Header Ads

Guru Purnima Kavita In Marathi | गुरुपौर्णिमा कविता इन मराठी 


नमस्कार, या पोस्ट मध्ये आपण Guru Purnima Kavita In Marathi वाचायला मिळतील. गुरुवर आधारित कविता तुम्हाला इथे वाचायला मिळतील.


    _____________________________________

    Guru Purnima Kavita In Marathi

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    कविता - 1

    ज्यांनी माझे ज्ञान वाढविले !
    ज्यांनी माझे जीवन घडविले !!

    शिक्षणाच्या त्या महामेरुला !
    प्रणाम माझा सर्व गुरूंना !!

    आई वडील माझे पहिले गुरु !
    जीवनाचे शिक्षण तिथे होते सुरू !!

    प्राथमिक शिक्षणात केले पदार्पण !
    गुरुने दिलेले मूलभूत शिक्षण !!

    माध्यमिक च्या गुरुने सांगितली
    शिक्षणाचे महती !
    तिथून पुढे घेतली शिक्षणाने गती !!

    महाविद्यालयीन गुरुने दाविले
    नोकरीचे विविध मार्ग
    त्यामुळे जीवन बनले एक आनंददायी स्वर्ग !!

    मित्र नावाच्या गुरुने खूप उपकार केले !
    न मागता जीवनाचे खरे शिक्षण दिले !!

    जीवनाची तुम्ही वाढवली गती !
    तुमच्यामुळेच आहे आज जागती कीर्ती !!

    –⁘ –⁘–⁘–⁘–⁘–⁘–
    _____________________________

    कविता - 2

    जीवनाचा मार्गदर्शक म्हणजे गुरु असतो
    योग्य वाट दाखवणारा म्हणजे गुरु असतो
    चांगले वाईट सांगणारा म्हणजे गुरु असतो
    ज्ञान देणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो

    विद्यार्थी घडवणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो
    चुकल्यास शिक्षा देणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो

    प्रशंसा करणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो
    जीवन घडवणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो
    आशीर्वाद देणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो
    यशाची गुरुकिल्ली म्हणजे गुरु असतो

    - जयेश बच्छाव

    –⁘ –⁘–⁘–⁘–⁘–⁘–

    ______________________________

    कविता - 3

    गुरु म्हणजे चालायला नाही,
    चालवायला शिकवतो
    बोलायला नाही,
    बोलून दाखवायला शिकवतो
    खायला नाही,
    खाऊ घालायला शिकवतो

    विश्वास मिळवायला नाही,
    टिकवायला शिकवतो
    आत्मसन्मान घ्यायला नाही,
    कमवायला शिकवतो
    शिक्षण शिकायला नाही ,
    शिकवणूक द्यायला शिकवतो

    पैसा कमवायला नाही,
    दान करायला शिकवतो
    प्रेम मिळवायलाच नाही,
    वाटायला शिकवतो
    नाती तोडायला नाही,
    जपायला शिकवतो

    आधार घ्यायला नाही,
    द्यायला शिकवतो
    आयुष्य फक्त घालवायला नाही,
    ते जगायला शिकवतो
    तो म्हणजेच गुरु !!!!!!!

    –⁘ –⁘–⁘–⁘–⁘–⁘–
    ______________________________

    कविता - 4

    जगात सर्व नात्याहून न्यारे असते
    नाते गुरु शिष्याचे ....
    चुकून नमन करतात सारे
    जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे ....

    सजीव निर्जीवाकडून मिळालेली
    प्रेरणा ही गुरुच असते
    मनामध्ये उठलेला आशेचा ध्यास
    अन नवनिर्मितीची आस ही गुरुच असते

    काय कीर्ती वर्णवी ....
    गुरूंच्या अगम्य महतीची
    कठीण प्रसंगी ही आठवण होते
    फक्त त्यांच्याच सोबतीची ...

    दिशादर्शक बाण असतो गुरु
    संस्काराची खान असतो गुरु
    प्रगतीचे पंख असतो गुरु
    कर्तुत्वाच्या रणांगणावरील
    शंखा नाद असतो गुरु

    गुरु असतो ध्यास कीर्तीचा
    गुरु असतो श्वास पूर्तीचा
    गुरु असतो मार्ग यशाचा
    गुरु असतो किरण आशेचा

    गुरु हा आमचा मार्ग दाता खरा
    ज्ञानीयाचा झरा - अखंडित
    काढून टाकती मनातला दोष
    करी उपदेश - बहुमोल

    गुरु देत असे जीवना आकार
    करती उद्धार - माणसाचा
    गुरुमुळे शिष्य मिळतो सन्मान
    अधुरे हे ज्ञान -गुरु विना

    गुरुची महिमा वर्णू किती आता
    झोपतो हा माझा गुरु पायी

    - शेख बिस्मिल्ला सोनेशी

    –⁘ –⁘–⁘–⁘–⁘–⁘–
    ______________________________


    कविता - 5

    गुरु म्हणजे जीवनाची
    वाट दाखवणारे आई वडील

    गुरु म्हणजे आयुष्याच्या
    कठीण काळाचा मार्गदर्शक

    गुरु म्हणजे सत्याची आणि असत्याची
    जाणीव करून देणारा नायक

    गुरु म्हणजे विचारात असताना
    मनाला समजून सांगणारं आपलं अंतकरण

    गुरु म्हणजे जीवन जगत असताना
    ज्यांच्या पासून खूप काही शिकलो
    अशी प्रत्येक व्यक्ती ....

    –⁘ –⁘–⁘–⁘–⁘–⁘–
    _______________________________

    कविता - 6

    गुरुजी काही ठराविक दिवशीच काढावी तुमची
    आठवण असं नाहीच मुळी तुमचं कार्य
    तुम्ही आहात शिल्पकार माझ्या जीवनाचे
    यश आणि अपयश दोन्ही समाधानाने
    स्वीकारावे हे शिकवले तुम्ही मला ...

    आणि तुम्हीच म्हणाला होता
    नम्रता हा दागिना तुला शोभून दिसतो
    म्हणून मी आजही वागू शकतो माणसासारखा
    आणि वागू शकतो वडीलधाऱ्यांचा
    मान ठेवण्यासाठी

    आज कधी कधी येतात अडचणी आणि
    संकट सुद्धा तेव्हा मी स्मरतो तुमचं नाव
    आणि लगेच निघतात मार्ग
    जादूची काठी फिरवल्यासारखे

    जादू वरून आठवलं तुम्ही कसं काय
    ओळखायचे गुरुजी माझी लेखणी संपल्याचं
    आणि टाकायचे खडूचे
    दोन तुकडे माझ्या दप्तरात
    माझ्या नकळत ..
    गुरुजी ते दोन तुकडे मला मोठे करून गेले
    आणि समाजसेवेचा थोडं भान देऊन गेले

    माझ्या यशात आईचाही वाटा
    ती भरवायची घास द्यायची मायेची साउली
    पण खरा अर्थ जीवनाला 
    तुमच्यामुळे गुरुमाऊली ....

    –⁘ –⁘–⁘–⁘–⁘–⁘–
    _______________________________


    ✅हे पण नक्की वाचा 👇👇👇
    __________________________________

    👀तर या पोस्ट मध्ये आपण Guru Purnima Kavita In Marathi बघितले अधिक मराठी कविता आणि लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤❤🙏🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.