देत हसायचं
    तुम्हीच ठरवा !!

    काळ्याकुट्ट काळोखात
    जेव्हा काही दिसत नसतं
    तुमच्यासाठी कोणीतरी
    दिवा घेऊन उभं असत
    काळोखात कुढायचं कि
     प्रकाशात उडायचं
    तुम्हीच ठरवा !!

    पायात काटे रुतून बसतात
    हे अगदी खरं असतं,
    आणि फुल फुलून येतात
    हे काय खरं नसतं ??
    काट्यांसारखं सलायचं कि
     फुलासारखं फुलायचं
    तुम्हीच ठरवा !!

    पेला अर्धा सरला आहे
    असं सुद्धा म्हणता येत
    पेला अर्धा भरला आहे
    असं सुद्धा म्हणता येत
    सरला आहे म्हणायचं कि
     भरला आहे म्हणायचं
    तुम्हीच ठरवा !!

    सांगा कस जगायचं ??
    कण्हत कण्हत कि गाणं म्हणत
    तुम्हीच ठरवा !!

    - मंगेश पाडगावकर

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎

    6. आयुष्य कविता - 2

    निघून जाते आयुष्य, खिसे आपुले भरताना
    वेळ जाते निघून, दिवस रात्र धावताना

    हरवून गेले आहेत सारे, सुख विकत घेताना
    क्षणभर हसणे सुद्धा महाग झाले लोकांना

    विसरलीत नाती गोती सारे जवळ असताना
    धावपळीचे आयुष्य निमूटपणे जगताना

    आयुष्य आहे सुरेख, कुणीच पाहत नाही
    नुसती दगदग सुरु, वेळ कुणाजवळच नाही

    बसून मित्रांसोबत, आज कुणी बोलत नाही
    सुखामागे धावताना, माणूस आज हरवला आहे

    हातचं सुख सोडून, दुःखामागे लागला आहे
    आयुष्य काय आहे, आज कुणाला कळले नाही
    जगण्याचे गुपित कोडे, कुणालाच उमजले नाही

    - गणेश म. तायडे

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    7. जगण्यासाठी अजून काय हवं ??

    आई , एक बाप, एक भाऊ, एक बहीण ,
    असं एखाद घर हवं, जगण्यासाठी अजून काय हवं ??
    एक मित्र, एक शत्रू, एक सुख, एक दुःख,
    असं साधं जीवन
    जगण्यासाठी अजून काय हवं ??

    एक प्रेयसी , एक अर्धांगिनी , एक खरं प्रेम,
    एक भक्कम आधार यात
    कुठेही नसला प्रेमाचा आभाव
    जगण्यासाठी अजून काय हवं ??

    एक सूर्य, एक चंद्र,
    एक दिवस, एक रात्र,
    फक्त सगळं समजायला हवं
    जगण्यासाठी अजून काय हवं ??

    एक शक्ती, एक भक्ती,
    एक सूड, एक आसक्ती
    ठायी असेल युक्ती तर
    जगण्यासाठी अजून काय हवं ??

    थोडा पैसा, थोडी हाव,
    थोडा थाट, थोडा बडेजाव,
    सगळ्यांच्या तोंडी आपलंच नाव
    जगण्यासाठी अजून काय हवं ??

    एक नोकरी, एक छोकरी,
    दोन मूळ अन खायला भाकरी,
    उत्तम प्रकारची असेल जर चाकरी
    जगण्यासाठी अजून काय हवं ??

    एक समुद्र, एक नदी,
    एक शांत, एक अवखळ
    जीवनात असली जर एक तळमळ
    जगण्यासाठी अजून काय हवं ??

    एक इच्छा, एक आशा,
    एक मागं, एक अभिलाषा
    मनात भरलेली सदा नशा
    जगण्यासाठी अजून काय हवं ??

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎

    8. आयुष्य हे ....

    आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असत
    रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं

    शेवटचं पान मृत्यू आणि पाहिलं पान जन्म असतं
    मधली पाने आपणच भरायची असतात
    कारण ते आपलंच कर्म असतं

    होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं
    कुठलंच पान कधी गाळायचं नसतं
    चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं
    कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं

    नाती जपण्यात मजा आहे
    बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे
    जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
    येताना एकटे असलो तरी सर्वांचे 
    होऊन जाण्यात मजा आहे

    नशीब कुणी दुसरं लिहीत नसतं
    आपलं नशीब आपल्याच हाती असतं
    येताना काही आणायचं नसतं
    जाताना काही न्यायचं नसतं

    मग हे आयुष्य तरी
    कोणासाठी जगायचं असतं
    याच प्रश्नच उत्तर शोधण्यासाठी
    जन्माला यायचं असतं

    - मंगेश पाडगावकर

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎



    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    तर मित्रांनो , आज आपण Jivan Kavita Marathi बघितल्या. यामधली कोणती कविता तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते मला खाली कंमेंट मध्ये सांगा. मला विचारलं तर आयुष्य खूप सुंदर आहे हि कुसुमाग्रजांची कविता खूप आवडली. आज आपण इथेच थांबू. अधिक लिरिक्स आणि कविता वाचण्यासाठी True Marathi Lyrics  ला पुन्हा भेट नक्की द्या.

    हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.