Header Ads

Lokmanya Tilak Marathi Kavita l लोकमान्य टिळकांवर आधारित कविता


मित्रांनो या पोस्टमध्ये तुम्हाला Lokmanya Tilak Marathi Kavita वाचायला मिळतील. इथे आपण लोकमान्य टिळकांवर आधारित सात कविता बघणार आहोत. चला तर मग वळूया कवितांकडे -


    Lokmanya Tilak Marathi Kavita

    📜📜📜📜📜📜📜📜

    कविता - १

    स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे
    अशी सिंहगर्जना ज्यांनी केली
    ज्यांच्या या गर्जनेने, ब्रिटिश
    सरकार पूर्ण हादरून गेली !!

    ब्रिटिश सरकारची जुल्म आणि दडपशाही
    ज्यांनी केली नाही मान्य !
    ते भारतीय असंतोषाचे जनक
    थोर देशभक्त लोकमान्य !!

    समाज हित अन लोककल्याणाची
    होती त्यांना तळमळ !
    सुरू केली त्यांनी लोक जागृतीची
    व्यापक चळवळ !!

    त्यासाठी मराठा व केसरी
    अंक सुरू केला !
    सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?
    हा प्रश्न सरकारला विचारला !!

    सरकारच्या अन्यायाचे जनतेसमोर
    वाचले पाढे !
    न्याय मिळवण्यासाठी दिले
    अन्यायी सरकारशी लढे !!

    राज द्रोहासारखे आरोप घेऊन
    हिमतीने लढले !
    तुरुंगवास भोगला परी
    स्वातंत्र्याचे रणांगण नाही सोडले !!

    स्वतंत्र्यप्राप्तीसाठी दुःख सोसले
    एक ना अनेक !
    नाव त्यांचे बाळ गंगाधर टिळक
    बाळ गंगाधर टिळक !!

    - दादासाहेब गोवर्धन भास्करराव वाघ

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    कविता -२

    क्रांतीची मशाल पेटली,
    सिंहाची सिंहगर्जना गरजली
    स्वातंत्र्याची नवी प्रेरणा
    टिळकांनी जनतेला दिली

    जहाल विचारसरणी होती,
    लेखणी तलवार होती
    प्रकार त्यांच्या विचारांनी,
    ब्रिटिश सत्ता हादरली होती

    मंत्र नवा आंदोलनाचा,
    टिळकांनी जनतेला दिला
    सार्वजनिक उत्सवातून,
    देश संघटित केला

    अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे,
    हाडाचे पत्रकार तुम्ही
    ब्रिटिशांच्या साम्राज्यासाठी,
    काळ ठरलात तुम्ही

    रचला ग्रंथ गीतारहस्य,
    गीतेचे सार सांगितले तुम्ही
    महान भारतीय संस्कृतीचा,
    वारसा दिला तुम्ही

    लोकमान्य झालात तुम्ही,
    भूत भविष्य अन वर्तमानी
    तुमच्या देश प्रेमाच्या गोष्टी,
    आजही इतिहासाच्या पानोपानी

    असामान्य कर्तुत्व तुमचे,
    अफाट तुमची संघर्ष गाथा
    टिळक तुमच्या कार्यापुढे,
    सदैव लिन होतो माथा

    - सविता काळे

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    कविता - ३

    नेतृत्व ते जहाल, ते लोकमान्य होते
    समृद्ध लेखनीची, जळती मशाल होते
    परकीय बंदीवास, शापित देश होता
    पण आग केसरीचा, एकेक लेख होता
    त्या सिंहगर्जनेने, जागा समाज झाला
    उदयास भारतात, स्वातंत्र्य सुर्य आला

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    कविता - ४

    खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात,
    अहो तुमच्याहूनही महान शक्ती आहे विश्वात
    माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन
    स्वराज्य आहे जन्मसिद्ध हे ते मी मिळविन !!
    स्वातंत्र्याच्या तेजोमय सुखदांचा उद्गाता
    नररूपी अवतरलेला तो पुरुष सिंह होता !!
    सह्याद्रीच्या खड्या खड्यासम
    ताठ धिट छाती !

    लाख रव्यांची आग तिच्यातून साठवली होती
    मूर्त होय हो त्याच्या मुखातून कणखर निर्धार
    अग्निपना सम नेत्र,जिभेला खडगाची धार
    तेजाचा लसलसता अंकुर काळजात होता
    नररूप अवतरलेला तो पुरुष सिंह होता !!!

    गोठून थिजल्या समाजपुरुषा जागविले त्याने
    अवघड शास्त्रातील गुढही पारखले त्याने
    कठोर कारागृही शोषित असताना
    बघणार आहे ना उकलित गीतेतील रहस्यांना
    उदंड कर्तुत्वाचा साक्षात निरोमणी होता
    नररूपे अवतरला तो पुरुष सिंह होता !!!

