Header Ads

संभाजी महाराजांचा पोवाडा | Sambhaji Maharajancha Powada


नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा वाचायला मिळेल.

निर्माता - शाहीर सुमित रामदास धुमाळ
गायक - शाहीर सुमित रामदास धुमाळ

संभाजी महाराजांचा पोवाडा

पोवाडा शंभूराजांचा .....
पोवाडा शंभूराजांचा ..... झुंजारू त्याचा
छावा शिवबाचा ........ फितुरीने घात त्याचा केला
पराभव ठाव नव्हता ज्याला
बुद्धी शंभूची शाहिराला ... र जी र जी जी ...(2)

औरंगजेब कापे थरथरा दुभंगुन तुरा स्वप्नाचा चुरा
ठोका चूक त्याच्या काळजाचा ........(2)

एकूण प्रताप शंभूचा .....
पोवाडा ऐका मर्दाचा ..... र जी र जी जी ...(2)

आकाशात वीज कडकडे .....(2)
शत्रूवर पडे सिंहासनी तडे
पाहून मुघलांच्या अन्यायाला .......(2)

पापाचा साठा अति झाला
आणि शंभू करी विचार कैलासाला र जी र जी जी ...(2)

भरदार छातीचा गडी ..... बारा हात उडी मारतो खडी
भल्या भल्यांची खोड मोडी ....... र जी र जी जी ...(2)

भरदार छातीचा बांधा ... असा मर्द मराठा खंदा .... जी जी (2)
आरप्यार ज्याचं मनगट .....(2)
पोलादी खांब मनगट ..... जी जी

बंदी शिराळा वांगणी मार्गे ......
आणलं बिरजेला राजाला .......(2)
आलमगीराला कळता वार्ता .....
म्हणे बिस्मिल्ला ...... जी जी (2)

जयजयकार महाराष्ट्राचा ...... शूर शिवबाचा शंभूराजांचा
शूरी सळसळले रोमारोमांत .....(2)
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास ..... जी जी .....(2)

शाहिरांची गर्जती तोफ ........(2)
मराठवाड्यात संभाजीनगरात
दुबळ शाहीर मना छंद ......(2)
उरो माझे हो देवांनंद जी जी ........(2)



हे पण वाचा 👇👇👇

तर मित्रानो आज आपण संभाजी महाराजांचा पोवाडा बघितला. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.