Header Ads

समूह गीत मराठी Lyrics | Samuh Geet Lyrics In Marathi


नमस्कार, या पोस्ट मध्ये तुम्हाला समूह गीत मराठी Lyrics वाचायला मिळतील. ७ मराठी भाषेतील समूहगीते इथे तुम्ही वाचू शकता. चला तर मग वळूया समूहगीतांकडे -


    1. आता उठवू सारे रान

    आता उठवू सारे रान
    आता पेटवू सारे रान
    शेतकऱ्यांच्या राज्यासाठी
    लावू पणाला प्राण
    आता उठवू सारे रान
    आता पेटवू सारे रान

    किसान मजूर उठतील
    कंबर लढण्या कसतील
    एकजुटीची मशाल घेऊनी
    पेटवतील हे रान
    आता उठवू सारे रान
    आता पेटवू सारे रान

    कोण आम्हा अडविल
    कोण आम्हा रडवीलं
    अडवणूक करणाऱ्यांची
    उडवू दाना दान
    आता उठवू सारे रान
    आता पेटवू सारे रान

    शेतकऱ्यांची फौज निघे
    हातात त्यांच्या बेडी पडे
    तिरंगी झेंडे घेती गाती
    स्वातंत्र्याचे गान
    आता उठवू सारे रान
    आता पेटवू सारे रान

    पडून ना राहू आता
    खाऊ ना आता लाथा
    शेतकरी काम करी मांडणार होठान
    आता उठवू सारे रान
    आता पेटवू सारे रान
    शेतकऱ्यांच्या राज्यासाठी
    लावू पणाला प्राण
    आता उठवू सारे रान
    आता पेटवू सारे रान


    2. असो तुला देवा


    असो तुला देवा माझा सदा नमस्कार
    तुझ्यातल्या दातृत्वाला अंत नाही पार
    असो तुला देवा माझा सदा नमस्कार

    तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्थरांची
    तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तीकेचे
    तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्या हार
    असो तुला देवा माझा सदा नमस्कार

    तुझ्या कृपेने होईल उषा त्या निशेची
    तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची
    तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधु पार
    असो तुला देवा माझा सदा नमस्कार

    तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार
    असं तुला देवा माझा सदा नमस्कार


    3. उधळीत शतकीरणा


    उधळीत शतकीरणा उजळीत जन हृदया
    नभात आला रे प्रभात रवी उद्या
    ते मी रात्री रजनी गेली रे गेली लया ||धृ||

    थरकती चंचल जलहरी
    नटली सजली वसुंधरा
    मधुमय मंगल स्वर लहरी
    चढल्या भिडल्या दिघंतरा
    धिंधिंधिता धिंधिंधिता
    दून्धूभीच्या नादासंगे
    अंबरच्या मंदिरात मंद वाजे सनई
    जय जय बोला जय जय बोला
    कोटी कोटी कंठानी

    भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
    रे संपली की शर्वरी ये हा रवी या अंबरी ||१||

    चल करी वंदन नवयुवका
    गगनी विलसे नवा रवी
    तुझसी न बंधन जरी पथिका
    दिसली तुजला दिशा नवी
    दिरदिरदारा दिरदिरदारा
    प्राण आता झंकारती
    तारुण्याचा सामर्थ्याला
    कारुण्याची साथ देई
    या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
    पौरुषाला विक्रमाला वैभवाचे हाथ देई
    ही प्रार्थना ही कामना ही भावना ही अर्चना ||२||


    4. हिमालयाशी सांगती नाते


    हिमालयाशी सांगती नाते सह्याद्रीचे कडे
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे

    दगडांचा हा देश, छाती दगडाची याची
    अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबाची
    राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे

    गडा गडावर कड्या कड्यावर इतिहासाच्या खुणा,
    मना मनावर मंत्र घालुनी देत नव्या प्रेरणा
    मान रक्षण या इथे शिंपले रक्ताचे किती सडे
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे


    संतांचा हा देश, सोयरा पिडीत दुखीतांचा
    वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दिनांचा
    तळपत राहील सदैव जोवरी चंद्र सूर्य हे खडे
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे


    हिमालयाशी सांगती नाते सह्याद्रीचे कडे
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे


    5. हिरवी छाया हिरवी माया


    हिरवी छाया हिरवी माया, 
    पाणी पाणी हिरवी किमया, 
    पाऊस हिरवा तुषार हिरवे
    स्नेह निमंत्रण हिरवे हिरवे हिरवे हिरवे
    हिरवी छाया हिरवी माया
    पानोपानी हिरवी किमया (2times)

    झाडे हिरवी वेली हिरव्या 
    डोंगर हिरवे दऱ्याही हिरव्या
    सृष्टी हिरवी वृत्ती हिरवी 
    जिकडे तिकडे हिरवे हिरवे हिरवे
    हिरवी छाया हिरवी माया
    पानोपानी हिरवी किमया (2times)

    या सृष्टीच्या हिरव्या राणी 
    चमचम करती पाचूही हिरवे
    हिरव्या रानी हिरव्या पानी
    खेळ खेळते मंथन हिरवे मंथन हिरवे
    मंथन हिरवे मंथन हिरवे
    हिरवी छाया हिरवी माया
    पानोपानी हिरवी किमया (2times)

    पाऊस हिरवा तुषार हिरवे
    स्नेह निमंत्रण हिरवे हिरवे हिरवे हिरवे
    हिरवी छाया हिरवी माया
    पानोपानी हिरवी किमया (2times)


    6. धोय धोय पाऊस


    धोय धोय पाऊस पडतोय रे
    माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे
    माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे

    पाऊस रानात पाऊस पानात
    पाऊस वाऱ्यात डोंगर दर्यात
    टेरेस बाल्कनी भिजवून जातोय रे
    माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे
    धोय धोय पाऊस पडतोय रे
    माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे

    झिम्माड पाऊस वेल्हाळ वाटतो
    नदीत तुफान दुथडी वाहतो
    रेनकोट नसताना पाऊस गाठतोय रे
    माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे
    धोय धोय पाऊस पडतोय रे
    माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे

    मुसळधारांनी पडतो पाऊस
    वाकडा तिकडा कोसळतो पाऊस
    चारही दिशांनी पाऊस झोडतोय रे
    माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे
    धोय धोय पाऊस पडतोय रे
    धोय धोय पाऊस पडतोय रे
    धोय धोय पाऊस पडतोय रे


    7. चला चला गाऊ चला


    चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे
    आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे (2times)

    फुलपाखरांचे पंख घेऊनी उडूबागडू धुंद होऊनी (2times)
    वाऱ्यासंगे नाचू चला छेडू या तराणे (2times)
    आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे (2times)

    फुल फुला फुलांचे रंग घेऊया,
    झाडे जशी उंच तसे उंच होऊया
    हिरवे हिरवे रान सारे हिरवी हिरवी पाने
    आनंदाचे गाणे गाऊ चला आनंदाचे गाणे (2times)

    आभाळात काहीतरी नवे पाहूया
    नवे नवे पाहताना नवे शोधूया
    गीत नवे शब्द नवे गाऊया नव्याने
    आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे

    चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे (2times)
    आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे (3times)




    हे पण नक्की वाचा 👇👇👇👇

    तर या पोस्ट मध्ये आपण समूह गीत मराठी Lyrics बघितले. अन्य मराठी Lyrics संबंधित पोस्ट वाचण्यासाठी ला पुन्हा भेट नक्की द्या.

    पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.