    जगा वेगळा होता परिहा जनतेचा नेता
    लोकमान्य या शब्दालाही तो भूषण होता
    विराट देश ही होय पोरका तो गेला तेव्हा
    आभाळालाही फुटला पाझर तो गेला तेव्हा
    सहस्त्रनायनी जणू नियंता शोकाकुल होता
    नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता

    - सुधीर मोघे

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    कविता - ५

    कर्मयोगी बाळ टिळक करीत गर्जना
    दास्य मुक्त मातृभूमी करूच आम्ही तुला
    यज्ञ करूनही तोडू तोडू दास्य श्रृंखला

    धर्मप्रवर्तकासी तत्त्वचिंतनी
    इंद्रिय संतोष प्रकटीकरीसी जनमनी
    मंडाले कारागृही राहुनी पहा
    गीता रहस्य ग्रंथ राज निर्मिला महान

    स्वातंत्र्याची जन्मसिद्ध हक्क आपूला
    तुझी महामंत्र दिला देश बांधवा
    राष्ट्र जनक नर केसरी करीसी गर्जना
    दास्य मुक्त मातृभूमी करूच आम्ही तुला

    आंग्रांनी घरे लुटता हीनदीनता
    जनदुर्बल होता ची देशी तू हता
    वैचारिक सामर्थ्य निर्वी लेखनी
    आंग्ल राज्य अस्थिर करी केसरी धूनी
    दूरवरना भारतीय दाखवि जना
    दूध वाघिणीचे दावी सर्वदा
    सिंहगर्जना करीत राष्ट्र जनक हा
    दास्य मुक्त मातृभूमी करूच आम्ही तुला
    यज्ञ करूनी तोडू तोडू दास्य शृंखला

    देश भक्ती भाव कुणी जानीना आधी
    स्वत्वावर स्वामित्व आज ना जगी
    हिन दिन आज स्थिती तुजविणा पहा
    भ्रष्ट राजकारण हे जाहले महा
    धर्म ग्लानी पाही पाही निती भ्रष्टता
    द्रव्य लोभे जनधारे कर्महिनता
    परिवेधी परी झाले शहीद किती ते
    आज खेत नाही कूना हिनता वसे
    मार्ग आम्हा दाखविण्या येई रे पुन्हा
    यज्ञ करूनी तोडू तोडू दास्य शृंखला
    कर्मयोगी बाळ टिळक करितो गर्जना
    दास्य मुक्त मातृभूमी करूच आम्ही तुला
    यज्ञ करूनही तोडू तोडू दास्य शृंखला

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    कविता - ६

    पारतंत्र मध्ये निजलेल्या भारत भुला
    जागे करावयाला एक युगपुरुष जनमला
    देऊनी घोषणा स्वराज्याची
    जन्मसिद्ध बाणा नभी कडाडला

    वापर करूनी चतुःसूत्रीचा,
    केला पुरस्कार राष्ट्रीय शिक्षणाचा
    बहिष्कार करुनी विदेशी मालाचा
    जागविला बाणा स्वराज्याचा

    बनुनी असंतोषाचे जनक
    भोगली शिक्षा राजद्रोहाची
    केसरी मराठा चे शस्त्र वापरूनी
    छाती धडधडे ती इंग्रजांची

    मंडालेच्या तुरुंगात रचले
    गीता रहस्य ते महाकाव्य
    लाल बाल पाल च्या रूपाने
    सुरू झाले नवे पर्व

    शिवरायांना आदर्श मानुनी,
    केली सुरुवात राष्ट्रीय उत्सवाची
    लोकसहभागाची नीव रचुनी
    पदवी शोभे लोकमान्य नावाची

    - प्रसाद पाचपांडे

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    कविता - ७

    तुम्ही कोण होता टिळक हे खरंच आम्हाला माहित नाही, 
    तुम्ही मंडालेला काला खट्टा प्यायला गेला होतात का ?
    की मंडले हा एखादा पिकनिक स्पॉट आहे ?
    टिळक तुमचे धोतर खूप वाटत इथे चौपाटीवर
    एखाद्या गावा खातातल्या गड्यासारखं माथाडी सारख, 
    टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा ...

    तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचे पेन्शन अडल असेल दिल्लीत
    तर ते आम्ही पाठवून देऊ तुमच्या पुढच्या पिढ्यांना .....
    आणि काय गायकवाड वाड्यामधल्या जाड जुड 
    मातीच्या भिंती किती ओंगळ वाटत ते

    तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका !! 
    म्हणजे छान मल्टी स्टोडेड कॉम्प्लेक्स होईल. 
    सुखाने दोन घर खाल ....
    उगाच आंदोलनाच्या लष्कराच्या भाकऱ्या भाजू नका 
    आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या ...
    म्हणावं शामला उगाचच आईच्या डोळ्यातून पाणी 
    काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नकोस.

    त्याला दुबई, मस्कटला पाठवा टिळक 
    आज इथे डॉलरची गरज आहे
    तुमचे डोके ठिकाणावर आहे का ? 
    ते तुम्ही डॉलर मिळवा.
    लोक बघा किती आनंदात बियरच्या 
    ग्लास सारखे फेसाळलेत. 
    तुम्ही स्वदेशी बार टाका मस्त जगा.
    भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा, 
    मुलांना ग्रीन कार्ड द्या, आनंद करा !!!
    आणि जमलं तर सिंहगडच्या बंगालीच्या 
    स्पॉटवर एक 5 star हॉटेल काढा.
    तेच तुमच्या हिताच आहे. 
    तूच इथला स्वदेशी वाण आहे.

    - अशोक नायगावकर

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –


    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    तर या पोस्ट मध्ये आपण Lokmanya Tilak Marathi Kavita बघितल्या अन्य मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या

    हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.