Guru Purnima Small Poem In Marathi | गुरु पोर्णिमेसाठी छोट्या कविता
नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला Guru Purnima Small Poem In Marathi वाचायला मिळतील. इथे गुरुवर आधारित असणाऱ्या छोट्या कविता तुम्ही इथे वाचु शकता. ज्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी खूप छान आहेत. चला तर मग बघूया गुरुवर आधारित छोट्या कविता -
Purnima Small Poem In Marathi
🙆🙆🙏🙏🌸🌸🌹🌸🌸🙏🙏🙆🙆
गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविन न होई जगी सन्मान
जीवन भवसागर तराया.
चला वंदू गुरुराया,
जे जे आपणासी ठावे
ते दुसऱ्यासी देई
शहाणे करून सोडी
सकळ जना .....
तोचि गुरू खरा ...
आधी चरण त्याचे धरा
आज गुरु चरणी ठेवुनी माथा
वंदितो मी तुम्हा
सदा असू द्या आशीर्वाद तुमचा
गुरुंनी घडविले मला
म्हणून मिळाली आयुष्याला दिशा
गुरुचरणी त्या नमन माझा !!!!
आधी गुरुसी वंदावे |
मग साधन साधावे ||
गुरु म्हणजे मायबाप |
नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तीर्थ तया पाशी ||
तुका म्हणे ऐसे गुरु |
चरण त्यांचे हृदय धरू ||
अक्षर नाही तर गुरुने
शिकवले जीवनाचे ज्ञान
गुरु मंत्र आत्मसात केला तर
भवसागरही कराल पार ...
अधुरी अपुरे सारे
तुझं सवे पुरे व्हावे ...
होऊन या प्रसन्न मजवरी ..
तू विद्येचे दान द्यावे
- अमर
गुरु परमात्मा परेशु |
ऐसा ज्याचा दृढ विश्वासू
देव तयाचा अंकिला
स्वये संचार त्याचे घरा
एका जनार्दनी गुरुदेव
येथे नाही बा संशय
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
ज्ञानार्जन गुरूच्या चरणी
बुद्धी विकास गुरुची करणी
जे का जाती गुरुला शरणी
त्यांचीच लागेल जगात वर्णी
- चारूहास
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- गुरुने दिला ज्ञानरूपी वसा प्रार्थना
- Guru Purnima Kavita In Marathi
- तुज मागतो मी आता Lyrics
- धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाचीचे लिरिक्स
- Famous Marathi Bhajan Lyrics
आज आपण या पोस्टमध्ये Purnima Small Poem In Marathi बघितले. अधिक मराठी कविता आणि लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
Post पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment